< Acts 4 >
1 While they were addressing the people the priests, the commander of the Temple, and the Sadducees came upon them,
१पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.
2 incensed at their teaching the people, and proclaiming, in the case of Jesus, the resurrection from the dead.
२कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला.
3 They arrested them, and put them in prison till the next day, for it was already evening.
३तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले.
4 But many of those who had heard the message believed, and the number of the men came to be about five thousand.
४तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
5 There was held in Jerusalem, next morning, a meeting of their rulers, the elders and scribes,
५मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले.
6 and Annas, the high priest, Caiaphas, John, Alexander, and all the members of the high priests family were present.
६त्यामध्ये महायाजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते.
7 Then they made the men stand before them and demanded, "By what power, or in what name, have you fellows done this?"
७त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, “हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, किंवा कोणत्या नावाने केले?”
8 Then Peter, filled with the Holy Spirit, answered them.
८तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता, त्यांना म्हणाला, “अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो, आणि वडिलांनो,
9 "Rulers and elders of the people, if we are being examined today concerning a benefit conferred upon a cripple, as to how has this man been cured,
९एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे?
10 "be it known to all of you, and to all the people of Israel, that in the name of Jesus Christ, the Nazarene, whom you crucified, whom God raised from the dead, in him does this man stand before you strong and well.
१०तर तुम्हा सर्वास व सर्व इस्राएल लोकांस हे माहित असावे, की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे.
11 "For he is the Stone, cast aside by you builders, which has become the head stone of the corner.
११जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे.
12 "There is no salvation in any other, for there is no other name under heaven given among men, in which we must be saved."
१२आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.”
13 Now when they beheld the glad fearlessness of Peter and John and had perceived that they were amazed; and they began to recognize them, that they were companions of Jesus.
१३तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले.
14 But since they saw the man standing with them who had been healed, they had nothing to answer.
१४तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून, यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना.
15 So they bade them withdraw from the Sanhedrin, while they conferred together.
१५मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले.
16 "What," said they, "shall we do with these men? For it is well known throughout Jerusalem that a notable miracle has been performed by them, and we cannot deny it.
१६ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही.
17 "But that the matter may spread no further among the people, let us threaten them not to speak to any one hereafter about this name."
१७परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.”
18 So they summoned them, and ordered them not to speak at all, nor to teach in the name of Jesus.
१८मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका.
19 But Peter and John said in reply. "Do you decide whether in the sight of God it is right to obey you rather than God;
१९परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.
20 but for our part, we cannot help speaking about what we have seen and heard."
२०कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही.”
21 So when they had further threatened them they let the apostles go, being quite unable to find any way of punishing them because of the people, for everybody was glorifying God over what had happened.
२१तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते.
22 For the man on whom this miracle of healing had been wrought was over forty years old.
२२कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.
23 As soon as the apostles were released, they went to their friends, and told what the high priests and elders had said.
२३तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले.
24 And when they heard it they all lifted up their voices in prayer to God, saying. "O Sovereign Lord, who madest heaven and earth and sea, and all that in them is,
२४ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे.
25 "who saidest through the Holy Spirit, by the lips of thy servant David, our forefather. "Why did the Gentiles rage, And the peoples form futile plans?
२५तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या?
26 "The kings of the earth set themselves in array, And the rulers were gathered together Against the Lord and against his Christ.
२६प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’
27 "In this very city they did gather together against thy holy Servant, Jesus whom thou hast anointed - Herod and Pontius Pilate, with the Gentiles and also the tribes of Israel -
२७कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक, येशू, ह्याच्याविरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले.
28 "to do all that thy power and thy will had predetermined should be done.
२८यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे.
29 "And now Lord, listen to their threats, and grant to thy slaves to proclaim thy message with all boldness,
२९तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे.
30 "whilst thou stretchest forth thy hand to heal; grant too, that signs and wonders may be done through the name of thy holy Servant, Jesus."
३०तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.”
31 When they had prayed, the place where they were gathered was shaken; and they were all filled with the Holy Spirit, and began to speak the message of the Lord with boldness.
३१आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
32 Now the multitude of the believers was of one heart and one soul, nor did any one of them say that any of his possessions was his own; but they had all things common.
३२तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता: आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते.
33 And the apostles continued with great power to give their witness concerning the resurrection of the Lord Jesus, and great grace was upon them all.
३३आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती.
34 Nor was there any one of them in want, for all who owned houses or lands would sell them and bring the price of the things that were sold, and lay it at the apostles’ feet;
३४त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले.
35 and distribution would be made to each according to his need.
३५आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत.
36 In this way Joseph, whom the apostles called Barnabas ("Son of Encouragement" is what it means), who was a native Cyprus,
३६आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती.
37 sold a farm which he had, and brought the price, and laid it at the apostles’ feet.
३७त्याची जमीन होती, ती त्याने विकून तिचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.