< Acts 24 >
1 Five days later, Ananias the high priest came down to Caesarea with some of the elders, and with an orator, named Tertullus. They laid information before the governor against Paul.
१पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
2 So Paul was sent for, and then Tertullus began to accuse him, saying. "As it is owing to your excellency that we enjoy profound peace, and that the state of this nation,
२जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत.
3 "owing to your wise care, has been improved in every respect and in every place, we accept it with profound thankfulness.
३म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.
4 "But not to weary you too much, I beg of your Excellency to listen to a few words from us.
४तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.
5 "For we have found this fellow a pest, an inciter of insurrection among all the Jews of the empire, and a ringleader in the heresy of the Nazarenes.
५हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
6 "He even tried to profane the Temple, but we arrested him.
६ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.
7 "Then the chief captain, Lysias came and violently took him from us.
७पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले.
8 From him you will be able, by examining Paul yourself, to learn the truth of all these charges we are bringing against him."
८आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
9 The Jews also joined in the charge, maintaining that these were the facts.
९तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी ही दुजोरा दिला.
10 Then at a nod from the governor, Paul spoke. "Because I know that for many years you have been a judge in this nation, I feel encouraged to make my defense.
१०मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.
11 "For you have it in your power to know that it is not more than twelve days ago that I went up to Jerusalem to worship;
११आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत.
12 "and that neither in the Temple, nor in the synagogues, nor in the city, did they find me disputing with any man or stirring up a crowd.
१२आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही.
13 "Nor can they prove the charges which they are now bringing against me.
१३ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.
14 "But this I confess to you, that I worship the God of our ancestors, according to the Way which they call a heresy, believing everything that is according to the Law, or is written in the Prophets,
१४तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.
15 "and having hope toward God, which these also themselves look for, that there is to be a resurrection both of the just and the unjust.
१५आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.
16 "Hence I too endeavor to have a conscience void of offense toward God and men alway.
१६ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.
17 "Now after many years I came to bring alms to my nation, and to offer sacrifices.
१७मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांस दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.
18 "While I was thus engaged, they found me in the temple, purified, with no crowd and no uproar. But there were certain Asiatic Jews
१८शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते.
19 "who ought to have been here before you, and to have made accusations if they had anything against me.
१९त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता.
20 "Or let these men themselves say what fault they found, when I appeared before the Sanhedrin!
२०किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे;
21 "Unless it was for this one sentence which I uttered when I stood and cried, ‘It is for the resurrection of the dead that I am on my trial today before you.’"
२१ह्यांच्यामध्ये उभे राहून, मरण पावलेल्यांचा पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.”
22 At this point Felix, who had a pretty accurate knowledge of the Way, adjourned the case, saying to the Jews, "When Lysias the tribune comes down, I will go carefully into the matter."
२२फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.”
23 And he gave orders to the centurion that Paul should be kept in custody, but treated with indulgence, and that his personal friends were not to be forbidden to minister to him.
२३आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी.
24 Some days later Felix came, with his wife Drusilla, a Jewess; he sent for Paul, and listened to him concerning the faith in Christ Jesus.
२४मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.
25 And as he reasoned about morality, self-control, and the future judgment, Felix was terrified, and said, "For the present go on your way, and when I find a convenient season, I will send for you."
२५तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
26 He was hoping that Paul would give him money, and for this reason he used to send for him often to converse with him.
२६आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे.
27 But after two full years Felix was succeeded by Porcius Festus, and because he wished to curry favor with the Jews, Felix left Paul still in prison.
२७पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.