< Acts 22 >
1 "Brothers and fathers, listen to the defense which I now make in your presence."
१बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका.
2 When they heard him speaking in Hebrew they became the more quiet.
२तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले.
3 "I am a Jew," he said, "born in Tarsus of Cilicia, but brought up in this city at the feet of Gamaliel, taught according to the strict manner of the Law of our forefathers, ardent for God, even as you all are this day.
३मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
4 "I persecuted to the death this way, continually binding and delivering up to prisons both men and women.
४पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला.
5 "To this the high priest and all the council of elders are witnesses. It was from them that I received letters to the brothers in Damascus, and I was already on my way to bring those also who were there back to Jerusalem, in bonds, for punishment.
५त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे.
6 "But when, on my journey, I was nearing Damascus, about noon, suddenly a great light from heaven shone round about me.
६मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
7 "I fell to the ground, and heard a voice saying to me, "‘Saul! Saul! why are you persecuting me?’
७तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली.
8 "‘Who are you, Lord?’ I asked. "‘I am Jesus, the Nazarene, whom you are persecuting,’ he answered me.
८मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.”
9 "Now my companions, though they beheld the light, did not hear the words of Him who spoke to me.
९तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
10 "And I said, ‘What shall I do, Lord?’ and the Lord said to me, ‘Rise and go into Damascus, and there you will be told about all that you are destined to do.’
१०मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.”
11 "And as I was seeing nothing for the glory of the light, I was led by the hand of my companions, and so came into Damascus.
११त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.
12 "And a certain Ananias, a pious man according to the Law, well thought of by all the Jews who lived there,
१२मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
13 "came to me, and standing by me, said to me, "‘Brother Saul, receive your sight’ "In that very hour I regained my sight and looked up at him.
१३तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले.
14 "Then he said. "‘The God of our forefathers has appointed you to know his will; and to see the righteous One, and to hear a voice from his mouth.
१४मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
15 "‘For before the face of all men you will be a witness for him of what you have seen and heard.
१५कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
16 "‘And now why do you wait? Rise and be baptized, and wash away your sins, calling upon his name.’
१६तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
17 "After my return to Jerusalem, and while I was praying in the temple,
१७मग असे झाले की, मी यरूशलेमे शहरास माघारी आल्यावर, परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.
18 "I fell into a trance and saw him saying to me, "‘Make haste and go quickly out of Jerusalem, because they will not receive your testimony concerning me.’
१८तेव्हा मी त्यास पाहिले; तो मला म्हणाला, “त्वरा कर, यरूशलेम शहरातून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.”
19 "‘Lord,’ I replied, ‘they themselves well know that I was beating and imprisoning in synagogue after synagogue those who believed in you,
१९तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे.
20 "‘and when the blood of your martyr Stephen was shed, I also was standing by and consenting, and holding the garments of his murders.’
२०तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.
21 "‘Depart,’ he said to me, ‘for I will send you forth, far hence, to the Gentiles.’"
२१तेव्हा त्याने मला सांगितले, “जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”
22 Until they heard this last statement, the people were listening to Paul, but now they roared out. "Away with such a fellow from the earth! He is not fit to live!"
२२या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही.
23 When they continued to shout, throwing their clothes into the air, and flinging dust around,
२३ते ओरडत व आपली बाह्यवस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता.
24 the tribune ordered him to be brought into the barracks, and examined under the lash, to learn for what reason the people were thus crying out against him.
२४सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा, अशाप्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते.
25 But when they had tied him up with the thongs, Paul said to the centurion who was standing near, "If a man is a Roman citizen, and uncondemned, is it lawful for you to scourge him?"
२५मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
26 When the centurion heard that, he went to the tribune and said to him. "What are you intending to do? This man is a Roman citizen."
२६हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो मनुष्य रोमन आहे.
27 So the tribune came to Paul and asked him, "Tell me, are you a Roman citizen?" "Yes," he said.
२७तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
28 "I paid a large sum to get this citizenship," said the tribune. "But I was citizen-born," said Paul.
२८सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”
29 Then those who were about to scourge him, immediately left him. And the tribune too, was afraid, when he learned that Paul was a Roman citizen, for he had had him bound.
२९ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते.
30 The next day, as he wished to learn the real reason why the Jews accused Paul, he unbound him, and commanded the chief priests and all the Sanhedrin to come together, and brought Paul down, and placed him before them.
३०यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले.