< Ruth 4 >
1 And Boaz has gone up to the gate, and sits there, and behold, the redeemer is passing by of whom Boaz had spoken, and he says, “Turn aside, sit down here, such a one, such a one”; and he turns aside and sits down.
१आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.
2 And he takes ten men from [the] elderly of the city, and says, “Sit down here”; and they sit down.
२मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.
3 And he says to the redeemer, “A portion of the field which [is] to our brother, to Elimelech, has Naomi sold, who has come back from the fields of Moab;
३मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे,
4 and I said, I uncover your ear, saying, Buy before the inhabitants and before [the] elderly of my people; if you redeem—redeem, and if none redeems—declare [it] to me and I know, for there is none except you to redeem, and I after you.” And he says, “I redeem [it].”
४आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.”
5 And Boaz says, “In the day of your buying the field from the hand of Naomi, then from Ruth the Moabitess, wife of the dead, you have bought [it], to raise up the name of the dead over his inheritance.”
५मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.”
6 And the redeemer says, “I am not able to redeem [it] for myself, lest I destroy my inheritance; redeem for yourself—you—my right of redemption, for I am not able to redeem.”
६तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.”
7 And this [is] formerly in Israel for redemption and for exchanging, to establish anything: a man has drawn off his sandal, and given [it] to his neighbor, and this [is] the Testimony in Israel.
७वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे.
8 And the redeemer says to Boaz, “Buy [it] for yourself,” and draws off his sandal.
८तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.
9 And Boaz says to the elderly, and [to] all the people, “You [are] witnesses today that I have bought all that [belonged] to Elimelech, and all that [belonged] to Chilion and Mahlon, from the hand of Naomi;
९बवाज त्या वडीलजनांना व सर्व लोकांस म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.
10 and also Ruth the Moabitess, wife of Mahlon, I have bought to myself for a wife, to raise up the name of the dead over his inheritance; and the name of the dead is not cut off from among his brothers, and from the gate of his place; witnesses you [are] today.”
१०याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो; ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, आज तुम्ही याविषयी साक्षी आहात.”
11 And all the people who [are] in the gate say—also the elderly, “Witnesses! YHWH makes the woman who is coming to your house as Rachel and as Leah, both of whom built the house of Israel; and you do virtuously in Ephrathah, and proclaim the name in Beth-Lehem;
११तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो.
12 and let your house be as the house of Perez (whom Tamar bore to Judah), of the seed which YHWH gives to you of this young woman.”
१२आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.”
13 And Boaz takes Ruth, and she becomes his wife, and he goes in to her, and YHWH gives conception to her, and she bears a son.
१३मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.
14 And the women say to Naomi, “Blessed [is] YHWH who has not let a redeemer cease to you today, and his name is proclaimed in Israel,
१४तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो.
15 and he has been to you for a restorer of life, and for a nourisher of your old age, for your daughter-in-law who has loved you—who is better to you than seven sons—has borne him.”
१५तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.”
16 And Naomi takes the boy, and lays him in her bosom, and is to him for a nurse;
१६तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली.
17 and the neighboring women give a name to him, saying, “There has been a son born to Naomi,” and they call his name Obed; he [is] father of Jesse, father of David.
१७“नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
18 And these are generations of Perez: Perez begot Hezron,
१८पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला,
19 and Hezron begot Ram, and Ram begot Amminidab,
१९हेस्रोन रामचा पिता झाला, राम अम्मीनादाबाचा पिता झाला,
20 and Amminidab begot Nahshon, and Nahshon begot Salmon,
२०अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला, नहशोन सल्मोनाचा पिता झाला,
21 and Salmon begot Boaz, and Boaz begot Obed,
२१सल्मोन बवाजाचा पिता झाला, बवाज ओबेदाचा पिता झाला,
22 and Obed begot Jesse, and Jesse begot David.
२२ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.