< 2 Kings 9 >
1 And Elisha the prophet has called to one of the sons of the prophets and says to him, “Gird up your loins, and take this vial of oil in your hand, and go to Ramoth-Gilead,
१अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा.
2 and you have gone in there, and see Jehu son of Jehoshaphat, son of Nimshi, there, and you have gone in, and caused him to rise out of the midst of his brothers, and brought him into the inner part of an inner-chamber,
२येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने.
3 and taken the vial of oil, and poured [it] on his head, and said, Thus said YHWH: I have anointed you for king to Israel; and you have opened the door, and fled, and do not wait.”
३त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”
4 And the young man goes—the young man the prophet—to Ramoth-Gilead,
४तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे आला
5 and comes in, and behold, chiefs of the force are sitting, and he says, “I have a word for you, O chief!” And Jehu says, “To which of all of us?” And he says, “To you, O chief.”
५येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”
6 And he rises and comes into the house, and he pours the oil on his head, and says to him, “Thus said YHWH, God of Israel: I have anointed you for king to the people of YHWH, to Israel,
६यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.”
7 and you have struck the house of your lord Ahab, and I have required the blood of My servants the prophets, and the blood of all the servants of YHWH, from the hand of Jezebel;
७तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे.
8 and all the house of Ahab has perished, and I have cut off from Ahab those sitting on the wall, and restrained, and left, in Israel,
८म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम.
9 and I have given up the house of Ahab like the house of Jeroboam son of Nebat, and as the house of Baasha son of Ahijah,
९नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन.
10 and dogs eat Jezebel in the portion of Jezreel, and there is none burying”; and he opens the door and flees.
१०“ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.”
11 And Jehu has gone out to the servants of his lord, and [one] says to him, “Is there peace? Why did this madman come to you?” And he says to them, “You have known the man and his talk.”
११येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण आणि त्याचा संदेश तुम्हास माहित आहेच.”
12 And they say, “False! Declare to us now”; and he says, “He spoke thus and thus to me, saying, Thus said YHWH: I have anointed you for king to Israel.”
१२तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.”
13 And they hurry—each [one]—and take his garment, and put [it] under him at the top of the stairs, and blow with a horn, and say, “Jehu has reigned!”
१३हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
14 And Jehu son of Jehoshaphat, son of Nimshi, conspires against Joram. And Joram was keeping in Ramoth-Gilead, he and all Israel, from the presence of Hazael king of Aram,
१४निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामाविरुध्द कट रचला. यावेळी, अरामाचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादाचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो
15 and King Joram turns back to be healed in Jezreel, of the wounds with which the Arameans strike him in his fighting with Hazael king of Aram. And Jehu says, “If it is your mind, do not let an escaped one go out from the city, to go to declare [it] in Jezreel.”
१५राजा योथामाने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामाला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
16 And Jehu rides, and goes to Jezreel, for Joram is lying there, and Ahaziah king of Judah has gone down to see Joram.
१६योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योथामाला भेटावयाला इज्रेलला आला होता.
17 And the watchman is standing on the tower in Jezreel, and sees the company of Jehu in his coming, and says, “I see a company”; and Joram says, “Take a rider and send [him] to meet them, and let him say, Is there peace?”
१७इज्रेलमध्ये बुरूजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामाने त्यास सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते शांतीने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”
18 And the rider on the horse goes to meet him and says, “Thus said the king: Is there peace?” And Jehu says, “And what is peace to you? Turn around behind me.” And the watchman declares, saying, “The messenger came to them, and he has not returned.”
१८तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामाच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्यास म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला मनुष्य अजून परत आलेला नाही.”
19 And he sends a second rider on a horse, and he comes to them and says, “Thus said the king: Is there peace?” And Jehu says, “And what is peace to you? Turn around behind me.”
१९तेव्हा योथामाने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहूकडे आला आणि राजा योरामाच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”
20 And the watchman declares, saying, “He came to them, and he has not returned, and the driving [is] like the driving of Jehu son of Nimshi, for he drives with madness.”
२०पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा मनुष्यही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे.
21 And Jehoram says, “Harness”; and his chariot is harnessed, and Jehoram king of Israel goes out, and Ahaziah king of Judah, each in his chariot, and they go out to meet Jehu, and find him in the portion of Naboth the Jezreelite.
२१योथामाने मग स्वत: चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामाचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली.
22 And it comes to pass, at Jehoram’s seeing Jehu, that he says, “Is there peace, Jehu?” And he says, “What [is] the peace, while the whoredoms of your mother Jezebel, and her witchcrafts, are many?”
२२येहूला पाहून योरामाने त्यास विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
23 And Jehoram turns his hands and flees, and says to Ahaziah, “Deceit, O Ahaziah!”
२३योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”
24 And Jehu has filled his hand with a bow, and strikes Jehoram between his arms, and the arrow goes out from his heart, and he bows down in his chariot.
२४पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामाचा बरोबर दोन बाहूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामाच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.
25 And [Jehu] says to his captain Bidkar, “Lift up, cast him into the portion of the field of Naboth the Jezreelite—for remember, you and I were riding together after his father Ahab, and YHWH lifted this burden on him:
२५येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामाचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामाचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना?
26 Have I not seen the blood of Naboth and the blood of his sons last night—a declaration of YHWH—indeed, I have repaid to you in this portion—a declaration of YHWH—and now, lift up, cast him into the portion, according to the word of YHWH.”
२६परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
27 And Ahaziah king of Judah has seen, and flees the way of the garden-house, and Jehu pursues after him, and says, “Strike him—also him—in the chariot,” in the going up to Gur, that [is] Ibleam, and he flees to Megiddo, and dies there,
२७यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या मनुष्यांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.
28 and his servants carry him to Jerusalem in a chariot, and bury him in his burying-place with his fathers in the City of David.
२८अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरूशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.
29 And in the eleventh year of Joram son of Ahab, Ahaziah reigned over Judah.
२९अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
30 And Jehu comes to Jezreel, and Jezebel has heard, and puts her eyes in paint and beautifies her head, and looks out through the window.
३०येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली.
31 And Jehu has come into the gate, and she says, “Was there peace [for] Zimri—slayer of his lord?”
३१येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?”
32 And he lifts up his face to the window and says, “Who [is] with me? Who?” And two [or] three eunuchs look out to him;
३२येहूने वर खिडकीकडे पाहत म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले.
33 and he says, “Let her go”; and they let her go, and [some] of her blood is sprinkled on the wall, and on the horses, and he treads her down.
३३येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरून चालून गेले.
34 And he comes in, and eats, and drinks, and says, “Now look after this cursed one and bury her, for she [is] a king’s daughter.”
३४येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित स्त्रीला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”
35 And they go to bury her, and have not found [anything] of her except the skull, and the feet, and the palms of the hands.
३५लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तिचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले.
36 And they turn back, and declare [it] to him, and he says, “It [is] the word of YHWH that He spoke by the hand of this servant, Elijah the Tishbite, saying, In the portion of Jezreel the dogs eat the flesh of Jezebel,
३६तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलीया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.’
37 and the carcass of Jezebel has been as dung on the face of the field in the portion of Jezreel, that they do not say, This [is] Jezebel.”
३७शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”