< Nehemiah 5 >
1 And there arose a great outcry of the people and of their wives against their brethren the Jews.
१तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.
2 And there were some that said, Our sons, and our daughters, [and] ourselves are many; and we must buy corn, that we may eat, and live.
२त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “मुले व मुलींसहीत आम्ही बरेचजण आहोत. आम्हास खायला मिळावे आणि आम्ही जिवंत रहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”
3 And others there were that said, We must pledge our fields, our vineyards, and our houses, that we may buy corn, in the famine.
३काहीजण म्हणत होते “दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”
4 And others there were that said, We have borrowed money for the king's tax on our fields and vineyards.
४काही असे सुद्धा म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावरीला राजाचा कर भरण्यासाठी आम्हास पैसे उसने घ्यावे लागत आहेत.
5 Yet now our flesh is like the flesh of our brethren, our children are like their children: and, lo, we must force our sons and our daughters to become servants, and some of our daughters are forced [to become so], and our hand is powerless; and our fields and our vineyards belong to others.
५आमच्या बांधवाचे व आमचे रक्तमांस एकच आहे आणि त्यांच्या अपत्यांसारखीच आमची अपत्ये आहेत. तरीसुद्धा आम्हांला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागत आहेत. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय्य आहोत कारण आमची शेती आणि द्राक्षमळे आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”
6 And it displeased me greatly when I heard their complaint and these words.
६जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा मला अतिशय संताप आला.
7 Then did I consult with my heart, and I upbraided the nobles, and the rulers, and said unto them, “Ye exact usury, every one of his brother!” And I brought together a great assembly against them.
७मग मी यावर विचार करून मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही आपल्या बंधूकडून व्याज घेत आहात” मग मी सर्व लोकांस सभेमध्ये एकत्र बोलावले
8 And I said unto them, We have indeed ransomed our brethren the Jews, who had been sold unto the various nations, as far as our means went: and will ye yourselves even sell your brethren, so that they will be sold again unto us? And they remained silent, and found no answer.
८आणि त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!” ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.
9 Then said I, The thing is not good which ye are doing: ought ye not to walk in the fear of our God, because of the taunting of the nations, our enemies?
९मी असेही म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांची निंदा टाळण्यासाठी तुम्ही देवाविषयी भय बाळगून चालावे की नाही?
10 And also I, my brothers, and my young men, have lent them money and corn: I pray you, let us relinquish this loan.
१०तसेच मी, माझे सेवक, माझे भाऊ त्यांस पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे.
11 Give back to them, I pray you, even this day, their fields, their vineyards, their oliveyards, and their houses, also the hundredth part of the money, and of the corn, the wine, and the oil, that ye have lent them.
११त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतूनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना याच दिवशी परत करा. त्यांच्याकडून टक्केवारीने घेतलेले पैसे, धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल जे तुम्ही कर्जाऊ दिलेत ते तुम्ही त्यांना परत करा.”
12 Then said they, We will give [all] back, and of them will we require nothing: so will we do as thou sayest. Then I called the priests, and made them swear, that they would do in accordance with this promise.
१२मग ते म्हणाले “त्यांच्याकडून घेतलेले सर्वकाही आम्ही परत करू व अधिक काही मागणार नाही. आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू.” मग मी याजकांना बोलावून घेतले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मी त्यांना शपथ घ्यावयास लावली.
13 Also my lap did I shake out, and said, So may God shake out every man that performeth not this promise, from his house and of his toil-gotten wealth, and so let him remain shaken out, and empty. And all the assembly said, Amen, and they praised the Lord. And the people did according to this promise.
१३मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल.” ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.
14 Moreover from the day that [the king] had enjoined on me to be governor in the land of Judah, from the twentieth year up to the two and thirtieth year of king Artaxerxes, [full] twelve years, neither I nor my brothers ate the food of the governor.
१४शिवाय, यहूद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहूदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.
15 But the former governors that had been before me had made it heavy for the people, and had taken of them bread and wine, beside forty shekels of silver: yea, even their young men ruled over the people; but I myself did not act so, because of the fear of God.
१५पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.
16 And in the work of this wall also did I labor actively; and we bought not any fields; and all my young men were assembled there by the work.
१६मीसुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही. आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आलो.
17 Moreover of the Jews and rulers, one hundred and fifty men, besides those that came unto us from the nations that are about us, [ate] at my table.
१७माझ्या मेजावर यहूदी आणि अधिकारी यांच्यातले दीडशे माणसे शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत.
18 And that which was prepared for one day was one ox and six choice sheep; also birds were prepared for me, and once in ten days all sorts of wine in abundance: yet with all this I required not the food of the governor; because the service lay heavily upon this people.
१८आता प्रत्येक दिवशी एक बैल, सहा निवडक मेंढरे आणि पक्षीही तयार करीत असत, व प्रत्येक दहा दिवसानी सर्व प्रकारचे द्राक्षरस मुबलक प्रमाणात आणत आणि तरीही, मी राज्यपालाकडून अन्नाचा भत्ता मागितला नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा खूप भारी होता.
19 Remember for me, my God, for good, all that I have done for this people.
१९हे माझ्या देवा, जे मी या देशाच्या लोकांकरता केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.