< Jeremiah 28 >
1 And it came to pass in the same year, in the beginning of the reign of Zedekiah the king of Judah, in the fourth year, in the fifth month, that there said unto me Chananyah the son of 'Azzur the prophet, who was from Gib'on, in the house of the Lord, before the eyes of the priests, and of all the people, as followeth,
१मग त्याच वर्षी असे झाले की, यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला चौथ्या वर्षाच्या व पाचव्या महिन्यात अज्जूरचा मुलगा हनन्या संदेष्टा, जो गिबोनाकडचा होता, परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी याजक व सर्व लोकांसमोर माझ्याशी बोलला. तो म्हणाला,
2 Thus hath said the Lord of hosts, the God of Israel, saying, I have broken the yoke of the king of Babylon;
२“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, बाबेलाच्या राजाने लादलेले जोखड मी मोडले आहे.
3 Within yet two years' time will I cause to be brought back unto this place all the vessels of the house of the Lord, which Nebuchadnezzar the king of Babylon hath taken away from this place, and which he hath carried to Babylon:
३बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील सर्व वस्तू घेऊन बाबेलास नेली ती मी दोन वर्षांच्या आत, परत या स्थानात आणीन.
4 And Jechonyah the son of Jehoyakim the king of Judah, and all the exiles of Judah that are gone to Babylon, will I cause to return to this place, saith the Lord; for I will break the yoke of the king of Babylon.
४यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.
5 Then said Jeremiah the prophet unto Chananyah the prophet before the eyes of the priests, and before the eyes of all the people that stood in the house of the Lord,
५जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला,
6 Yea, then said Jeremiah the prophet, Amen, may the Lord do so: may the Lord fulfill thy words which thou hast prophesied, to cause the vessels of the Lord's house, and all that have been carried into exile, to be brought back from Babylon unto this place.
६यिर्मया संदेष्टा म्हणाला, आमेन, परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातील नेलेल्या वस्तू आणि बंदिवासातील सर्व बाबेलाहून परत या स्थानात आणण्यासाठी परमेश्वराने दिलेली सर्व वचने, जी भविष्य म्हणून तू सांगितली आहेत, ती खरी होवोत.
7 Nevertheless hear thou now this word which I speak before thy ears, and before the ears of all the people:
७जरी, हे जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी बोलतो ते आता ऐक.
8 The prophets that have been before me and before thee from olden times prophesied both concerning many countries, and against great kingdoms, respecting war, and respecting evil, and respecting pestilence.
८माझ्यापूर्वी आणि तुझ्यापूर्वी फार पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, त्यांनीसुद्धा अनेक देशाविषयी व मोठ्या राज्यांविषयी, लढायांविषयी, दुष्काळ व मरी येतील असे भाकीत केले होते.
9 The prophet who prophesieth of peace, when the word of the prophet doth come to pass, then shall the prophet be known, [as the one] whom the Lord hath sent in truth.
९जो संदेष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदेष्ट्याचे वचन खरे ठरेल तेव्हा तो संदेष्टा खरोखरच परमेश्वराने पाठविलेला आहे हे समजेल.”
10 Then took Chananyah the prophet the yoke-bar from off the neck of Jeremiah the prophet, and broke it.
१०परंतु हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून व तोडून टाकले.
11 And Chananyah said before the eyes of all the people, as followeth, Thus hath said the Lord, Even so will I break the yoke of Nebuchadnezzar the king of Babylon within two years' time from the neck of all the nations. And Jeremiah the prophet went his way.
११मग हनन्या सर्व लोकांसमोर बोलला व म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘ह्याप्रमाणेच बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने लादलेले जोखड दोन वर्षाच्या आत मी प्रत्येक राष्ट्रांच्या मानेवरून काढून तोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.
12 Then came the word of the Lord unto Jeremiah, after Chananyah the prophet had broken the yoke-bar from off the neck of Jeremiah the prophet, saying,
१२जेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मयाच्या मानेवरून जोखड काढून तोडल्यानंतर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.
13 Go and say unto Chananyah as followeth, Thus hath said the Lord, Yoke-bars of wood hast thou broken; but thou shalt make in their stead yoke-bars of iron.
१३“जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन.
14 For thus hath said the Lord of hosts, the God of Israel, A yoke of iron have I placed upon the neck of all these nations, that they may serve Nebuchadnezzar the king of Babylon; and they shall work for him: and also the beasts of the field have I given him.
१४कारण मी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, ‘बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याची सेवा सर्व राष्ट्रांनी करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवले आहे, ते त्याची सेवा करतील. याशिवाय मी त्यास शेतातील वन्यपशूंवरही अधिकार देईन.”
15 Then said Jeremiah the prophet unto Chananyah the prophet, Hear now, Chananyah, The Lord did not send thee; but thou hast caused this people to trust on a falsehood.
१५नंतर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टा म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू या लोकांस लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले.
16 Therefore thus hath said the Lord, Behold, I will send thee away from off the face of the earth: this year shalt thou die, because thou hast spoken rebellion against the Lord.
१६म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुला या जगातून उचलीन, या वर्षी तू मरशील, कारण तू परमेश्वराविरूद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस.”
17 So Chananyah the prophet died in that same year, in the seventh month.
१७आणि त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्या मेला.