< Jeremiah 26 >
1 In the beginning of the reign of Jehoyakim the son of Josiah the king of Judah came this word from the Lord, saying,
१योशीयाचा मुलगा, यहोयाकीम, यहूदाचा राजा ह्याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वराकडून हे वचन आले, ते म्हणाले,
2 Thus hath said the Lord, Place thyself in the court of the house of the Lord, and speak against all of the cities of Judah, who come to prostrate themselves in the house of the Lord, all the words that I have commanded thee to speak unto them: omit not a word [thereof];
२परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको.
3 Perhaps it be that they will hearken, and return every man from his evil way, that I may bethink me of the evil, which I purpose to do unto them, because of the wrongfulness of their doings.
३कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.
4 And thou shalt say unto them, Thus hath said the Lord, if ye will not hearken unto me, to walk in my law, which I have set before you,
४तू त्यांना सांग ‘परमेश्वर असे म्हणतो: जर तुम्ही माझ्या नियमशास्त्राप्रमाणे ऐकले नाही, जे मी तुम्हा समोर ठेवले आहे,
5 To hearken unto the words of my servants the prophets, whom I send unto you, yea, making them rise up early, and sending them, while ye have not hearkened:
५जर तुम्ही माझ्या सेवकांचे जे संदष्टे आहेत, ज्यांना मी तुम्हाकडे नित्याने पाठवत आलो आहे, त्यांचे ऐकले नाही.
6 Then will I render this house like Shiloh, and this city will I render a curse unto all the nations of the earth.
६तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.”
7 And the priests and the prophets and all the people heard Jeremiah speaking these words in the house of the Lord:
७परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले.
8 And it came to pass, when Jeremiah had finished speaking all that the Lord had commanded [him] to speak unto all the people, that the priests and the prophets and all the people seized on him, saying, Thou shalt surely die.
८परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, तू खचित मरशील!
9 Why hast thou prophesied in the name of the Lord, saying, Like Shiloh shall this house be, and this city shall be ruined, [left] without an inhabitant? And all the people assembled themselves against Jeremiah in the house of the Lord.
९शिलोच्या मंदिराप्रमाणे या घराचा नाश होईल आणि हे नगर निर्जन असे होईल, ज्यात कोणीच राहत नाही, परमेश्वराच्या नावाने तू हे भविष्य का सांगितले? आणि परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
10 But when the princes of Judah heard these things, they came up from the king's house unto the house of the Lord, and sat down at the entrance of the new gate of the Lord's house.
१०यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले.
11 Then said the priests and the prophets unto the princes and unto all the people, as followeth, This man deserveth the punishment of death; for he hath prophesied against this city, as ye have heard with your own ears.
११नंतर याजक व संदेष्टे अधिकाऱ्यांशी व सर्व लोकांशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरूशलेम शहराबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे तुमच्या स्वत: च्या कानांनी ऐकलेच आहे.”
12 Then said Jeremiah unto all the princes and unto all the people, as followeth, The Lord hath sent me to prophesy against this house and against this city all the words that ye have heard.
१२मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.
13 But now amend your ways and your doings, and hearken to the voice of the Lord your God: and the Lord will bethink him of the evil that he hath spoken against you.
१३तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन.
14 As for me, behold, I am in your hand: do with me as seemeth good and just in your eyes.
१४माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा.
15 But know ye for certain, that if ye put me to death, ye will surely place [the guilt of] innocent blood upon yourselves, and upon this city, and upon its inhabitants; for in truth hath the Lord sent me unto you to speak in your ears all these words.
१५पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.”
16 Then said the princes and all the people unto the priests and to the prophets, This man is not deserving the punishment of death; for in the name of the Lord our God hath he spoken unto us.
१६मग अधिकारी आणि सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना बोलले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराच्या नावाने आम्हाला ही वचने घोषीत केली आहे.”
17 And then rose up certain men of the elders of the land, and said to all the assembly of the people, as followeth,
१७नंतर काही वडीलधारी उभे राहिले आणि ते सभेतील सर्व लोकांस उद्देशून म्हणाले,
18 Michah the Morashthite prophesied in the days of Hezekiah the king of Judah. and said to all the people of Judah, as followeth, Thus hath said the Lord of hosts, Zion shall be ploughed up like a field, and Jerusalem shall become heaps of ruins, and the mountain of the house, woody high-places.
१८“ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरूशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.”
19 Did Hezekiah the king of Judah and all Judah attempt to put him to death? behold, he did fear the Lord, and besought the Lord, and the Lord bethought him of the evil which he had spoken against them. And shall we bring a great wickedness on our souls?
१९“तर हिज्कीया यहूदाचा राजा आणि सर्व यहूदाने मीखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला, आणि त्याच्याविरुध्द जे अरिष्ट परमेश्वराने योजिले होते, त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जिवाविरूद्ध मोठे पाप करु.”
20 And there was also a man that prophesied in the name of the Lord, Uriyah the son of Shema'yahu of Kiryath-ye'arim, who prophesied against this city and against this land in accordance with all the words of Jeremiah;
२०पूर्वी आणखी एक मनुष्य, किर्याथ-यारीमकर, शमायाचा मुलगा, उरीया, हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच भविष्य सांगितले आहेत.
21 And when king Jehoyakim, with all his mighty men, and all the princes, heard his words, the king sought to put him to death; but when Uriyahu heard it, he was afraid, and fled, and arrived in Egypt;
२१परंतू राजा यहोयाकीम, त्याचे सर्व सैन्य व अधिकाऱ्याने हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता, हे उरीयाला समजल्यावर तो घाबरला व मिसर देशात पळाला.
22 But king Jehoyakim sent some men into Egypt, namely, Elnathan the son of 'Achbor, and some men with him into Egypt:
२२पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या मनुष्याबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठवले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता,
23 And they fetched Uriyahu out of Egypt, and brought him unto king Jehoyakim, who slew him with the sword, and cast his dead body upon the graves of the common people.
२३त्या मनुष्यांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्यास यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर सामान्य लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत पाठवण्यात आले.
24 But the hand of Achikam the son of Shaphan was with Jeremiah, so as not to give him up into the hand of the people to put him to death.
२४पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्या हातातून सोडवले, जे त्यास मारणार होते.