< Exodus 35 >

1 And Moses gathered together all the congregation of the children of Israel, and said unto them, These are the things which the Lord hath commanded, that ye should do them.
मोशेने सगळ्या इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या या;
2 Six days shall work be done, but on the seventh day there shall be to you a holy day, a sabbath of rest to the Lord: whosoever doth work thereon shall be put to death.
सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्या दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही मनुष्यास अवश्य जिवे मारावे.
3 Ye shall not kindle any fire throughout your habitations upon the sabbath day.
शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या राहत असलेल्या जागेत कोठेही विस्तव पेटवू नये.
4 And Moses said unto all the congregation of the children of Israel, as followeth, This is the thing which the Lord hath commanded, saying,
मोशे सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे;
5 Take ye from among you an offering unto the Lord; whosoever is of a willing heart, let him bring it, an offering of the Lord: Gold, and silver, and copper,
परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ;
6 And blue, and purple, and scarlet yarn, and linen thread, and goats' hair,
निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;
7 And rams' skills dyed red, and badgers' skins, and shittim wood,
लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
8 And oil for the lighting, and spices, for the anointing oil, and for the incense of spices,
दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
9 And onyx stones, and stones for setting, for the ephod, and for the breastplate.
तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.
10 And all the wise-hearted among you shall come, and make all that which the Lord hath commanded:
१०“तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे
11 The tabernacle, its tent, and its covering, its hooks, and its boards, its bars, its pillars, and its sockets;
११निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या;
12 The ark, and its staves, [with] the mercy-seat, and the vail of the separation;
१२कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,
13 The table, and its staves, and all its vessels, and the showbread;
१३मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;
14 And the candlestick for the lighting, and its vessel, and its lamps, with the oil for the lighting;
१४प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल;
15 And the altar of incense, and its staves, and the anointing oil, and the incense of spices, and the hanging for the door at the entrance of the tabernacle;
१५धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;
16 The altar of burnt-offering, with its grating of copper, its staves, and all its vessels, the laver and its foot;
१६होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;
17 The hangings of the court, its pillars, and its sockets, and the hanging for the door of the court;
१७अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा;
18 The pins of the tabernacle, and the pins of the court, and their cords;
१८निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी मेखा व तणावे,
19 The cloths of service, to do service therewith in the holy place, the holy garments for Aaron the priest, and the garments of his sons, to minister in as priests.
१९पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”
20 And all the congregation of the children of Israel departed from the presence of Moses.
२०मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.
21 And they came, every man whose heart stirred him up; and every one whom his spirit made willing, brought the Lord's offering for the work of the tabernacle of the congregation, and for all its service, and for the holy garments.
२१नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वरास अर्पणे आणली.
22 And they came, the men with the women; whoever was willing-hearted, brought bracelets, and earrings, and finger-rings, and tablets, all kinds of ornaments of gold, and every man that offered an offering of gold unto the Lord.
२२ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळ्या स्त्रीपुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
23 And every man, with whom was found blue, and purple, and scarlet yarn, and linen thread, and goats' hair, and rams' skins dyed red, and badgers' skins, brought them.
२३ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.
24 Every one that did offer an offering of silver and copper brought it as the Lord's offering; and every one with whom was found shittim wood for any work of the service, brought it.
२४चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले.
25 And all the women that were wise-hearted spun with their hands, and they brought that which they had spun, of the blue, and of the purple, and of the scarlet yarn, and of the linen thread.
२५ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.
26 And all the women whose heart stirred them up in wisdom spun the goats' hair.
२६आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले.
27 And the princes brought the onyx stones, and the stones for setting, for the ephod, and for the breastplate;
२७अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.
28 And the spice and the oil, for lighting, and for the anointing oil, and for the incense of spices.
२८दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला.
29 Every man and woman, whose heart made them willing to bring for all manner of work, which the Lord had commanded to be made, by the hand of Moses, even that brought the children of Israel as a free-will offering unto the Lord.
२९परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली त्यांनीही अर्पणे आणली.
30 And Moses said unto the children of Israel, See, the Lord hath called by name Bezalel the son of Uri, the son of Chur, of the tribe of Judah;
३०तेव्हा मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, पाहा, परमेश्वराने यहूदा वंशातील ऊरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे.
31 And he hath filled him with the spirit of God, in wisdom, in understanding, and in knowledge, and in all manner of workmanship;
३१आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.
32 And to devise works of art, to work in gold, and in silver, and in copper,
३२तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीचे काम करील.
33 And in the cutting of stones, to set them, and in the carving of wood, to make any manner of work of art.
३३तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.
34 And to teach hath he put in his heart, both to him, and to Aholiab, the son of Achissamach, of the tribe of Dan.
३४परमेश्वराने त्यास आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्यांच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
35 He hath filled them with wisdom of heart, to execute all manner of work, of the engraver, and of the designing weaver, and of the embroiderer, in blue, and in purple, in scarlet yarn, and in linen thread, and of the weaver, of those that do every species of work, and of those that devise works of art.
३५कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.

< Exodus 35 >