< Numbers 12 >

1 And Mariam and Aaron spoke against Moses, because of the Ethiopian woman whom Moses took; for he had taken an Ethiopian woman.
मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले.
2 And they said, Has the Lord spoken to Moses only? has he not also spoken to us? and the Lord heard it.
ते म्हणाले, “परमेश्वर फक्त मोशेबरोबरच बोलला काय? तो आमच्याबरोबरही बोलला नाही काय? आता परमेश्वराने ते जे काय बोलले ते ऐकले.”
3 And the man Moses was very meek beyond all the men that were upon the earth.
आता पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्यापेक्षा मोशे अधिक नम्र होता.
4 And the Lord said immediately to Moses and Aaron and Mariam, Come forth all three of you to the tabernacle of witness.
तेव्हा परमेश्वर एकाएकी मोशे, अहरोन व मिर्याम ह्याच्याशी बोलला. “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा ते तिघे बाहेर आले.
5 And the three came forth to the tabernacle of witness; and the Lord descended in a pillar of a cloud, and stood at the door of the tabernacle of witness; and Aaron and Mariam were called; and both came forth.
परमेश्वर एका ढगाच्या खांबातून खाली आला मंडपाच्या प्रवेशदारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, अहरोन व मिर्याम तेव्हा ते दोघे पुढे आले.
6 And he said to them, Hear my words: If there should be of you a prophet to the Lord, I will be made known to him in a vision, and in sleep will I speak to him.
परमेश्वर म्हणाला, “आता माझे शब्द ऐका. जेव्हा माझे संदेष्टे तुमच्याबरोबर आहेत, मी स्वतः त्यांना दृष्टांतातून प्रकट होतो, आणि त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
7 My servant Moses [is] not so; he is faithful in all my house.
माझा सेवक मोशे तसा नाही.” तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.
8 I will speak to him mouth to mouth apparently, and not in dark speeches; and he has seen the glory of the Lord; and why were you not afraid to speak against my servant Moses?
मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही. तो माझे स्वरूप पाहत असतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हास भीती कशी वाटली नाही?
9 And the great anger of the Lord [was] upon them, and he departed.
परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि नंतर तो त्यांना सोडून गेला.
10 And the cloud departed from the tabernacle; and, behold, Mariam was leprous, [white] as snow; and Aaron looked upon Mariam, and, behold, she [was] leprous.
१०ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली.
11 And Aaron said to Moses, I beseech you, my lord, do not lay sin upon us, for we were ignorant wherein we sinned.
११अहरोन मोशेला म्हणाला, अहो, माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा व त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको.
12 Let her not be as it were like death, as an abortion coming out of his mother's womb, when [the disease] devours the half of the flesh.
१२कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ही मृतवत होऊ नये.
13 And Moses cried to the Lord, saying, O God, I beseech you, heal her.
१३म्हणून मोशे परमेश्वराकडे रडून म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला बरे कर.
14 And the Lord said to Moses, If her father had only spit in her face, would she not be ashamed seven days? let her be set apart seven days without the camp, and afterwards she shall come in.
१४परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.
15 And Mariam was separated without the camp seven days; and the people moved not forward till Mariam was cleansed.
१५म्हणून त्यांनी मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही.
16 And afterwards the people set forth from Aseroth, and encamped in the wilderness of Pharan.
१६त्यानंतर लोकांनी हसेरोथ सोडले आणि पारानाच्या रानापर्यंत त्यांनी प्रवास केला आणि तेथे रानातच त्यांनी आपला तळ ठोकला.

< Numbers 12 >