< Exodus 5 >
1 And after this went in Moses and Aaron to Pharao, and they said to him, These things says the Lord God of Israel, Send my people away, that they may keep a feast to me in the wilderness.
१या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”
2 And Pharao said, Who is he that I should listen to his voice, so that I should send away the children of Israel? I do not know the Lord, and I will not let Israel go.
२फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.”
3 And they say to him, The God of the Hebrews has called us to him: we will go therefore a three days' journey into the wilderness, that we may sacrifice to the Lord our God, lest at any time death or slaughter happen to us.
३मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हांशी बोलला आहे. म्हणून आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याल यज्ञार्पण करू द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”
4 And the king of Egypt said to them, Why do you, Moses and Aaron, turn the people from their works? depart each of you to your works.
४परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.
5 And Pharao said, Behold now, the people is very numerous; let us not then give them rest from their work.
५फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”
6 And Pharao gave orders to the taskmasters of the people and the accountants, saying,
६त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
7 You shall no longer give straw to the people for brick-making as yesterday and the third day; but let them go themselves, and collect straw for themselves.
७तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा.
8 And you shall impose on them daily the rate of brick-making which they perform: you shall not abate anything, for they are idle; therefore have they cried, saying, Let us arise and do sacrifice to our God.
८तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
9 Let the works of these men be made grievous, and let them care for these things, and not care for vain words.
९तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
10 And the taskmasters and the accountants hastened them, and they spoke to the people, saying, thus says Pharao, I [will] give you straw no longer.
१०म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.
11 Go you, yourselves, get for yourselves straw whenever you can find it, for nothing is diminished from your rate.
११तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत: च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”
12 So the people were dispersed in all the land of Egypt, to gather stubble for straw.
१२म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
13 and the taskmasters hastened them, saying, Fulfil your regular daily tasks, even as when straw was given you.
१३त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत.
14 And the accountants of the race of the children of Israel, who were set over them by the masters of Pharao, were scourged, [[and questioned, ] men] saying, Why have you not fulfilled your rates of brick work as yesterday and the third day, today also?
१४मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
15 And the accountants of the children of Israel went in and cried to Pharao, saying, Why do you act thus to your servants?
१५मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहा?
16 Straw is not given to your servants, and they tell us to make brick; and behold your servants have been scourged: you will therefore injure your people.
१६तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
17 And he said to them, You are idle, you are idlers: therefore you say, Let us go [and] do sacrifice to our God.
१७फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे.
18 Now then go and work, for straw shall not be given to you, yet you shall return the rate of bricks.
१८आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.
19 And the accountants of the children of Israel saw themselves in an evil plight, [men] saying, You shall not fail to deliver the daily rate of the brick-making.
१९आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
20 And they met Moses and Aaron coming forth to meet them, as they came forth from Pharao.
२०फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;
21 And they said to them, The Lord look upon you and judge you, for you have made our savor abominable before Pharao, and before his servants, to put a sword into his hands to kill us.
२१तेव्हा ते मोशे व अहरोन ह्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हांला अपमानकारक केले आहे. आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.”
22 And Moses turned to the Lord, and said, I pray, Lord, why have you afflicted this people? and therefore have you sent me?
२२मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस?
23 For from the time that I went to Pharao to speak in your name, he has afflicted this people, and you have not delivered your people.
२३मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.”