< Exodus 39 >

1 All the gold that was employed for the works according to all the fabrication of the holy things, was of the gold of the offerings, twenty-nine talents, and seven hundred and twenty shekels according to the holy shekel.
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.
2 And the offering of silver from the men that were numbered of the congregation a hundred talents, and a thousand seven hundred and seventy-five shekels, one drachm apiece, even the half shekel, according to the holy shekel.
त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
3 Every one that passed the survey from twenty years old and upwards to the [number of] six hundred thousand, and three thousand five hundred and fifty.
त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामध्ये व कातलेल्या तलम सणाच्या कापडामध्ये भरली.
4 And the hundred talents of silver went to the casting of the hundred chapiters of the tabernacle, and to the chapiters of the veil;
त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.
5 a hundred chapiters to the hundred talents, a talent to a chapiter.
एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
6 And the thousand seven hundred and seventy-five shekels he formed into hooks for the pillars, and he gilt their chapiters and adorned them.
मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.
7 And the brass of the offering [was] seventy talents, and a thousand five hundred shekels;
इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
8 and they made of it the bases of the door of the tabernacle of witness,
त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता.
9 and the bases of the court round about, and the bases of the gate of the court, and the pins of the tabernacle, and the pins of the court round about;
तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.
10 and the brazen appendage of the altar, and all the vessels of the altar, and all the instruments of the tabernacle of witness.
१०त्यामध्ये रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
11 And the children of Israel did as the Lord commanded Moses, so did they.
११दुसऱ्या रांगेत पाचू इंद्रनीलमणी व हिरा;
12 And of the gold that remained of the offering they made vessels to minister with before the Lord.
१२तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
13 And the blue that was left, and the purple, and the scarlet they made [into] garments of ministry for Aaron, so that he should minister with them in the sanctuary;
१३आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली.
14 and they brought the garments to Moses, and the tabernacle, and its furniture, its bases and its bars and the posts;
१४इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक याप्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशांच्या संख्येइतकी बारा नावे होती. एकेका रत्नावर एकेका मुलाचे नाव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
15 and the ark of the covenant, and its bearers, and the altar and all its furniture.
१५दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या.
16 And they made the anointing oil, and the incense of composition, and the pure candlestick,
१६सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या.
17 and its lamps, lamps for burning, and oil for the light,
१७ऊरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
18 and the table of show bread, and all its furniture, and the show bread upon it,
१८पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
19 and the garments of the sanctuary which belong to Aaron, and the garments of his sons, for the priestly ministry;
१९सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
20 and the curtains of the court, and the posts, and the veil of the door of the tabernacle, and the gate of the court,
२०सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
21 and all the vessels of the tabernacle and all its instruments: and the skins, even rams' skins dyed red, and the blue coverings, and the coverings of the other things, and the pins, and all the instruments for the works of the tabernacle of witness.
२१त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
22 Whatsoever things the Lord appointed Moses, so did the children of Israel make all the furniture.
२२नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.
23 And Moses saw all the works; and they had done them all as the Lord commanded Moses, so had they made them; and Moses blessed them.
२३त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.
२४मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली.
२५नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरू मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;
२६सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले.
२७अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले.
२८आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले.
२९मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
३०मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
३१ती मंदिलाभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
३२अशा प्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
३३मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणला. तंबू व तंबूच्या सर्व वस्तू म्हणजे आकड्या, फळ्या, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;
३४आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट;
३५साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन
३६मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर;
३७शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
३८सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
३९पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक:
४०अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेशदाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;
४१पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
४२परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
४३लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.

< Exodus 39 >