< Ezekiel 6 >
1 And the word of the LORD came unto me, saying,
१मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, आणि तो मला म्हणाला,
2 Son of man, set thy face toward the mountains of Israel, and prophesy against them,
२मानवाच्या मुला, आपले मुख इस्राएलाच्या पर्वताच्या विरुध्द राहून त्यांच्या विरुध्द भाकीत कर
3 And say, Ye mountains of Israel, hear the word of the Lord GOD; Thus saith the Lord GOD to the mountains, and to the hills, to the rivers, and to the valleys; Behold, I, [even] I, will bring a sword upon you, and I will destroy your high places.
३परमेश्वर देवाचा शब्द ऐका! असे इस्राएलाच्या पर्वताला जाऊन सांग, देव त्या पर्वत, दऱ्याखोऱ्यांना, झऱ्यांना सांगत आहे; ऐका! मी तुमच्या विरुध्द तलवार चालवीन, आणि मी तुमचे उच्चस्थान उध्वस्त करील.
4 And your altars shall be desolate, and your images shall be broken: and I will cast down your slain [men] before your idols.
४तुमच्या वेद्याचे खांब, तुमच्या सूर्यमूर्ती मी पाडून टाकीन, तुमचे वध पावलेले लोक तुमच्या मूर्त्यांपुढे पडतील असे परमेश्वर करीन.
5 And I will lay the dead carcases of the children of Israel before their idols; and I will scatter your bones round about your altars.
५इस्राएल लोकांचे प्रेत त्यांच्या मूर्त्यांपुढे मी टाकून देईन आणि त्यांच्या वेद्यांपुढे हाडांची पांगापांग करेन.
6 In all your dwellingplaces the cities shall be laid waste, and the high places shall be desolate; that your altars may be laid waste and made desolate, and your idols may be broken and cease, and your images may be cut down, and your works may be abolished.
६जेथे तुम्ही राहता त्या शहराच्या उच्च स्थानांचा विध्वंस करेन. म्हणून तुमच्या वेद्या, मुर्त्या, उध्वस्त केल्या जातील. त्यामुळे ते मोडकळीस येतील आणि त्यांची सर्व कामे पुसून टाकली जातील.
7 And the slain shall fall in the midst of you, and ye shall know that I [am] the LORD.
७त्यांच्या मध्ये ते मृतप्राय होतील आणि मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
8 Yet will I leave a remnant, that ye may have [some] that shall escape the sword among the nations, when ye shall be scattered through the countries.
८तरी उरलेल्यांचा मी बचाव करेन, देशातून काहींचा बचाव तलवारीपासून होईल, जेव्हा देशातून तुमची पांगापांग होईल.
9 And they that escape of you shall remember me among the nations whither they shall be carried captives, because I am broken with their whorish heart, which hath departed from me, and with their eyes, which go a whoring after their idols: and they shall lothe themselves for the evils which they have committed in all their abominations.
९ज्यांचा बचाव झाला ते माझ्या बद्दल विचार करतील जेथे ते गुलामगिरीत होते. त्यांचे मन दुराचारी झालेले, माझ्या पासून दूर आहेत, मग तीव्र तिटकारा त्यांच्या चेहऱ्यावर व डोळे मूर्तीकडे लागलेले, दुष्टपणा, घृणा त्यांची निंदा झाली होती.
10 And they shall know that I [am] the LORD, [and that] I have not said in vain that I would do this evil unto them.
१०तेव्हा त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे, त्यांच्यावर संकट आणले त्यासाठी विशेष त्यांचे कारण आहे.
11 Thus saith the Lord GOD; Smite with thine hand, and stamp with thy foot, and say, Alas for all the evil abominations of the house of Israel! for they shall fall by the sword, by the famine, and by the pestilence.
११परमेश्वर देव हे म्हणतो; “टाळ्या वाजव आपले पाय आपट, अहा! कारण इस्राएलाच्या घराण्यात सर्व प्रकारचे वाईट घृणा आहेत. त्यांच्यावर तलवार, दुष्काळ, साथीचा रोग येईल.
12 He that is far off shall die of the pestilence; and he that is near shall fall by the sword; and he that remaineth and is besieged shall die by the famine: thus will I accomplish my fury upon them.
१२जे लांब असतील ते साथीच्या रोगाने मरतील जे जवळ असतील ते तलवारीने मरतील, उरलेले लोक दुष्काळाने मरतील; मी त्यांच्या विरुध्द असलेला संताप पूर्ण करेन.
13 Then shall ye know that I [am] the LORD, when their slain [men] shall be among their idols round about their altars, upon every high hill, in all the tops of the mountains, and under every green tree, and under every thick oak, the place where they did offer sweet savour to all their idols.
१३मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा त्यांचे मस्तक त्यांच्या वेद्यांपुढे उच्च ठिकाणी ओक झाडा शेजारी, हिरव्या छाये खाली पडलेले असतील, जेथे ते मुर्त्यांना सुगंधी द्रव्य अर्पण करीत होते!
14 So will I stretch out my hand upon them, and make the land desolate, yea, more desolate than the wilderness toward Diblath, in all their habitations: and they shall know that I [am] the LORD.
१४मी आपले सामर्थ्य त्यांना दाखवीन, आणि त्यांच्या भूमीचा पूर्ण विध्वंस करेन, त्यांचे राहण्याची ठिकाणे दिबलायाकडे व ज्या जागी ते राहत होते जवळपास सर्व ठिकाणे वाया घालवीन, मग त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”