< Psalms 67 >
1 God be merciful unto us, and bless us; and cause his face to shine upon us; (Selah)
१देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
2 That your way may be known upon earth, your saving health among all nations.
२याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
3 Let the people praise you, O God; let all the people praise you.
३हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
4 O let the nations be glad and sing for joy: for you shall judge the people righteously, and govern the nations upon earth. (Selah)
४राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
5 Let the people praise you, O God; let all the people praise you.
५हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 Then shall the earth yield her increase; and God, even our own God, shall bless us.
६भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
7 God shall bless us; and all the ends of the earth shall fear him.
७देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.