< Psalms 142 >
1 Maschil of David, when he was in the cave; a Prayer. With my voice I cry unto the LORD; with my voice I make supplication unto the LORD.
१दाविदाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.
2 I pour out my complaint before Him, I declare before Him my trouble;
२मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो.
3 When my spirit fainteth within me — Thou knowest my path — in the way wherein I walk have they hidden a snare for me.
३जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.
4 Look on my right hand, and see, for there is no man that knoweth me; I have no way to flee; no man careth for my soul.
४माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.
5 I have cried unto Thee, O LORD; I have said: 'Thou art my refuge, my portion in the land of the living.'
५हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.
6 Attend unto my cry; for I am brought very low; deliver me from my persecutors; for they are too strong for me.
६माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
7 Bring my soul out of prison, that I may give thanks unto Thy name; the righteous shall crown themselves because of me; for Thou wilt deal bountifully with me.
७मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.