< Ruth 2 >
1 Then Naomis husband had a kinsman, one of great power of the familie of Elimelech, and his name was Boaz.
१नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते.
2 And Ruth ye Moabitesse said vnto Naomi, I pray thee, Let mee goe to the fielde, and gather eares of corne after him, in whose sight I finde fauour. And she said vnto her, Goe my daughter.
२मवाबी रूथ नामीला म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्यामागे मी धान्याचा सरवा वेचीत जाईन.” तेव्हा तिने म्हटले, “माझ्या मुली, जा.”
3 And she went, and came and gleaned in the fielde after the reapers, and it came to passe, that she met with the portion of the fielde of Boaz, who was of the familie of Elimelech.
३मग ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा असे झाले की, शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता.
4 And behold, Boaz came from Beth-lehem, and saide vnto the reapers, The Lord be with you: and they answered him, The Lord blesse thee.
४आणि पाहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.”
5 Then saide Boaz vnto his seruant that was appointed ouer the reapers, Whose maide is this?
५मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?”
6 And the seruant that was appointed ouer the reapers, answered, and said, It is the Moabitish maide, that came with Naomi out of the countrey of Moab:
६कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे.
7 And shee saide vnto vs, I pray you, let mee gleane and gather after the reapers among the sheaues: so shee came, and hath continued from that time in the morning vnto now, saue that she taried a litle in the house.
७ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.”
8 Then said Boaz vnto Ruth, Hearest thou, my daughter? goe to none other fielde to gather, neither goe from hence: but abide here by my maydens.
८बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा.
9 Let thine eyes be on the field that they do reape, and goe thou after the maidens. Haue I not charged the seruants, that they touche thee not? Moreouer whe thou art a thirst, go vnto ye vessels, and drinke of that which ye seruants haue drawen.
९हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी या लोकांस तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागल्यास पाण्याच्या भांड्याकडे जाऊन नोकरांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.”
10 Then shee fell on her face, and bowed her selfe to the ground, and said vnto him, How haue I found fauour in thine eyes, that thou shouldest know me, seeing I am a stranger?
१०तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?”
11 And Boaz answered, and said vnto her, All is told and shewed me that thou hast done vnto thy mother in lawe, since the death of thine husband, and how thou hast left thy father and thy mother, and ye land where thou wast borne, and art come vnto a people which thou knewest not in time past.
११बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई-वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे.
12 The Lord recompense thy worke, and a ful reward be giuen thee of the Lord God of Israel, vnder whose wings thou art come to trust.
१२परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्राएलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देवो.”
13 Then she saide, Let me finde fauour in thy sight, my lord: for thou hast comforted mee, and spoken comfortably vnto thy mayde, though I be not like to one of thy maydes.
१३मग ती म्हणाली, “माझ्या प्रभू, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”
14 And Boaz said vnto her, At the meale time come thou hither, and eat of the bread, and dippe thy morsell in the vineger. And she sate beside the reapers, and hee reached her parched corne: and shee did eate, and was sufficed, and left thereof.
१४भोजन करतेवेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव.” कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.
15 And when she arose to gleane, Boaz commanded his seruants, saying, Let her gather among the sheaues, and doe not rebuke her.
१५ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्याला सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका.
16 Also let fall some of the sheaues for her, and let it lie, that she may gather it vp, and rebuke her not.
१६आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.”
17 So she gleaned in the fielde vntill euening, and she thresshed that shee had gathered, and it was about an Ephah of barly.
१७तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले.
18 And she tooke it vp, and went into the citie, and her mother in law saw what she had gathered: Also she tooke foorth, and gaue to her that which she had reserued, when she was sufficed.
१८ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले.
19 Then her mother in lawe saide vnto her, Where hast thou gleaned to day? and where wroughtest thou? blessed be he, that knewe thee. And she shewed her mother in lawe, with whome she had wrought, and saide, The mans name, with whom I wrought to day, is Boaz.
१९तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचला? आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली, त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात आज काम केले ते तिने सासूला सांगितले. ती म्हणाली, “ज्याच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज आहे.”
20 And Naomi said vnto her daughter in law, Blessed be he of the Lord: for he ceaseth not to doe good to the liuing and to the dead. Againe Naomi saide vnto her, The man is neere vnto vs, and of our affinitie.
२०नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा मनुष्य आपल्या नातलगांपैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.”
21 And Ruth the Moabitesse said, He said also certainely vnto mee, Thou shalt be with my seruants, vntill they haue ended all mine haruest.
२१मग मवाबी रूथने सांगितले; “तो मला असेही म्हणाला की, ‘माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा.’”
22 And Naomi answered vnto Ruth her daughter in lawe, It is best, my daughter, that thou goe out with his maides, that they meete thee not in an other fielde.
२२नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच नोकरीणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.”
23 Then she kept her by the maides of Boaz, to gather vnto the end of barly haruest, and of wheate haruest, and dwelt with her mother in lawe.
२३या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरीणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.