< Isaiah 1 >
1 A vision of Isaiah, the sonne of Amoz, which he sawe concerning Iudah and Ierusalem: in the dayes of Vzziah, Iotham, Ahaz and Hezekiah Kings of Iudah.
१आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला.
2 Heare, O heauens, and hearken, O earth: for the Lord hath sayde, I haue nourished and brought vp children, but they haue rebelled against me.
२हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः “मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली.
3 The oxe knoweth his owner, and the asse his masters crib: but Israel hath not knowen: my people hath not vnderstand.
३बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”
4 Ah, sinfull nation, a people laden with iniquitie: a seede of the wicked, corrupt children: they haue forsaken the Lord: they haue prouoked the holy one of Israel to anger: they are gone backewarde.
४अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे.
5 Wherefore shoulde ye be smitten any more? for ye fall away more and more: the whole head is sicke, and the whole heart is heauie.
५तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे.
6 From the sole of the foote vnto the head, there is nothing whole therein, but wounds, and swelling, and sores full of corruption: they haue not bene wrapped, nor bound vp, nor mollified with oyle.
६पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही; फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही.
7 Your land is waste: your cities are burnt with fire: strangers deuoure your lande in your presence, and it is desolate like the ouerthrowe of strangers.
७तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत. परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत.
8 And the daughter of Zion shall remaine like a cotage in a vineyarde, like a lodge in a garden of cucumbers, and like a besieged citie.
८सियोनाची कन्या ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी, काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे.
9 Except the Lord of hostes had reserued vnto vs, euen a small remnant: we should haue bene as Sodom, and should haue bene like vnto Gomorah.
९जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती.
10 Heare the worde of the Lord, O princes of Sodom: hearken vnto the Law of our God, O people of Gomorah.
१०सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.
11 What haue I to doe with the multitude of your sacrifices, sayth the Lord? I am full of the burnt offerings of rams, and of the fat of fed beasts: and I desire not the blood of bullocks, nor of lambs, nor of goates.
११परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे? जळालेल्या मेंढरांची अर्पणे, प्राण्यांची चरबी ही मला आता पुरेशी झाली आहेत; आणि तसेच बैल, कोंकरे, किंवा शेळ्या यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही;”
12 When ye come to appeare before me, who required this of your hands to tread in my courts?
१२जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले?
13 Bring no more oblations, in vaine: incense is an abomination vnto me: I can not suffer your newe moones, nor Sabbaths, nor solemne dayes (it is iniquitie) nor solemne assemblies.
१३पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही.
14 My soule hateth your newe moones and your appointed feastes: they are a burden vnto me: I am weary to beare them.
१४तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे.
15 And when you shall stretch out your hands, I wil hide mine eyes from you: and though ye make many prayers, I wil not heare: for your hands are full of blood.
१५म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत.
16 Wash you, make you cleane: take away the euill of your workes from before mine eyes: cease to doe euill.
१६स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा;
17 Learne to doe well: seeke iudgement, relieue the oppressed: iudge the fatherlesse and defend the widowe.
१७चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.
18 Come nowe, and let vs reason together, sayth the Lord: though your sinnes were as crimsin, they shalbe made white as snowe: though they were red like skarlet, they shalbe as wooll.
१८परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.
19 If ye consent and obey, ye shall eate the good things of the land.
१९जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल.
20 But if ye refuse and be rebellious, ye shalbe deuoured with the sword: for the mouth of the Lord hath spoken it.
२०परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.
21 Howe is the faithfull citie become an harlot? it was full of iudgement, and iustice lodged therein, but now they are murtherers.
२१विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती, पण ती आज खुन्यांनी भरून गेली आहे.
22 Thy siluer is become drosse: thy wine is mixt with water.
२२तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे.
23 Thy Princes are rebellious and companions of theeues: euery one loueth giftes, and followeth after rewards: they iudge not the fatherlesse, neither doeth the widowes cause come before them.
२३तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.
24 Therefore sayth the Lord God of hostes, the mightie one of Israel, Ah, I will ease me of mine aduersaries, and auenge me of mine enemies.
२४यांकरीताच प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो कीः “त्यांचा नाश होवो! मी माझ्या विरोधकांचा सूड घेईन, आणि माझ्या शत्रू विरूद्ध मी स्वतः बदला घेईन;
25 Then I will turne mine hand vpon thee, and burne out thy drosse, till it be pure, and take away all thy tinne.
२५मी तुजविरूद्ध आपला हात वळवून, तुझे शुद्धीकरण करून तुझ्यातील निरुपयोगी गोष्टी काढून सर्व प्रकारची अशुद्धता दूर करीन.
26 And I will restore thy iudges as at the first, and thy counsellers as at the beginning: afterward shalt thou be called a citie of righteousnes, and a faithfull citie.
२६मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन, त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.”
27 Zion shall be redeemed in iudgement, and they that returne in her, in iustice.
२७सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल.
28 And the destruction of the transgressers and of the sinners shalbe together: and they that forsake the Lord, shalbe consumed.
२८बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल.
29 For they shalbe confounded for the okes, which ye haue desired, and ye shall be ashamed of the gardens, that ye haue chosen.
२९“तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल, आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील.
30 For ye shalbe as an oke, whose leafe fadeth: and as a garden that hath no water.
३०कारण तुम्ही पाने कोमजलेल्या एलाच्या झाडाप्रमाणे, व पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.
31 And the strong shall be as towe, and the maker thereof, as a sparke: and they shall both burne together, and none shall quench them.
३१बलाढ्य मनुष्य वाळलेल्या झाडाच्या ढिलपीप्रमाणे दुर्बल होईल व त्याची कामे जाळाच्या लहानशा ठिणगीसारखी राहतील; ती दोन्ही एकत्र जाळण्यात येतील, तो त्यास कोणीही विझवणार नाही.”