< Isaiah 42 >
1 Behold, my seruaunt: I will stay vpon him: mine elect, in whom my soule deliteth: I haue put my Spirit vpon him: he shall bring forth iudgement to the Gentiles.
१पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील.
2 He shall not crie, nor lift vp, nor cause his voice to be heard in the streete.
२तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही.
3 A bruised reede shall hee not breake, and the smoking flaxe shall he not quench: he shall bring foorth iudgement in trueth.
३तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल.
4 He shall not faile nor be discouraged till he haue set iudgement in the earth: and the yles shall waite for his lawe.
४पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील.
5 Thus sayeth God the Lord (he that created the heauens and spred them abroad: he that stretched foorth the earth, and the buddes thereof: he that giueth breath vnto the people vpon it, and spirit to them that walke therein)
५परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे; तो त्यावरील लोकांस श्वास देतो आणि त्यावर राहणाऱ्यांना जिवन देतो;
6 I the Lord haue called thee in righteousnesse, and will hold thine hand, and I will keepe thee, and giue thee for a couenant of the people, and for a light of the Gentiles,
६मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन.
7 That thou maist open the eyes of the blind, and bring out the prisoners from the prison: and them that sitte in darkenesse, out of the prison house.
७आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून आणि अंधारात बसलेल्यांना बंदीगृहातून सोडवावे.
8 I am the Lord, this is my Name, and my glory wil I not giue to another, neither my praise to grauen images.
८“मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.
9 Beholde, the former thinges are come to passe, and newe things doe I declare: before they come foorth, I tell you of them.
९पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.”
10 Sing vnto the Lord a newe song, and his praise from the ende of the earth: yee that goe downe to the sea, and all that is therein: the yles and the inhabitants thereof.
१०परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून, जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा.
11 Let the wildernesse and the cities thereof lift vp their voyce, the townes that Kedar doeth inhabite: let the inhabitants of the rocks sing: let them shoute from the toppe of the mountaines.
११वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा! सेलात राहणाऱ्यांनो गायन करोत, डोंगरमाथ्यावरून आरोळी करोत.
12 Let them giue glorie vnto the Lord, and declare his praise in the ylands.
१२त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत.
13 The Lord shall go forth as a gyant: he shall stirre vp his courage like a man of warre: he shall shout and crie, and shall preuaile against his enemies.
१३परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील.
14 I haue a long time holden my peace: I haue beene still and refrained my selfe: nowe will I crie like a trauailing woman: I will destroy and deuoure at once.
१४बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला; आता मी प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मोठ्याने ओरडेन, मी उसासे व धापा टाकीन.
15 I will make waste mountaines, and hilles, and drie vp all their herbes, and I will make the floods ylands, and I will drie vp the pooles.
१५मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन; आणि मी नद्यांची बेटे करीन आणि पाणथळ जमीन कोरडी करीन.
16 And I will bring the blinde by a way, that they knewe not, and lead them by paths that they haue not knowen: I will make darkenesse light before them, and crooked thinges straight. These thinges will I doe vnto them, and not forsake them.
१६मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही.
17 They shall be turned backe: they shall be greatly ashamed, that trust in grauen images, and say to the molten images, Yee are our gods.
१७जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात, तुम्ही आमचे देव आहात. ते मागे वळतील, ते पूर्णपणे लज्जित होतील.
18 Heare, ye deafe: and ye blinde, regarde, that ye may see.
१८तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा.
19 Who is blinde but my seruaunt? or deafe as my messenger, that I sent? who is blind as the perfit, and blinde as the Lordes seruant?
१९माझ्या सेवकाशिवाय कोण आंधळा आहे? किंवा ज्याला मी पाठवले त्या माझ्या निरोप्यासारखा बहिरा कोण आहे? माझ्या कराराच्या भागीदारासारखा किंवा परमेश्वराच्या सेवकासारखा आंधळा कोण आहे?
20 Seeing many things, but thou keepest them not? opening the eares, but he heareth not?
२०तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही.
21 The Lord is willing for his righteousnesse sake that he may magnifie the Lawe, and exalt it.
२१परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला.
22 But this people is robbed and spoiled, and shalbe all snared in dungeons, and they shalbe hid in prison houses: they shall be for a pray, and none shall deliuer: a spoile, and none shall say, Restore.
२२पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत; ते सर्व खड्ड्यामध्ये सापळ्यात पडलेले आहेत, तुरुंगात कैदी झाले आहेत; ते सर्व लूट असे झाले आहेत त्यांना सोडवणारा कोणी नाही आणि त्यांना परत माघारी म्हणणारा कोणी नाही!
23 Who among you shall hearken to this, and take heede, and heare for afterwardes?
२३तुमच्यातील याकडे कोण कान देईल? भविष्यात कोण कान देऊन ऐकेल आणि श्रवण करील?
24 Who gaue Iaakob for a spoyle, and Israel to the robbers? Did not ye Lord, because we haue sinned against him? for they woulde not walke in his waies, neither be obedient vnto his Lawe.
२४याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले? ज्या परमेश्वराविरूद्ध आम्ही पाप केले, त्याच्या मार्गाने चालण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याचे नियम पाळण्याचे त्यांनी नाकारले त्यानेच की नाही?
25 Therefore hee hath powred vpon him his fierce wrath, and the strength of battell: and it set him on fire round about, and he knewe not, and it burned him vp, yet he considered not.
२५म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.