< Numbers 9 >

1 The Lord spoke to Moses in the Sinai desert in the first month of the second year after Israel had left Egypt. He told him,
मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला,
2 “The Israelites are to keep the Passover at its designated time.
“इस्राएल लोकांस वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.
3 Observe it at the time required—in the evening after sunset on the fourteenth day of this month, and do so in accordance with its rules and regulations.”
या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्या वेळी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.”
4 Moses told the Israelites to observe the Passover.
मग मोशेने इस्राएल लोकांस वल्हांडण सण पाळावयास सांगितले.
5 So they kept the Passover in the Sinai desert, beginning in the evening after sunset on the fourteenth day of the first month. The Israelites followed all the instructions the Lord had given to Moses.
तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
6 However, there were some men who were unclean because they had been contact with a dead body, so they could not keep the Passover on that day. They went to see Moses and Aaron the same day
त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले.
7 and explained to Moses, “We are unclean because of a dead body, but why should that mean we're prevented from giving our offering to the Lord with the other Israelites at the appropriate time?”
ती माणसे मोशेस म्हणाली, “एका मृत मनुष्यामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हास दूर कां ठेवत आहेस?”
8 “Stay here while I find out what the Lord's instructions are concerning you,” Moses responded.
मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.”
9 The Lord told Moses,
मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
10 “Tell the Israelites: ‘If you or your descendants are unclean because of a dead body, or are away traveling, you can still keep the Lord's Passover.
१०तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा.
11 You are to observe it in the evening after sunset on the fourteenth day of the second month. You are to eat the lamb with the bread made without yeast, and the bitter herbs.
११त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा.
12 You must not leave any of it until the following morning and you must not break any of its bones. You must observe the Passover according to all the regulations.
१२त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत.
13 However, anyone ceremonially clean and not away traveling who neglects to observe the Passover must be expelled from their people, because they didn't present the Lord's offering at the appropriate time. They will bear the responsibility for the consequences of their sin.
१३परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्यास आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वेळी केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे.
14 Any foreigners living among you who want to observe the Lord's Passover can do so following the Passover rules and regulations. The same rules apply to the foreigners as they do to you.’”
१४जर तुमच्यामध्ये एखाद्या परराष्ट्रीय मनुष्य राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत.
15 The cloud covered the Tent of the Testimony (the Tabernacle) on the day that it was set up, and looked like fire above it from evening until the morning.
१५ज्या दिवशी निवासमंडप उभा करण्यात आला, निवासमंडपाला, कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवासमंडपावर होता. तो सकाळपर्यंत अग्नीसारखा दिसला.
16 It was always like this. The cloud covered the Tabernacle during the day and at night it looked like fire.
१६अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे.
17 When the cloud rose from over the Tent, the Israelites would move on, and where the cloud stopped, the Israelites would set up camp there.
१७जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्राएल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत.
18 The Israelites moved on when the Lord told them to, and set up camp when the Lord told them to. While the cloud stayed over the Tabernacle, they remained camped there.
१८परमेश्वराच्या आज्ञेवरून, इस्राएल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवासमंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत.
19 Even if the cloud didn't move for a long time, the Israelites did what the Lord told them and didn't move on.
१९जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते.
20 Sometimes the cloud only stayed over the Tabernacle for a few days. As always they followed the Lord's command as to whether to camp or to move on.
२०काहीवेळेला ढग थोडेच दिवस निवासमंडपावर राहत असे. याबाबतीत, ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवासास निघत.
21 Sometimes the cloud only stayed overnight, so when it rose in the morning they would move on. Whenever the cloud rose, day or night, they would leave.
२१काहीवेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यंत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर गेले की, ते एकसारखा प्रवास करीत असत.
22 If the cloud stayed in one place for two days, or a month, or longer, the Israelites stayed where they were and didn't leave as long as the cloud remained over the Tabernacle. However, once it rose, they would leave.
२२जर ढग निवासमंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्राएल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासास निघत.
23 They camped when the Lord told them to, and left when he told them to. They followed the Lord's instructions that he gave to Moses.
२३परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.

< Numbers 9 >