< Micah 3 >

1 Then I said, “Please listen, leaders of the descendants of Jacob, people of Israel. You are meant to know the difference between right and wrong,
मी म्हणालो, “याकोबाच्या अधिकाऱ्यांनो, आणि इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका,
2 you who hate good and love evil! You tear off their skin, and rip the flesh from their bones.
जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
3 You eat the flesh of my people, you strip off their skin, you break their bones. You chop them up like meat for the saucepan, like flesh for the cooking pot.”
जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, आणि जसे पातेल्यांत घालण्यासाठी त्याचे तुकडे करता, तशी जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय?
4 Then they'll cry out to the Lord, but he won't answer them. He will turn away from them at that time because of the evil things they have done.
आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल. कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.”
5 This is what the Lord says about the prophets who deceive my people. To those who feed them they prophesy peace to them, while to those who do not they prophesy war against them.
जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकवितात, ज्यांनी अन्नपाणी दिले त्यांच्यासाठी, ते घोषणा करतात की, समृद्धी नांदेल. पण जर कोणी त्यांच्या मुखांत काही घातले नाही, तर हे संदेष्टे किंचाळतात, युध्दाला तयार होतात, त्यांच्या विषयी परमेश्वर असे म्हणतो.
6 Therefore it will be like night for you, with no visions; dark, with no predictions. The sun will set on these prophets; their day will end in darkness.
“म्हणून ही जणू काही तुमची रात्र असेल, पण तुम्हास दृष्टांत होणार नाही. तुम्ही अंधारात असाल, पण त्यामुळे तुम्ही भविष्य पाहणार नाही. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळेल, आणि दिवस त्यांच्यावर काळोख असा होईल.
7 The seers will be disgraced, the fortune-tellers put to shame, and they will cover their faces because none of them receive any answer from God.
द्रष्टे लाजविले जातील आणि ज्योतिषी गोंधळून जातील. ते सर्व आपले ओठ झाकतील, कारण माझ्याकडून त्यांना उत्तर मिळणार नाही.
8 But as for me, I am filled with power, with the spirit of the Lord. I am filled with justice and strength to make clear to the descendants of Jacob their rebellion, and to the people of Israel their sin.
पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने, चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याचा अपराध व इस्राएलाला, त्याचे पाप दाखवावे.”
9 Listen to me, leaders of the descendants of Jacob and the people of Israel, you who hate justice and distort all that is right.
याकोबाच्या घराण्यातल्या पुढाऱ्यांनो आणि इस्राएल घराण्याच्या अधिकाऱ्यांनो, जे तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता व सरळ गोष्टीला वाकडी करता, आता हे ऐका,
10 You are building Zion with blood, and Jerusalem with evil.
१०तुम्ही सियोन रक्ताने आणि यरूशलेम अन्यायाने बांधले आहे.
11 Your leaders judge for a bribe, and your priests teach for a price, and your prophets only prophesy for pay. Yet they all lean on the Lord saying, “Isn't the Lord here with us? Nothing bad can happen to us!”
११तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”
12 Therefore because of you Zion will become a ploughed field and Jerusalem a heap of rubble, and the Temple mount will be overgrown.
१२ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.

< Micah 3 >