< Jeremiah 41 >

1 In the seventh month of the year, Ishmael son of Nethaniah, son of Elishama, a member of the royal family and one of the king's chief officers, came with ten of his men to see Gedaliah at Mizpah. While they were eating to have a meal together,
पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.
2 suddenly Ishmael and his ten men got up and attacked Gedaliah, killing him—the one appointed by the king of Babylon as the country's governor.
पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.
3 Ishamel also killed all the other Judeans who were with Gedaliah at Mizpah, along with the Babylonian soldiers there.
नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले.
4 The day after Gedaliah had been murdered and before anyone knew about it,
गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,
5 a group of eighty men arrived from Shechem, Shiloh, and Samaria. They had shaved off their beards, torn their clothes, and cut themselves. They were carrying grain offerings and frankincense for the Lord's Temple.
शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.
6 Ishmael came out to meet them from Mizpah, weeping as he went along. When Ishmael met the men, he said, “Come and see what's happened to Gedaliah son of Ahikam!”
तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”
7 But when they arrived in town, Ishmael and his men killed most of them and threw their bodies into a cistern.
मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.
8 But ten of them pleaded with Ishmael, “Don't kill us! We've got some good things hidden in the fields—wheat, barley, olive oil, and honey.” So Ishmael didn't kill them along with the others.
पण त्यांच्यातील दहा माणसे इश्माएलाला म्हणाली, “आम्हास मारु नको, कारण आमच्याजवळ गहू व सातू, तेल व मध यांचे साठे आम्ही शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने त्यांना इतर सहकाऱ्यासारखे मारले नाही.
9 (The cistern where Ishmael had thrown all the bodies of the men he'd killed, including Gedaliah, was a large one that King Asa had dug because of the threat of attack by Baasha king of Israel. Ishmael filled it with bodies.)
जी माणसे जिवे मारली त्या सर्वांची प्रेते इश्माएलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती हा मोठा खड्डा आसा राजाने खणला होता जेव्हा इस्राएलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला.
10 Then Ishmael took all the people left in Mizpah prisoner, including the daughters of the king, as well as everyone else living there. These were the people that Nebuzaradan the commander of the guard had put under the care of Gedaliah. Ishmael took them prisoner and left to go to the Ammonites.
१०पुढे जे मिस्पात होते त्या इतर सर्व लोकांस इश्माएलाने पकडले, राजाच्या मुली व जे सर्व लोक मागे मिस्पात राहिले होते ज्यांना अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला त्यावर नेमले होते. म्हणून नथन्याचा मुलगा इश्माएल याने त्यांना पकडून आणि अम्मोनी लोकांकडे पार जाण्यास निघाला.
11 Johanan and all the army commanders of the armies with him found out about all of Ishmael's crimes.
११पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली.
12 So they assembled all their men and went to attack Ishmael. They caught up with him near the large pool in Gibeon.
१२म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला.
13 When Ishmael's prisoners saw Johanan and all the army commanders with him, they were happy.
१३मग असे झाले की, जे सर्व लोक इश्माएलाबरोबर होते त्यांनी जेव्हा कारेहाचा मुलगा योहानान याला व जे सर्व सैन्याधिकारी त्याच्याबरोबर होते त्यांना पाहिले, ते खूप आनंदीत झाले.
14 All those that Ishmael had taken prisoner at Mizpah turned around and ran back to Johanan.
१४नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.
15 Ishmael and eight of his men managed to escape from Johanan and get away to the Ammonites.
१५पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.
16 Then Johanan and all the army commanders with him took charge of the survivors from Mizpah he'd rescued from Ishmael in Gibeon—the soldiers, women, children, and court officials that Ishmael had taken prisoner after he'd killed Gedaliah.
१६नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.
17 They set off for Geruth Chimham near Bethlehem and stayed there, before leaving for Egypt
१७मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते
18 to get away from the Babylonians. They were afraid of what the Babylonians would do because Ishmael had assassinated Gedaliah, the governor of the country appointed by the king of Babylon.
१८खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.

< Jeremiah 41 >