< Ezekiel 5 >
1 “Son of man, go and shave your head and your beard using a sharp sword like a barber's razor. Then divide up the hair using a set of scales.
१“मग मानवाच्या मुला, स्वतःसाठी न्हाव्याच्या वस्तऱ्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर
2 Once the days of the siege have finished, burn up one third of the hair inside the city; slash at another third with a sword around the city; and scatter another third in the wind. I will let loose a sword behind them to chase them.
२वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्य भागी जाळून टाक. आणि तिसरा भाग तलवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल.
3 Take just a few hairs and tuck them into the hem of your clothes.
३थोडेसे केस कापून आपल्या कपड्याला बांधून टाक.
4 Take some of these and toss them into the fire to burn them. A fire will spread from there to burn everyone in Israel.
४काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे, आणि त्यास जाळून टाक, म्हणजे इस्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल.
5 This is what the Lord God says: This represents Jerusalem. I placed her right in the middle of the nations, surrounded by other countries.
५परमेश्वर देव म्हणतो, ही यरूशलेम नगरी, जी इतर राष्ट्रांमध्ये आहे, जेथे मी तिला स्थापीले, आणि मी तिला इतर देशांनी आजूबाजुने वेढीले आहे.
6 But she rebelled against my rules, acting more wickedly than the nations, and she defied my regulations more than the countries surrounding her. Her people rejected my rules and refused to follow my regulations.
६पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहून माझा धिक्कार केला आहे, आणि त्यांनी माझ्या न्यायीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे.
7 Consequently this is what the Lord God says: You have caused more trouble than the nations around you. You refused to follow my rules and keep my regulations. In fact you didn't even live up to the standards of the nations surrounding you.
७म्हणून परमेश्वर देव असे सांगतो; तुम्ही आजूबाजुच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहून अधिक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही.
8 So this is what the Lord God says: Watch out, because it's me who is condemning you, Jerusalem! I'm going to carry out my sentence against you while the other nations watch.
८म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेन! तुम्हास केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल.
9 Because of all the disgusting things you've done, I'm going to do to you what I've never done before—and I won't ever do again.
९तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे, मी आजवर केले नाही, आणि करणार नाही, असे मी तुझ्यासोबत करेल.
10 In your city parents will eat their own children, and children will eat their parents. I'm going to punish you and scatter in every directions those who are left.
१०तथापि बाप मुलांना, आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकून देईल.
11 As I live, declares the Lord God, because you have made my sanctuary unclean with all your offensive idols and disgusting practices, I will stop treating you well. I won't be kind to you—I won't show you any pity.
११म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.
12 A third of your people will die from disease or starvation inside the city; a third will be killed by the sword outside the city walls; and a third I will scatter in the wind in all directions, and let loose a sword behind them to chase them.
१२घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील.
13 Once my anger is over and I've finished punishing them, then I'll be satisfied. When I've finished punishing them, then they'll know that I, the Lord, meant what I said when I spoke so strongly.
१३तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल, परमेश्वर देव हे सर्व त्याच्या विरोधात आवेशाने म्हणाला.
14 I'm going to ruin you and humiliate you in front of the nations surrounding you, in the sight of every passer-by.
१४तुझ्या आजूबाजुच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेन, जे तुझ्या आजूबाजूने येणारे जाणारे ते पहातील.
15 You will be criticized and mocked, you'll be a warning and something horrifying to the surrounding nations when I carry out my sentence against you in my rage and furious anger. I the Lord have spoken.
१५यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो.
16 When I pour down on you deadly arrows of famine and destruction they're intended to kill you. I will make your famine worse by stopping your food supply.
१६तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेन;
17 I will send famine and wild animals to attack you. You'll have no children left. Disease and killing will sweep over you, and I will bring armies to attack you. I the Lord have spoken.”
१७दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवीन, तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे परमेश्वर देव म्हणतो.”