< Exodus 3 >

1 Moses was a shepherd, looking after the flock of Jethro, his father-in-law, the Midianite priest. He led the flock far into the wilderness until he came to God's mountain, Mount Horeb.
तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला.
2 There the angel of the Lord appeared to him in a flame of fire from inside a bush. Moses looked carefully and saw that though the bush was on fire, it wasn't being burned up.
तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास एका झुडपातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत दर्शन दिले. मोशेने पाहिले की, झुडूप अग्नीने जळत होते, परंतु ते जळून भस्म होत नव्हते.
3 “Let me go over and take a look,” Moses said to himself. “It's very odd to see a bush that's not burning up.”
मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.”
4 When the Lord saw that Moses was coming to take a look, God called to him from inside the bush, “Moses! Moses!” “I'm here,” Moses replied.
मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.”
5 “Don't come any closer!” God told him. “Take off your sandals because you're standing on holy ground.”
देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.
6 Then he said, “I am the God of your father, the God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob.” Moses covered his face, because he was afraid to look at God.
तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहायला तो घाबरला.
7 “I'm completely aware of the misery of my people in Egypt,” the Lord told him. “I have heard them crying out because of their taskmasters. I know how much they're suffering.
परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु: ख मी जाणून आहे.
8 That's why I have come down to rescue them from Egyptian oppression and to take them up from that country to a productive, wide-open land—a land flowing with milk and honey—where currently the Canaanites, Hittites, Amorites, Perizzites, Hivites, and Jebusites are living.
त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
9 Listen! The cries of the Israelites have reached me, and I have seen how badly the Egyptians are mistreating them.
तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे.
10 Now you must leave, because I'm sending you to Pharaoh to lead my people Israel out of Egypt.”
१०तर आता, माझ्या इस्राएली लोकांस मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी मी तुला फारोकडे पाठवत आहे.”
11 But Moses said to God, “Why me? I'm a nobody! I couldn't go to Pharaoh and lead the Israelites out of Egypt!”
११परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांस मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?”
12 “I'll be with you,” the Lord replied, “and this will be the sign that it is really me who is sending you: when you have led the people out of Egypt, you will worship God at this very mountain.”
१२देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”
13 Then Moses said to God, “Look! If I were to go to the Israelites and say to them, ‘The God of your fathers has sent me to you,’ and they ask me, ‘What is his name?’ —then what should I tell them?”
१३मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”
14 God replied to Moses, “‘I Am’ is who I am. Tell the Israelites this: ‘I Am’ has sent me to you.”
१४देव मोशेस म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांस सांग, मी आहे याने मला तुम्हांकडे पाठवले आहे.”
15 Then God said to Moses, “Tell the Israelites, ‘The Lord, the God of your fathers, the God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob—has sent me to you. This is my name forever, the name you are to call me for all generations to come.’
१५देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हांकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे, व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल;
16 Go, and call all the elders of Israel to meet with you. Tell them, ‘The Lord, the God of your fathers, has appeared to me—the God of Abraham, Isaac, and Jacob. He said, “I have paid close attention to what's been happening to you in Egypt.
१६तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांना एकत्रित करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हांकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हांसोबत काय घडले आहे हे मला कळले आहे.
17 I have decided to take you away from the misery you're having in Egypt and bring you to the land of the Canaanites, Hittites, Amorites, Perizzites, Hivites, and Jebusites, a land flowing with milk and honey.”
१७आणि मी तुम्हास मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन व कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईन, असे मी सांगितले आहे हे त्यांना कळव.
18 “The elders of Israel will accept what you say. Then you must go with them to the king of Egypt and tell him, ‘The Lord, the God of the Hebrews has revealed himself to us. So please let us go three days journey into the desert so we can offer sacrifices to the Lord our God there.’
१८ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.
19 But I know that the king of Egypt won't let you go unless he's forced to do so by a power stronger than him.
१९परंतु मला माहीत आहे की, मिसराचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास माझे बाहुबल दाखविले तरी तो तुम्हास जाऊ देणार नाही;
20 So I will use my power to inflict on Egypt all the terrifying things that I'm about to do to them. After that he'll let you go.
२०तेव्हा मी मिसर देशात आपले बाहुबल दाखवून, ज्या अद्भुत कृती मी करणार आहे, त्यांचा मारा मी त्याजवर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल;
21 I will make the Egyptians treat you well as a people, so when you go you won't leave empty-handed.
२१आणि या लोकांवर मिसऱ्यांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. आणि असे होईल की, तुम्ही निघाल तेव्हा रिकामे निघणार नाही.
22 Every woman will ask her neighbor as well as any woman living in her house for silver and gold jewelry and clothing, and put them on your sons and daughters. In this way you will take the wealth of the Egyptians with you.”
२२तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीकडून व आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडून भेटवस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेटवस्तू देतील; ते तुम्हा लोकांस सोन्यारुप्याचे दागिने व कपडे भेट म्हणून देतील. तुम्ही ते आपल्या मुलांच्या व मुलींच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसराच्या लोकांस लुटाल.”

< Exodus 3 >