< Esther 6 >
1 That night the king wasn't able to sleep, so he ordered the Book of Records of the King's Reign brought in so it could be read to him.
१त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला.
2 There he discovered the account of what Mordecai had reported about Bigthana and Teresh, the two king's eunuchs who were doorkeepers who had plotted to assassinate King Xerxes.
२राजा अहश्वेरोशाला राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या दोन सेवकांनी राजाचा वध करण्याचा कट रचला होता त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते अशी नोंद होती.
3 “What honor or position did Morcedai receive as a reward for doing this?” asked the king. “Nothing has been done for him,” replied the king's attendants.
३त्यावर राजाने विचारले, “मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.”
4 “Who's here in the court?” the king asked. Haman had just happened to arrive in the outer court of the royal palace to ask the king to have Mordecai impaled on the pole he had set up for him.
४राजा म्हणाला “चौकात कोण आहे?” हामान तर आपण जो खांब मर्दखयाला फाशी देण्यासाठी तयार केला होता ते राजाला सांगण्यास राजाच्या घराच्या बाहेरच्या अंगणात आला होता.
5 The king's attendants told him, “Haman is waiting in the court.” “Tell him to come in,” the king ordered.
५राजाचे सेवक त्यास म्हणाले, “हामान अंगणात उभा आहे” तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या.”
6 When Haman came in, the king asked him, “What should be done for a man the king wants to honor?” Haman said to himself, “Who would the king want to honor except me?”
६हामान आत आला तेव्हा राजाने त्यास विचारले, ज्याचा राजाने सन्मान करावा असे राजाच्या मर्जीस आल्यास त्या मनुष्यासाठी काय करावे? हामानाने मनातल्या मनात विचार केला, “माझ्यापेक्षा कोणाचा अधिक मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस येणार?”
7 So Haman said to the king, “A man whom the king wants to honor
७तेव्हा हामान राजाला म्हणाला, “राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे,
8 should be brought royal robes the king has worn, a horse the king has ridden and which has a royal headdress on its head.
८राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा.
9 Have the robes and the horse handed over to one of the king's highest officials and nobles. Let him make sure the man the king wishes to honor is dressed in the royal robes and that he rides on the horse through the city streets, and have the official announce before him, ‘This is what is done for the man the king wishes to honor!’”
९मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्रे घालावीत आणि त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.”
10 Then the king told Haman, “Right! Off you go! Quickly get the royal robes and the horse, and do just what you've said for Mordecai the Jew sitting at the palace gate. Don't leave out anything that you mentioned.”
१०मग राजा हामानाला म्हणाला, तू बोलला त्याप्रमाणे “लवकर वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखय यहूदी राजद्वाराजवळच बसलेला आहे त्याचे तसेच कर. जे सर्व तू बोलला आहेस त्यातले काही एक राहू देऊ नकोस.”
11 Haman went and got the robes and the horse. He dressed Mordecai and placed him on the horse, and led him through the streets of the city, shouting before him, “This is what is done for the man the king wishes to honor!”
११मग हामानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्यापुढे चालून त्याने घोषणा दिली, “राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाते.”
12 Mordecai went back to the palace gate, but Haman rushed home, crying and covering his head in shame.
१२एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला.
13 Haman explained to his wife Zeresh and all his friends what had happened to him. These wise friends and his wife Zeresh told him, “If Mordecai is one of the Jewish people, and you have already begun to lose status before him—you won't be able to beat him! You're going to lose to him, you're going to fall!”
१३आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानाची पत्नी आणि त्यास सल्ला देणारे बुद्धीमान मित्र त्यास म्हणाले “मर्दखय यहूदी असेल तर त्याच्यावर तुमचे वर्चस्व होणे शक्य नाही. पण त्याच्यापुढे तुमचा अध: पात खचीतच होणार.”
14 While they were still talking to him, the king's eunuchs arrived and quickly took Haman to the dinner which Esther had prepared.
१४हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हामानास आणायला त्यांनी घाई केली.