< Judges 21 >
1 Now the children of Israel had also sworn in Maspha, saying: None of us shall give of his daughters to the children of Benjamin to wife.
१आता इस्राएली मनुष्यांनी मिस्पात अशी शपथ वाहिली होती की, “आमच्यातला कोणीही आपल्या मुली बन्यामिनाला लग्नासाठी देणार नाही.”
2 And they all came to the house of God in Silo, and abiding before him till the evening, lifted up their voices, and began to lament and weep, saying:
२नंतर लोक बेथेल नगरास गेले आणि संध्याकाळपर्यंत देवापुढे बसून राहिले, आणि मोठ्याने आवाज करून फार दु: खाने रडले.
3 O Lord God of Israel, why is so great an evil come to pass in thy people, that this day one tribe should be taken away from among us?
३ते मोठ्याने म्हणाले, “हे इस्राएलाच्या देवा परमेश्वरा, इस्राएलात असे का झाले की आज इस्राएलातून एक वंश नाहीसा झाला आहे.”
4 And rising early the next day, they built an altar: and offered there holocausts, and victims of peace, and they said:
४नंतर दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस लवकर उठून तेथे वेदी बांधली, आणि होमार्पण व शांत्यर्पण यज्ञ केले.
5 Who is there among all the tribes of Israel that came not up with the army of the Lord? for they had bound themselves with a great oath, when they were in Maspha, that whosoever were wanting should be slain.
५इस्राएली लोक म्हणाले, सर्व इस्राएली वंशांतला जो कोणी मंडळीत परमेश्वराजवळ चढून आला नाही, असा कोण आहे? कारण जो कोणी परमेश्वराजवळ मिस्पात चढून आला नाही. त्याविषयी अशी महत्त्वाची शपथ केली होती की, “ते म्हणाले, जे कोणी आले नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”
6 And the children of Israel being moved with repentance for their brother Benjamin, began to say: One tribe is taken away from Israel.
६इस्राएलाच्या लोक आपला भाऊ बन्यामीन याविषयी कळवळा करून म्हणाले, “आज इस्राएलातून एक वंश कापला गेला आहे;
7 Whence shall they take wives? For we have all in general sworn, not to give our daughters to them.
७जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी कोण पत्नीची तरतूद करील? कारण आम्ही परमेश्वराजवळ शपथ वाहिली की, आम्ही आपल्या मुलींपैकी कोणीही त्यांना लग्नासाठी देणार नाही.”
8 Therefore they said: Who is thereof all the tribes of Israel, that came not up to the Lord to Maspha. And behold the inhabitants of Jabes Galaad were found not to have been in that army.
८त्यांनी म्हटले, इस्राएलाच्या वंशांतला जो कोणी “मिस्पात परमेश्वर देवा जवळ चढून आला नाही; असा कोण आहे?” तेव्हा याबेश गिलादातला कोणीही मंडळीत आला नव्हता हे त्यांना कळले.
9 (At that time also when they were in Silo, no one of them was found there.)
९कारण लोकांची मोजणी घेतली गेली, तेव्हा पाहा, याबेश गिलादात राहणाऱ्यांपैकी कोणीही तेथे आला नव्हता.
10 So they sent ten thousand of the most valiant men, and commanded them, saying: Go and put the inhabitants of Jabes Galaad to the sword, with their wives and their children.
१०मंडळीने शूर असे बारा हजार पुरुष सूचना देऊन याबेश गिलादाकडे पाठवले, “आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा आणि स्त्रियांना व पुत्रांनासुद्धा तलवारीने मारा.
11 And this is what you shall observe: Every male, and all women that have known men, you shall kill, but the virgins you shall save.
११हे करा, तुम्हाला जे करायचे ते हेच की सर्व पुरुष आणि जिचा पुरुषाशी लैंगिक संबंध आला आहे ती प्रत्येक स्त्री, त्यांचा नाश करावा.”
12 And there were found of Jabes Galaad four hundred virgins, that had not known the bed of a man, and they brought them to the camp Silo, into the land of Chanaan.
१२तेव्हा याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांमध्ये ज्यांचा पुरुषाशी संबंध आला नव्हता, अशा चारशे कुमारी त्यांना मिळाल्या आणि त्यांनी त्यांना कनान देशात शिलो छावणीत आणले.
13 And they sent messengers to the children of Benjamin, that were in the rock Remmon, and commanded them to receive them in peace.
१३तेव्हा सर्व मंडळीने रिम्मोन खडकावर जे बन्यामिनी लोक राहत होते त्यांच्याकडे निरोप पाठवून त्यांच्याशी शांतीचे बोलणे केले.
14 And the children of Benjamin came at that time, and wives were given them of the daughters of Jabes Galaad: but they found no others, whom they might give in like manner.
१४तेव्हा बन्यामिनी माघारी आले, आणि त्यांनी याबेश गिलादातल्या स्त्रिया त्यांना पत्नी करून दिल्या; परंतु त्या सर्वांना त्या पुरल्या नाहीत.
15 And all Israel was very sorry, and repented for the destroying of one tribe out of Israel.
१५लोकांस बन्यामिनाविषयी दु: ख वाटले. कारण की, परमेश्वराने इस्राएलाच्या वंशांत फाटाफूट केली होती.
16 And the ancients said: What shall we do with the rest, that have not received wives? for all the women in Benjamin are dead.
१६यास्तव मंडळीच्या वडीलांनी म्हटले, जे उरलेले त्यांना पत्नी मिळण्याविषयी आम्ही काय करावे? कारण त्यांनी “बन्यामिनी स्त्रियांना मारून टाकले होते.”
17 And we must use all care, and provide with great diligence, that one tribe be not destroyed out of Israel.
१७आणखी त्यांनी म्हटले, इस्राएलापासून एक वंश नाश होऊ नये, “म्हणून बन्यामिनाच्या उरलेल्यांना वतन मिळावे.
18 For as to our own daughters we cannot give them, being bound with an oath and a curse, whereby we said: Cursed be he that shall give Benjamin any of his daughters to wife.
१८आम्ही आपल्या कन्येतून त्यांना स्त्रिया करून देऊ शकत नाही. कारण इस्राएलाच्या लोकांनी अशी शपथ वाहिली होती की, जो बन्यामिनाला पत्नी करून देतो, तो शापित होईल.”
19 So they took counsel, and said: Behold there is a yearly solemnity of the Lord in Silo, which is situate on the north of the city of Bethel, and on the east side of the way, that goeth from Bethel to Sichem, and on the south of the town of Lebona.
१९नंतर ते म्हणाले, “शिलोम छावणीमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी सण असतो, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.”
20 And they commanded the children of Benjamin, and said: Go, and lie hid in the vineyards,
२०त्यांनी बन्यामिनी लोकांस अशी आज्ञा दिली की, “तुम्ही द्राक्षमळ्यांमध्ये जा आणि लपून राहा.
21 And when you shall see the daughters of Silo come out, as the custom is, to dance, come ye on a sudden out of the vineyards, and catch you every man his wife among them, and go into the land of Benjamin.
२१मग जेव्हा शिलोतल्या मुली नाचायला निघतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यांतून बाहेर निघून प्रत्येकाने आपल्यासाठी शिलोतल्या कन्येतून पत्नी करून घ्यावी, आणि मग बन्यामिनाच्या देशास परत मागे जावे.
22 And when their fathers and their brethren shall come, and shall begin to complain against you, and to chide, we will say to them: Have pity on them for they took them not away as by the right of war or conquest, but when they asked to have them, you gave them not, and the fault was committed on your part.
२२जेव्हा त्यांचे वडील किंवा त्यांचे भाऊबंद एक होऊन आमच्याजवळ निषेध करण्यास येतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, तुम्ही त्यांना राहू द्या, आमच्यावर कृपा करा! कारण लढाईत आम्हांला त्यांच्यातील एकएकासाठी पत्नी मिळाली नाही. आणि तुम्ही शपथेविषयी दोषी नाहीत, कारण तुम्ही स्वतः त्यांना तुमच्या मुली दिल्या नाहीत.”
23 And the children of Benjamin did, as they had been commanded: and according to their number, they carried off for themselves every man his wife of them that were dancing: and they went into their possession and built up their cities, and dwelt in them.
२३यास्तव बन्यामिनाच्या लोकांनी तसे केले, आणि आपल्या संख्येप्रमाणे कन्या पकडून पत्नी करून घेतल्या. नंतर ते माघारी आपल्या वतनावर गेले, आणि तेथे नगरे बांधून त्यामध्ये राहिले.
24 The children of Israel also returned by their tribes, and families, to their dwellings.
२४त्यानंतर इस्राएली लोक तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर परत गेले.
25 In those days there was no king in Israel: but every one did that which seemed right to himself.
२५त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता. प्रत्येकजण त्यास जे बरे वाटे, ते करीत होता.