< Genesis 40 >

1 After this, it came to pass, that two eunuchs, the butler and the baker of the king of Egypt, offended their lord.
या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षरस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला.
2 And Pharao being angry with them (now the one was chief butler, the other chief baker)
फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला.
3 He sent them to the prison of the commander of the soldiers, in which Joseph also was prisoner,
आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले.
4 But the keeper of the prison delivered them to Joseph, and he served them. Some little time passed, and they were kept in custody.
तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले.
5 And they both dreamed a dream the same night, according to the interpretation agreeing to themselves:
मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.
6 And when Joseph was come in to them in the morning, and saw them sad,
दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुःखी असलेले दिसले.
7 He asked them, saying: Why is your countenance sadder today than usual?
तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?”
8 They answered: We have dreamed a dream, and there is nobody to interpret it to us. And Joseph said to them: Doth not interpretation belong to God? Tell me what you have dreamed.
ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”
9 The chief butler first told his dream: I saw before me a vine,
तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.
10 On which were three branches, which by little and little sent out buds, and after the blossoms brought forth ripe grapes:
१०द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.
11 And the cup of Pharao was in my hand: and I took the grapes, and pressed them into the cup which I held, and I gave the cup to Pharao.
११फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षरसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”
12 Joseph answered: This is the interpretation of the dream: The three branches are yet three days:
१२योसेफ त्यास म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत.
13 After which Pharao will remember thy service, and will restore thee to thy former place: and thou shalt present him the cup according to thy office, as before thou wast wont to do.
१३तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.
14 Only remember me, when it shall be well with thee, and do me this kindness: to put Pharao in mind to take me out of this prison:
१४परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ.
15 For I was stolen away out of the land of the Hebrews, and here without any fault was cast into the dungeon.
१५कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”
16 The chief baker seeing that he had wisely interpreted the dream, said: I also dreamed a dream, That I had three baskets of meal upon my head:
१६स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.
17 And that in one basket which was uppermost, I carried all meats that are made by the art of baking, and that the birds ate out of it.
१७सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”
18 Joseph answered: This is the interpretation of the dream: The three baskets are yet three days:
१८योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत.
19 After which Pharao will take thy head from thee, and hang thee on a cross, and the birds shall tear thy flesh.
१९तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
20 The third day after this was the birthday of Pharao: and he made a great feast for his servants, and at the banquet remembered the chief butler, and the chief baker.
२०तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.
21 And he restored the one to his place to present him the cup:
२१त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
22 The other he hanged on a gibbet, that the truth of the interpreter might be shewn.
२२परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिली.
23 But the chief butler, when things prospered with him, forgot his interpreter.
२३पण त्या प्यालेबरदाराला योसेफाची आठवण राहिली नाही. त्यास त्याचा विसर पडला.

< Genesis 40 >