< 2 Peter 3 >
1 Behold this second epistle I write to you, my dearly beloved, in which I stir up by way of admonition your sincere mind:
१प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहित आहे, या दोन्हीमध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे.
2 That you may be mindful of those words which I told you before from the holy prophets, and of your apostles, of the precepts of the Lord and Saviour.
२ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी अगोदर सांगितलेल्या वचनांची आणि जो आपला प्रभू व तारणारा आहे त्याने तुमच्या प्रेषिताद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.
3 Knowing this first, that in the last days there shall come deceitful scoffers, walking after their own lusts,
३प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील,
4 Saying: Where is his promise or his coming? for since the time that the fathers slept, all things continue as they were from the beginning of the creation.
४त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जश्या उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.
5 For this they are wilfully ignorant of, that the heavens were before, and the earth out of water, and through water, consisting by the word of God.
५कारण ते हे जाणूनबुजून विसरतात की, देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली.
6 Whereby the world that then was, being overflowed with water, perished.
६त्याच्यायोगे, तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.
7 But the heavens and the earth which are now, by the same word are kept in store, reserved unto fire against the day of judgment and perdition of the ungodly men.
७पण, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायानिवाडाच्या व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.
8 But of this one thing be not ignorant, my beloved, that one day with the Lord is as a thousand years, and a thousand years as one day.
८पण प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत.
9 The Lord delayeth not his promise, as some imagine, but dealeth patiently for your sake, not willing that any should perish, but that all should return to penance.
९कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
10 But the day of the Lord shall come as a thief, in which the heavens shall pass away with great violence, and the elements shall be melted with heat, and the earth and the works which are in it, shall be burnt up.
१०तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्यादिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील.
11 Seeing then that all these things are to be dissolved, what manner of people ought you to be in holy conversation and godliness?
११या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?
12 Looking for and hasting unto the coming of the day of the Lord, by which the heavens being on fire shall be dissolved, and the elements shall melt with the burning heat?
१२देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील.
13 But we look for new heavens and a new earth according to his promises, in which justice dwelleth.
१३तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
14 Wherefore, dearly beloved, waiting for these things, be diligent that you may be found before him unspotted and blameless in peace.
१४म्हणून प्रियजनहो, या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.
15 And account the longsuffering of our Lord, salvation; as also our most dear brother Paul, according to the wisdom given him, hath written to you:
१५आणि आपल्या प्रभूची सहनशीलता हे तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे.
16 As also in all his epistles, speaking in them of these things; in which are certain things hard to be understood, which the unlearned and unstable wrest, as they do also the other scriptures, to their own destruction.
१६आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
17 You therefore, brethren, knowing these things before, take heed, lest being led aside by the error of the unwise, you fall from your own steadfastness.
१७तर प्रियजनहो, तुम्हास या गोष्टी तुम्हास पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा.
18 But grow in grace, and in the knowledge of our Lord and Saviour Jesus Christ. To him be glory both now and unto the day of eternity. Amen. (aiōn )
१८आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन. (aiōn )