< 1 Corinthians 11 >

1 Be my imitators, even as I also [am] of Christ.
मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
2 Now I praise you, that in all things ye are mindful of me; and that as I have directed you, ye keep the directions.
मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता.
3 But I wish you to know that the Christ is the head of every man, but woman's head [is] the man, and the Christ's head God.
परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे
4 Every man praying or prophesying, having [anything] on his head, puts his head to shame.
प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो.
5 But every woman praying or prophesying with her head uncovered puts her own head to shame; for it is one and the same as a shaved [woman].
परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.
6 For if a woman be not covered, let her hair also be cut off. But if [it be] shameful to a woman to have her hair cut off or to be shaved, let her be covered.
जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे.
7 For man indeed ought not to have his head covered, being God's image and glory; but woman is man's glory.
ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.
8 For man is not of woman, but woman of man.
पुरूष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
9 For also man was not created for the sake of the woman, but woman for the sake of the man.
आणि पुरूष स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
10 Therefore ought the woman to have authority on her head, on account of the angels.
१०ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.
11 However, neither [is] woman without man, nor man without woman, in [the] Lord.
११तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
12 For as the woman [is] of the man, so also [is] the man by the woman, but all things of God.
१२कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
13 Judge in yourselves: is it comely that a woman should pray to God uncovered?
१३हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
14 Does not even nature itself teach you, that man, if he have long hair, it is a dishonour to him?
१४पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय?
15 But woman, if she have long hair, [it is] glory to her; for the long hair is given [to her] in lieu of a veil.
१५परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत.
16 But if any one think to be contentious, we have no such custom, nor the assemblies of God.
१६जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
17 But [in] prescribing [to you on] this [which I now enter on], I do not praise, [namely, ] that ye come together, not for the better, but for the worse.
१७पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते.
18 For first, when ye come together in assembly, I hear there exist divisions among you, and I partly give credit [to it].
१८प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो.
19 For there must also be sects among you, that the approved may become manifest among you.
१९यासाठी की, जे तुमच्यामध्ये स्वीकृत आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
20 When ye come therefore together into one place, it is not to eat [the] Lord's supper.
२०म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन घेत नाही.
21 For each one in eating takes his own supper before [others], and one is hungry and another drinks to excess.
२१कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हातील प्रत्येकजण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा अतीतृप्त झालेला असतो.
22 Have ye not then houses for eating and drinking? or do ye despise the assembly of God, and put to shame them who have not? What shall I say to you? shall I praise you? In this [point] I do not praise.
२२खाण्यापिण्यासाठी तुम्हास घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजवता? मी तुम्हास काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करत नाही.
23 For I received from the Lord, that which I also delivered to you, that the Lord Jesus, in the night in which he was delivered up, took bread,
२३कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,
24 and having given thanks broke [it], and said, This is my body, which [is] for you: this do in remembrance of me.
२४आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
25 In like manner also the cup, after having supped, saying, This cup is the new covenant in my blood: this do, as often as ye shall drink [it], in remembrance of me.
२५त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
26 For as often as ye shall eat this bread, and drink the cup, ye announce the death of the Lord, until he come.
२६कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
27 So that whosoever shall eat the bread, or drink the cup of the Lord, unworthily, shall be guilty in respect of the body and of the blood of the Lord.
२७म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.
28 But let a man prove himself, and thus eat of the bread, and drink of the cup.
२८म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
29 For [the] eater and drinker eats and drinks judgment to himself, not distinguishing the body.
२९कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो.
30 On this account many among you [are] weak and infirm, and a good many are fallen asleep.
३०याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत.
31 But if we judged ourselves, so were we not judged.
३१परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
32 But being judged, we are disciplined of [the] Lord, that we may not be condemned with the world.
३२परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये.
33 So that, my brethren, when ye come together to eat, wait for one another.
३३म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
34 If any one be hungry, let him eat at home, that ye may not come together for judgment. But the other things, whenever I come, I will set in order.
३४जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही दंड मिळण्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करून देईन.

< 1 Corinthians 11 >