< Luke 17 >
1 And he said to his disciples: “It is impossible for scandals not to occur. But woe to him through whom they come!
१मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!
2 It would be better for him if a millstone were placed around his neck and he were thrown into the sea, than to lead astray one of these little ones.
२त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे.
3 Be attentive to yourselves. If your brother has sinned against you, correct him. And if he has repented, forgive him.
३स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा.
4 And if he has sinned against you seven times a day, and seven times a day has turned back to you, saying, ‘I am sorry,’ then forgive him.”
४जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.”
5 And the Apostles said to the Lord, “Increase our faith.”
५मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”
6 But the Lord said: “If you have faith like a grain of mustard seed, you may say to this mulberry tree, ‘Be uprooted, and be transplanted into the sea.’ And it would obey you.
६प्रभू येशू म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल.
7 But which of you, having a servant plowing or feeding cattle, would say to him, as he was returning from the field, ‘Come in immediately; sit down to eat,’
७तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्यास म्हणेल, ‘आत्ताच येऊन जेवायला बस.’
8 and would not say to him: ‘Prepare my dinner; gird yourself and minister to me, while I eat and drink; and after these things, you shall eat and drink?’
८उलट माझे जेवण तयार कर, ‘माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी,’ असे तो त्यास म्हणणार नाही काय?
9 Would he be grateful to that servant, for doing what he commanded him to do?
९ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला हुकुम करता ते केल्याबद्दल तुम्ही त्यास धन्यवाद म्हणता का?
10 I think not. So too, when you have done all these things that have been taught to you, you should say: ‘We are useless servants. We have done what we should have done.’”
१०तुमच्या बाबतीतही तसेच आहे. जेव्हा तुम्हास करण्यास सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही असे म्हणले पाहिजे, आम्ही कोणत्याही मानास लायक नसलेले नोकर आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”
11 And it happened that, while he was traveling to Jerusalem, he passed through the midst of Samaria and Galilee.
११मग असे झाले की, तो यरूशलेम शहराकडे चालला असता, शोमरोन व गालील प्रांताच्या सीमा यांमधून गेला.
12 And as he was entering a certain town, ten leprous men met him, and they stood at a distance.
१२तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले
13 And they lifted up their voice, saying, “Jesus, Teacher, take pity on us.”
१३आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले “येशू, स्वामी, आमच्यावर दया करा,” असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली.
14 And when he saw them, he said, “Go, show yourselves to the priests.” And it happened that, as they were going, they were cleansed.
१४जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले,
15 And one of them, when he saw that he was cleansed, returned, magnifying God with a loud voice.
१५जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला.
16 And he fell face down before his feet, giving thanks. And this one was a Samaritan.
१६तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता.
17 And in response, Jesus said: “Were not ten made clean? And so where are the nine?
१७येशू त्यास म्हणाला, “दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत?
18 Was no one found who would return and give glory to God, except this foreigner?”
१८या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?”
19 And he said to him: “Rise up, go forth. For your faith has saved you.”
१९तो त्यास म्हणाला, “ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
20 Then he was questioned by the Pharisees: “When does the kingdom of God arrive?” And in response, he said to them: “The kingdom of God arrives unobserved.
२०परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही.
21 And so, they will not say, ‘Behold, it is here,’ or ‘Behold, it is there.’ For behold, the kingdom of God is within you.”
२१पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.”
22 And he said to his disciples: “The time will come when you will desire to see one day of the Son of man, and you will not see it.
२२शिष्यांना तो म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल. पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही, असे दिवस येतील.
23 And they will say to you, ‘Behold, he is here,’ and ‘Behold, he is there.’ Do not choose to go out, and do not follow them.
२३आणि लोक तुम्हास म्हणतील, पाहा, तो तर येथे आहे किंवा पाहा, तो तेथे आहे, तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका.
24 For just as lightning flashes from under heaven and shines to whatever is under heaven, so also will the Son of man be in his day.
२४कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल.
25 But first he must suffer many things and be rejected by this generation.
२५पण पहिल्याने त्याने खूप दुःख भोगावे व या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे.
26 And just as it happened in the days of Noah, so also will it be in the days of the Son of man.
२६जसे नोहाच्या दिवसात झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल.
27 They were eating and drinking; they were taking wives and being given in marriage, even until the day that Noah entered the ark. And the flood came and destroyed them all.
२७नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते.
28 It shall be similar to what happened in the days of Lot. They were eating and drinking; they were buying and selling; they were planting and building.
२८त्याचप्रमाणे, लोटाच्या दिवसात झाले तसे होईलः ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते.
29 Then, on the day that Lot departed from Sodom, it rained fire and brimstone from heaven, and it destroyed them all.
२९पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्यादिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला.
30 According to these things, so shall it be in the day when the Son of man will be revealed.
३०मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशीही असेच घडेल
31 In that hour, whoever will be on the rooftop, with his goods in the house, let him not descend to take them. And whoever will be in the field, similarly, let him not turn back.
३१त्यादिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
३२लोटाच्या पत्नीची आठवण करा.
33 Whoever has sought to save his life, will lose it; and whoever has lost it, will bring it back to life.
३३जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.
34 I say to you, in that night, there will be two in one bed. One will be taken up, and the other will be left behind.
३४मी तुम्हास सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.
35 Two will be at the grindstone together. One will be taken up, and the other will be left behind. Two will be in the field. One will be taken up, and the other will be left behind.”
३५दोन स्त्रिया दळण करत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.
36 Responding, they said to him, “Where, Lord?”
३६शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल.”
37 And he said to them, “Wherever the body will be, in that place also, the eagles shall be gathered together.”
३७शिष्यांनी त्यास विचारले, कोठे प्रभू? येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”