< Genesis 38 >
1 About the same time, Judah, descending from his brothers, turned toward an Adullamite man, named Hirah.
१त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुल्लाम नगरातील हिरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी रहावयास गेला.
2 And he saw there the daughter of a man called Shua, of Canaan. And taking her as a wife, he entered to her.
२तेथे यहूदाला शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले.
3 And she conceived and bore a son, and she called his name Er.
३ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले.
4 And conceiving offspring again, having given birth to a son, she called him Onan.
४त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले.
5 Likewise, she bore a third, whom she called Shelah, after whose birth, she ceased to bear any more.
५त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्यास जन्म दिला होता तेव्हा ती कजीब नगरामध्ये राहत होती.
6 Then Judah gave a wife to his first born Er, whose name was Tamar.
६यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी पत्नी शोधली. तिचे नाव तामार होते.
7 And it also happened that Er, the first born of Judah, was wicked in the sight of the Lord and was killed by him.
७परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले.
8 Therefore, Judah said to his son Onan: “Enter to the wife of your brother, and associate with her, so that you may raise offspring to your brother.”
८मग यहूदा ओनान याला म्हणाला, “तू तुझ्या भावाच्या पत्नीवर प्रेम कर. तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड, आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे.”
9 He, knowing that the sons to be born would not be his, when he entered to the wife of his brother, he spilled his seed on the ground, lest children should be born in his brother’s name.
९ती मुले आपली होणार नाहीत, हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या पत्नीशी प्रेम करत असे, तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्यास त्याच्या भावासाठी मूल होऊ नये.
10 And for this reason, the Lord struck him down, because he did a detestable thing.
१०त्याने जे केले ते परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होते, म्हणून परमेश्वराने त्यास मारून टाकले.
11 Because of this matter, Judah said to his daughter-in-law Tamar, “Be a widow in your father’s house, until my son Shelah grows up.” For he was afraid, lest he also might die, just as his brothers did. She went away, and she lived in her father’s house.
११मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या वडिलाच्या घरी जाऊन तेथे विधवा म्हणून राहा.” कारण त्याने विचार केला, “नाही तर, तोसुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल.” मग तामार आपल्या वडिलाच्या घरी जाऊन राहिली.
12 Then, after many days had passed, the daughter of Shua, the wife of Judah, died. And when he accepted consolation after his mourning, he went up to the shearers of his sheep at Timnah, he and Hirah, the herdsman of the Adullamite flock.
१२बऱ्याच काळानंतर यहूदाची पत्नी, म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहूदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिम्ना येथे गेला.
13 And it was reported to Tamar that her father-in-law had gone up to Timnah to shear the sheep.
१३तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”
14 And storing away the garments of her widowhood, she took up a veil. And changing her clothing, she sat at the crossroad that leads to Timnah, because Shelah had grown up, and she had not received him as a husband.
१४तिने आपली विधवेची वस्त्रे काढली आणि बुरखा घेऊन शरीर लपेटून घेतले. नंतर तिम्नाच्या रस्त्यावर एनाईम नगराच्या वेशीत ती बसून राहिली. कारण तिने पाहिले की, शेला आता प्रौढ झाला असूनही आपल्याला अजून त्याची पत्नी करून दिले नाही.
15 And when Judah saw her, he thought her to be a harlot. For she had covered her face, lest she be recognized.
१५यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते.
16 And entering to her, he said, “Permit me to join with you.” For he did not know her to be his daughter-in-law. And she responded, “What will you give to me, to enjoy me as a concubine?”
१६तेव्हा यहूदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” ती आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?”
17 He said, “I will send you a young goat from the flock.” And again, she said, “I will allow what you want, if you give me a pledge, until you may send what you promise.”
१७यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?”
18 Judah said, “What do you want to be given for a pledge?” She responded, “Your ring and bracelet, and the staff that you hold in your hand.” Thereupon, the woman, from one sexual encounter, conceived.
१८यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.
19 And she arose and went away. And storing away the garments that she had taken up, she was clothed in the garments of her widowhood.
१९ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली.
20 Then Judah sent a young goat by his shepherd, the Adullamite, so that he might receive the pledge that he had given to the woman. But, when he had not found her,
२०यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही.
21 he questioned the men of that place: “Where is the woman who sat at the crossroad?” And they all responded, “There has been no harlot in this place.”
२१मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांस विचारले, “येथे या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”
22 He returned to Judah, and he said to him: “I did not find her. Moreover, the men of that place told me that a prostitute had never sat there.”
२२तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सापडली नाही, तेथे राहणारे लोक म्हणाले की, ‘तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.’”
23 Judah said: “Let her hold herself to blame. Certainly, she is not able to accuse us of a lie. I sent the young goat that I had promised, and you did not find her.”
२३यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे, नाहीतर आपलीच नालस्ती होईल. मी कबूल केल्याप्रमाणे तिला करडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला सापडली नाही.”
24 And behold, after three months, they reported to Judah, saying, “Tamar, your daughter-in-law, has committed fornication and her abdomen appears to be enlarged.” And Judah said, “Produce her, so that she may be burned.”
२४या नंतर तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझी सुन तामार हिने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढा व जाळून टाका.”
25 But when she was led out to the punishment, she sent to her father-in-law, saying: “I conceived by the man to whom these things belong. Recognize whose ring, and bracelet, and staff this is.”
२५जेव्हा तिला बाहेर आणले तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, “ज्या मनुष्याच्या मालकीच्या या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे.” पुढे ती म्हणाली, “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख.”
26 But he, acknowledging the gifts, said: “She is more just than I am. For I did not deliver her to my son Shelah.” However, he knew her no more.
२६यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे. कारण मी तिला वचन दिल्यानुसार माझा मुलगा शेला याला ती पत्नी म्हणून दिली नाही.” त्यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध केला नाही.
27 Then, at the moment of birth, there appeared twins in the womb. And so, in the very delivery of the infants, one put forth a hand, on which the midwife tied a scarlet thread, saying,
२७तिच्या प्रसुतीच्या वेळी असे झाले की, पाहा, तिच्या पोटात जुळी मुले होती.
28 “This one will go out first.”
२८प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.”
29 But in truth, drawing back his hand, the other came out. And the woman said, “Why is the partition divided for you?” And for this reason, she called his name Perez.
२९परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले.
30 After this, his brother came out, on whose hand was the scarlet thread. And she called him Zerah.
३०त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह असे ठेवले.