< Genesis 18 >

1 Then the Lord appeared to him, in the steep valley of Mamre, when he was sitting at the door of his tent, in the very heat of the day.
परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता.
2 And when he had lifted up his eyes, there appeared to him three men, standing near him. When he had seen them, he ran to meet them from the door of his tent, and he reverenced them on the ground.
त्याने वर पाहिले आणि, पाहा, आपल्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याने पाहिले. अब्राहामाने जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी तंबूच्या दारापासून पळत गेला आणि त्याने त्यांना जमिनीपर्यंत खाली वाकून नमन केले.
3 And he said: “If I, O lord, have found grace in your eyes, do not pass by your servant.
तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका.
4 But I will bring a little water, and you may wash your feet and rest under the tree.
थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा.
5 And I will set out a meal of bread, so that you may strengthen your heart; after this you will pass on. It is for this reason that you have turned aside to your servant.” And they said, “Do as you have spoken.”
मी तुमच्यासाठी थोडे अन्न आणतो, जेणेकरून तुम्हास ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा, यासाठीच तुमच्या या सेवकाकडे तुमचे येणे झाले असावे.” आणि ते म्हणाले, “तू म्हणतोस तसे कर.”
6 Abraham hurried into the tent to Sarah, and he said to her, “Quickly, mix together three measures of the finest wheat flour and make loaves baked under the ashes.”
अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
7 In truth, he himself ran to the herd, and he took a calf from there, very tender and very good, and he gave it to a servant, who hurried and boiled it.
नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्यास ते लवकर तयार करण्यास सांगितले.
8 Likewise, he took butter and milk, and the calf which he had boiled, and he placed it before them. Yet truly, he himself stood near them under the tree.
त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला.
9 And when they had eaten, they said to him, “Where is Sarah your wife?” He answered, “Behold, she is in the tent.”
ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.”
10 And he said to him, “When returning, I will come to you at this time, with life as a companion, and your wife Sarah will have a son.” Hearing this, Sarah laughed behind the door of the tent.
१०त्यांच्यातील एक म्हणाला, “मी वसंतऋतूच्या वेळी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी पत्नी सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले.
11 Now they were both old, and in an advanced state of life, and it had ceased to be with Sarah after the manner of women.
११आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते.
12 And she laughed secretly, saying, “After I have grown old, and my lord is elderly, shall I give myself to the work of delight?”
१२म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?”
13 Then the Lord said to Abraham: “Why did Sarah laugh, saying: ‘How can I, an old woman, actually give birth?’
१३परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली?
14 Is anything difficult for God? According to the announcement, he will return to you at this same time, with life as a companion, and Sarah will have a son.”
१४परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”
15 Sarah denied it, saying, “I did not laugh.” For she was terribly afraid. But the Lord said, “It is not so; for you did laugh.”
१५नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”
16 Therefore, when the men had risen up from there, they directed their eyes against Sodom. And Abraham traveled with them, leading them.
१६नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे जाण्यास निघाले. अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर गेला.
17 And the Lord said: “How could I hide what I am about to do from Abraham,
१७परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय?
18 since he will become a great and very robust nation, and in him all the nations of the earth will be blessed?
१८कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील.
19 For I know that he will instruct his sons, and his household after him, to keep to the way of the Lord, and to act with judgment and justice, so that, for the sake of Abraham, the Lord may bring about all the things that he has spoken to him.”
१९मी त्यास यासाठी निवडले आहे की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणाने व धार्मिकतेने परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्यास प्राप्त करून द्यावे.”
20 And so the Lord said, “The outcry from Sodom and Gomorrah has been multiplied, and their sin has become exceedingly grievous.
२०मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने,
21 I will descend and see whether they have fulfilled the work of the outcry that has reached me, or whether it is not so, in order that I may know.”
२१मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.”
22 And they turned themselves from there, and they went toward Sodom. Yet in truth, Abraham still stood in the sight of the Lord.
२२मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला.
23 And as they drew near, he said: “Will you destroy the just with the impious?
२३मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय?
24 If there were fifty of the just in the city, will they perish with the rest? And will you not spare that place for the sake of fifty of the just, if they were in it?
२४कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय?
25 Far be it from you to do this thing, and to kill the just with the impious, and for the just to be treated like the impious. No, this is not like you. You judge all the earth; you would never make such a judgment.”
२५असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?”
26 And the Lord said to him, “If I find in Sodom fifty of the just in the midst of the city, I will release the entire place because of them.”
२६परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.”
27 And Abraham responded by saying: “Since now I have begun, I will speak to my Lord, though I am dust and ashes.
२७अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो!
28 What if there were five less than fifty of the just? Would you, despite the forty-five, eliminate the entire city?” And he said, “I will not eliminate it, if I find forty-five there.”
२८समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”
29 And again he said to him, “But if forty were found there, what would you do?” He said, “I will not strike, for the sake of the forty.”
२९पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.”
30 “I ask you,” he said, “not to be angry, Lord, if I speak. What if thirty were found there?” He responded, “I will not act, if I find thirty there.”
३०तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.”
31 “Since now I have begun,” he said, “I will speak to my Lord. What if twenty were found there?” He said, “I will not put to death, for the sake of the twenty.”
३१तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
32 “I beg you,” he said, “not to be angry, Lord, if I speak yet once more. What if ten were found there?” And he said, “I will not destroy it for the sake of the ten.”
३२शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
33 And the Lord departed, after he had ceased speaking to Abraham, who then returned to his place.
३३मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.

< Genesis 18 >