< Exodus 29 >
1 “But you shall also do this, so that they may be consecrated to me in the priesthood: Take a calf from the herd, and two immaculate rams,
१त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
2 and unleavened bread, and a crust without leaven that has been sprinkled with oil, likewise, unleavened cakes smeared with oil. You shall make them all from the same wheat flour.
२बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; या सर्व सपिठाच्या असाव्यात.
3 And, having placed them in baskets, you shall offer them, along with the calf and the two rams.
३त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याचप्रमाणे तो गोऱ्हा व ते दोन मेंढे ह्यांच्यासहीत ती टोपली घेऊन ये.
4 And you shall bring forward Aaron and his sons, to the door of the tabernacle of the testimony. And when you will have washed the father with his sons in water,
४अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;
5 you shall clothe Aaron in his vestments, that is, with the linen, and the tunic, and the ephod, and the breastplate, which you shall draw together with the wide belt.
५ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्यास एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध;
6 And you shall place the headdress on his head and the holy plate upon the headdress.
६त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव.
7 And you shall pour the oil of unction over his head. And so, by this rite, he shall be consecrated.
७नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्यास अभिषेक कर;
8 Likewise, you shall bring forward his sons, and you shall clothe them in the linen tunics, and wrap them with the wide belt:
८मग त्याच्या पुत्रांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घालावेत;
9 Aaron, certainly, as well as his sons. And you shall impose headdresses upon them. And they shall be priests to me by a perpetual ordinance. After you have initiated their hands,
९आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत
10 you shall bring forward also the calf, in the presence of the tabernacle of the testimony. And Aaron and his sons shall lay their hands upon its head.
१०नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत.
11 And you shall sacrifice it in the sight of the Lord, beside the door of the tabernacle of the testimony.
११मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा;
12 And taking some of the blood of the calf, you shall place it upon the horns of the altar with your finger, but the remainder of the blood you shall pour next to its base.
१२मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
13 And you shall take all the fat which covers its intestines, and the mesh of the liver, as well as the two kidneys, and the fat that is on them, and you shall offer them as a burnt offering upon the altar.
१३मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्याचा वेदीवर होम करावा.
14 Yet truly, the flesh of the calf, and the hide and the dung, you shall burn outside, beyond the camp, because it is for sin.
१४पण गोऱ्ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी; हा पापार्पणाचा बली होय.
15 Likewise, you shall take one ram, and upon its head Aaron and his sons shall lay their hands.
१५मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेंढ्याच्या डोक्यावर ठेवावेत;
16 And when you will have sacrificed it, you shall take from its blood and pour it around the altar.
१६आणि तो मेंढा वधावा; व त्याचे रक्त वेदीच्या चारही बाजूस टाकावे.
17 Then you shall cut the ram into pieces, and, having washed its intestines and feet, you shall place these upon the cut-up flesh and upon its head.
१७मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत;
18 And you shall offer the entire ram as a burnt offering upon the altar. It is an oblation to the Lord, a most sweet odor of the victim of the Lord.
१८त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय;
19 Likewise, you shall take the other ram, upon whose head Aaron and his sons shall lay their hands.
१९नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;
20 And when you will have immolated it, you shall take of its blood, and place it on the tip of the right ear of Aaron and his sons, and on the thumbs and big toes of their right hand and right foot, and you shall pour the blood upon the altar, all around.
२०मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळ्यांना व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूंना शिंपडावे.
21 And when you have taken from the blood that is on the altar, and from the oil of unction, you shall sprinkle Aaron and his vestment, his sons and their vestments. And after they and their vestments have been consecrated,
२१नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील.
22 you shall take the fat of the ram, and the rump, and the lard that covers the internal organs, and the mesh of the liver, and the two kidneys along with the fat that is on them, and the right shoulder, because it is the ram of consecration,
२२तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी ही घे;
23 and one turn of bread, a crust sprinkled with oil, and a cake from the basket of unleavened bread, which was placed in the sight of the Lord.
२३त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी
24 And you shall place all these in the hands of Aaron and his sons, and you shall sanctify them, lifting them up in the sight of the Lord.
२४आणि ते सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेव व हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.
25 And you shall take all these things from their hands and burn them upon the altar as a holocaust, as a most sweet odor in the sight of the Lord, because it is his oblation.
२५मग त्या सर्व वस्तू त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वरास अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
26 Likewise, you shall take the chest of the ram, with which Aaron was initiated, and you shall sanctify it, lifting it up in the sight of the Lord, and it will fall to your share.
२६मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे.
27 And you shall sanctify both the consecrated chest and the shoulder that you separated from the ram,
२७नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी.
28 with which Aaron was initiated with his sons, and these will fall to the share of Aaron and his sons, as a perpetual oath by the sons of Israel. For these are the greatest and the first of their victims of peace, which they offer to the Lord.
२८इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय.
29 But the holy vestment, which Aaron shall use, his sons shall possess after him, so that they may be anointed in it and their hands may be consecrated.
२९अहरोनाची पवित्र वस्रे त्याच्यानंतर त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे या वस्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.
30 For seven days, he who is high priest in his place and who enters the tabernacle of the testimony to minister in the Sanctuary shall use it.
३०अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपामध्ये जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत.
31 But you shall take the ram of consecration and cook its flesh in the holy place.
३१समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;
32 And Aaron and his sons shall feed on it. Likewise, the loaves which are in the basket, they shall consume in the vestibule of the tabernacle of the testimony,
३२अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;
33 so that it may be an appeasing sacrifice, and so that the hands of those who offer may be sanctified. A stranger shall not eat from these, for they are holy.
३३त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावे. पण कोणी परक्याने ते खाऊ नयेत. कारण ते पदार्थ पवित्र आहेत.
34 And what may remain until morning, of the consecrated flesh or of the bread, you shall burn these remnants with fire. These shall not be eaten, because they have been sanctified.
३४समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे;
35 All that I have instructed you concerning Aaron and his sons, you shall do. For seven days shall you consecrate their hands,
३५मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टीप्रमाणे अहरोन व त्याचे पुत्र यांचे कर. सात दिवसपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.
36 and you shall offer a calf for sin on each day, as an atonement. And you shall cleanse the altar when you will have immolated the victim of expiation, and you shall anoint it for sanctification.
३६प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या प्रत्येक दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.
37 For seven days, you shall expiate and sanctify the altar, and it shall be the Holy of holies. All those who will touch it must be sanctified.
३७सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.
38 This is what you shall acquire for the altar: Two one-year-old lambs, each day continually,
३८वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा.
39 one lamb in the morning, and the other in the evening;
३९एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा.
40 for the one lamb, a tenth part of fine flour sprinkled with crushed oil, which shall have the measure of the fourth part of a hin, and wine for a libation, of the same measure;
४०कुटून काढलेल्या पाव हिन तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षरसाचे पेयार्पण करावे.
41 truly, the other lamb you shall offer in the evening, according to the ritual of the morning oblation, and according to what we have said, as an odor of sweetness.
४१आणि संध्याकाळी दुसरे कोकरू अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वरास प्रिय असे सुवासिक हव्य होय.
42 It is a sacrifice to the Lord, by a perpetual oblation among your generations, at the door of the tabernacle of the testimony before the Lord, where I resolve to speak to you.
४२दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत रहावे; या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हास भेटेन.
43 And there I will instruct the sons of Israel, and the altar shall be sanctified by my glory.
४३त्या ठिकाणी मी इस्राएल लोकांस भेटेन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.
44 I will also sanctify the tabernacle of the testimony with the altar, and Aaron with his sons, to exercise the priesthood for me.
४४“ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन.
45 And I will live in the midst of the sons of Israel, and I will be their God.
४५मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.
46 And they shall know that I am the Lord their God, who led them away from the land of Egypt, so that I might dwell among them. I am the Lord their God.”
४६आणि लोकांस समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.”