< Ephesians 2 >
1 And you were once dead in your sins and offenses,
१आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता,
2 in which you walked in times past, according to the age of this world, according to the prince of the power of this sky, the spirit who now works in the sons of distrust. (aiōn )
२ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. (aiōn )
3 And we too were all conversant in these things, in times past, by the desires of our flesh, acting according to the will of the flesh and according to our own thoughts. And so we were, by nature, sons of wrath, even like the others.
३आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो.
4 Yet still, God, who is rich in mercy, for the sake of his exceedingly great charity with which he loved us,
४पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.
5 even when we were dead in our sins, has enlivened us together in Christ, by whose grace you have been saved.
५आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.
6 And he has raised us up together, and he has caused us to sit down together in the heavens, in Christ Jesus,
६आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले.
7 so that he may display, in the ages soon to arrive, the abundant wealth of his grace, by his goodness toward us in Christ Jesus. (aiōn )
७यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. (aiōn )
8 For by grace, you have been saved through faith. And this is not of yourselves, for it is a gift of God.
८कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे,
9 And this is not of works, so that no one may glory.
९आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये.
10 For we are his handiwork, created in Christ Jesus for the good works which God has prepared and in which we should walk.
१०कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
11 Because of this, be mindful that, in times past, you were Gentiles in the flesh, and that you were called uncircumcised by those who are called circumcised in the flesh, something done by man,
११म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.
12 and that you were, in that time, without Christ, being foreign to the way of life of Israel, being visitors to the testament, having no hope of the promise, and being without God in this world.
१२त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता.
13 But now, in Christ Jesus, you, who were in times past far away, have been brought near by the blood of Christ.
१३पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात.
14 For he is our peace. He made the two into one, by dissolving the intermediate wall of separation, of opposition, by his flesh,
१४कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकांपासून दुभागणारी आडभिंत पाडून टाकली.
15 emptying the law of commandments by decree, so that he might join these two, in himself, into one new man, making peace
१५त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी.
16 and reconciling both to God, in one body, through the cross, destroying this opposition in himself.
१६त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा.
17 And upon arriving, he evangelized peace to you who were far away, and peace to those who were near.
१७ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली.
18 For by him, we both have access, in the one Spirit, to the Father.
१८कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो.
19 Now, therefore, you are no longer visitors and new arrivals. Instead, you are citizens among the saints in the household of God,
१९यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात
20 having been built upon the foundation of the Apostles and of the Prophets, with Jesus Christ himself as the preeminent cornerstone.
२०तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे.
21 In him, all that has been built is framed together, rising up into a holy temple in the Lord.
२१संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे.
22 In him, you also have been built together into a habitation of God in the Spirit.
२२त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.