< 2 Corinthians 1 >

1 Paul, an Apostle of Jesus Christ by the will of God, and Timothy, a brother, to the church of God which is at Corinth, with all the saints who are in all of Achaia:
देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,
2 Grace and peace to you from God our Father and from the Lord Jesus Christ.
देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
3 Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, the Father of mercies and the God of all consolation.
आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
4 He consoles us in all our tribulation, so that we too may be able to console those who are in any kind of distress, through the exhortation by which we also are being exhorted by God.
तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
5 For just as the Passion of Christ abounds in us, so also, through Christ, does our consolation abound.
कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
6 So, if we are in tribulation, it is for your exhortation and salvation, or if we are in consolation, it is for your consolation, or if we are exhorted, it is for your exhortation and salvation, which results in the patient endurance of the same passion which we also endure.
आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
7 So may our hope for you be made firm, knowing that, just as you are participants in the suffering, so also shall you be participants in the consolation.
आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
8 For we do not want you to be ignorant, brothers, about our tribulation, which happened to us in Asia. For we were weighed down beyond measure, beyond our strength, so that we became weary, even of life itself.
बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
9 But we had within ourselves the response to death, so that we would not have faith in ourselves, but in God, who raises the dead.
खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
10 He has rescued us, and he is rescuing us, from great peril. In him, we hope that he will continue to rescue us.
१०त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
11 And you are assisting, with your prayers for us, so that from many persons, by that which is a gift in us, thanks may be given through many persons, because of us.
११तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.
12 For our glory is this: the testimony of our conscience, which is found in simplicity of heart and in sincerity toward God. And it is not with worldly wisdom, but in the grace of God, that we have conversed with this world, and more abundantly toward you.
१२आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
13 For we write nothing else to you other than what you have read and understood. And I hope that you will continue to understand, even unto the end.
१३कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो.
14 And just as you have acknowledged us in our role, that we are your glory, so also you are ours, unto the day of our Lord Jesus Christ.
१४त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
15 And with this confidence, I wanted to come to you sooner, so that you might have a second grace,
१५आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा.
16 and through you to pass into Macedonia, and to return to you again from Macedonia, and so be led by you on my way to Judea.
१६मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.
17 Then, although I had intended this, did I act lightly? Or in the things that I consider, do I consider according to the flesh, so that there would be, with me, both Yes and No?
१७असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
18 But God is faithful, so our word, which was set before you, was not, in him, both Yes and No.
१८पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.
19 For the Son of God, Jesus Christ, who was preached among you through us, through myself and Sylvanus and Timothy, was not Yes, and No; but was simply Yes in him.
१९कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती.
20 For whatever promises are of God are, in him, Yes. For this reason, too, through him: Amen to God for our glory.
२०कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
21 Now the One who confirms us with you in Christ, and who has anointed us, is God.
२१आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
22 And he has sealed us, and he has placed the pledge of the Spirit in our hearts.
२२तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
23 But I call God as a witness to my soul, that I was lenient with you, in that I did not return to Corinth:
२३मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही.
24 not because we have dominion over your faith, but because we are assistants of your joy. For by faith you stand.
२४आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.

< 2 Corinthians 1 >