< 1 Samuel 28 >
1 Now it happened that, in those days, the Philistines gathered together their troops, so that they might be prepared for war against Israel. And Achish said to David, “I know now, certainly, that you will go out with me to war, you and your men.”
१त्या दिवसात असे झाले की पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्राएलाशी लढायला एकत्र केली. तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचे हे तू खचित समज.”
2 And David said to Achish, “You know now what your servant will do.” And Achish said to David, “And so, I will appoint you to guard my head for all days.”
२दावीदाने आखीशाला म्हटले, “तुझा दास काय करील हे तू खचित जाणशील.” तेव्हा आखीश दावीदाला म्हणाला, “याकरिता तुला मी आपल्या मस्तकाचा रक्षक असा कायमचा ठेवीन.”
3 Now Samuel was dead, and all of Israel mourned for him, and they buried him in Ramah, his city. And Saul took away the magi and soothsayers from the land.
३शमुवेल तर मेला होता व सर्व इस्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्यास रामा येथे त्याच्या नगरात पुरले होते. भूते ज्यांच्या परीचयाची होती अशा जाणत्या लोकांस व जादूगिरांना शौलाने आपल्या प्रदेशातून हाकलून लावले होते.
4 And the Philistines gathered together, and they arrived and made camp at Shunem. Then Saul also gathered all of Israel, and he arrived at Gilboa.
४पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला आणि शौलाने सर्व इस्राएलांस एकत्र जमवून गिलबोवा येथे तळ दिला.
5 And Saul saw the camp of the Philistines, and he was afraid, and his heart was exceedingly terrified.
५शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले.
6 And he consulted the Lord. But he did not respond to him, neither by dreams, nor by priests, nor by prophets.
६शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.
7 And Saul said to his servants, “Seek for me a woman having a divining spirit, and I will go to her, and consult through her.” And his servants said to him, “There is a woman having a divining spirit at Endor.”
७मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.”
8 Therefore, he changed his usual appearance, and he put on other clothes. And he went, and two men with him, and they came to the woman by night. And he said to her, “Divine for me, by your divining spirit, and raise up for me whomever I will tell you.”
८मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”
9 And the woman said to him: “Behold, you know how much Saul has done, and how he has wiped away the magi and soothsayers from the land. Why then do you set a trap for my life, so that it will be put to death?”
९तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, “पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?”
10 And Saul swore to her by the Lord, saying, “As the Lord lives, nothing evil will befall you because of this matter.”
१०तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला काही शिक्षा होणार नाही.”
11 And the woman said to him, “Whom shall I raise up for you?” And he said, “Raise up for me Samuel.”
११मग त्या स्त्रीने म्हटले, “तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू?” तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.”
12 And when the woman had seen Samuel, she cried out with a loud voice, and she said to Saul: “Why have you afflicted me? For you are Saul!”
१२त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.”
13 And the king said to her: “Do not be afraid. What have you seen?” And the woman said to Saul, “I saw gods ascending from the earth.”
१३राजा तिला म्हणाला, “भिऊ नको. तू काय पाहतेस?” तेव्हा ती स्त्री शौलाला म्हणाली, “मी दैवत भूमीतून वर येताना पाहते.”
14 And he said to her, “What appearance does he have?” And she said, “An old man ascends, and he is clothed in a cloak.” And Saul understood that it was Samuel. And he bowed himself upon his face on the ground, and he reverenced.
१४मग तो तिला म्हणाला, “तो कोणत्या रूपाचा आहे?” तिने म्हटले, “म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे.” तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला.
15 Then Samuel said to Saul, “Why have you disquieted me, so that I would be raised up?” And Saul said: “I am greatly distressed. For the Philistines fight against me, and God has withdrawn from me, and he is not willing to heed me, neither by the hand of prophets, nor by dreams. Therefore, I have summoned you, so that you would reveal to me what I should do.”
१५मग शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर आणून का त्रास दिला आहे?” तेव्हा शौलाने उत्तर केले, “मी फार संकटात पडलो आहे. कारण पलिष्टी माझ्याशी लढाई करीत आहेत. आणि परमेश्वर मला सोडून गेला आहे, आणि तो भविष्यवाद्यांकडून किंवा स्वप्नांकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हे तुम्ही मला कळवावे म्हणून मी तुम्हास बोलावले आहे.”
16 And Samuel said, “Why do you question me, though the Lord has withdrawn from you, and has crossed over to your rival?
१६तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?”
17 For the Lord will do to you just as he spoke by my hand. And he will tear your kingdom from your hand. And he will give it to your neighbor David.
१७जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे.
18 For you did not obey the voice of the Lord, and you did not carry out the wrath of his fury upon Amalek. For this reason, the Lord has done to you what you are enduring this day.
१८कारण तू देवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला नाही, म्हणून आज परमेश्वराने तुझे असे केले आहे.
19 And the Lord also will give Israel into the hands of the Philistines, along with you. Then tomorrow you and your sons will be with me. But the Lord will also deliver the camp of Israel into the hands of the Philistines.”
१९परमेश्वर इस्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल. उद्या तू तुझ्या मुलांसमवेत माझ्याजवळ असशील. परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.
20 And immediately, Saul fell stretched out on the ground. For he was terrified by the words of Samuel. And there was no strength in him. For he had not eaten bread all that day.
२०तेव्हा शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच भूमीवर उपडा पडला आणि फार भयभीय झाला, व त्याच्यात काही शक्ती राहिली नाही. कारण सर्व दिवस आणि सारी रात्र त्याने काही भाकर खाल्ली नव्हती.
21 And so, the woman entered to Saul, (for he was very troubled) and she said to him: “Behold, your handmaid has obeyed your voice, and I have placed my life in my hand. And I have heeded the words which you spoke to me.
२१मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.
22 And so now, I ask you to heed the voice of your handmaid, and let me place before you a morsel of bread, so that, by eating, you may recover strength, and you may be able to undertake the journey.”
२२तर आता मी तुम्हास विनंती करते, तुम्ही ही आपल्या दासीचा शब्द ऐका आणि मला तुमच्या पुढे भाकरीचा तुकडा ठेवू द्या; तो तुम्ही खा यासाठी की, तुम्ही वाटेने जाल तेव्हा तुम्हास शक्ती असावी.”
23 But he refused, and he said, “I will not eat.” But his servants and the woman urged him, and after some time, heeding their voice, he rose up from the ground, and he sat upon the bed.
२३परंतु त्याने नाकारून म्हटले, “मी खाणार नाही.” मग त्याच्या चाकरांनी व त्या स्त्रीनेही त्यास आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचा शब्द ऐकला व तो भूमीवरून उठून पलंगावर बसला.
24 Now the woman had a fatted calf in the house, and she hurried and killed it. And taking meal, she kneaded it, and she baked unleavened bread.
२४त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या.
25 And she set it before Saul and before his servants. And when they had eaten, they rose up, and they walked all through that night.
२५मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले.