< Nehemiah 3 >

1 Then Eliasub the high priest, and his brethren the priests, rose up, and built the sheep-gate; they sanctified it, and set up the doors of it; even to the tower of the hundred they sanctified [it], to the tower of Anameel.
मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.
2 And [they builded] by the side of the men of Jericho, and by the side of the sons of Zacchur, the son of Amari.
त्यानंतर यरीहोच्या लोकांनी बांधले आणि त्यानंतर इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले.
3 And the sons of Asana built the fish-gate; they roofed it, and covered in its doors, and bolts, and bars.
हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या व दरवाजे बसवले, या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.
4 And next to them [the order] reached to Ramoth the son of Uria, the son of Accos, and next to them Mosollam son of Barachias the son of Mazebel took [his] place: and next to them Sadoc the son of Baana took [his] place.
हक्कोस उरीयाचा पुत्र मरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. उरीया हा हक्कोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र बानाचा पुत्र सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.
5 And next to them the Thecoim took [their] place; but the Adorim applied not their neck to their service.
तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्यापुढच्या भागाची डागडूजी केली, पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नहेम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला.
6 And Joida the son of Phasec, and Mesulam son of Basodia, repaired the old gate; they covered it in, and set up its doors, and its bolts, and its bars.
यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र. यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले, नंतर कड्या व अडसर बसवले.
7 And next to them repaired Maltias the Gabaonite, and Evaron the Meronothite, the men of Gabaon and Maspha, to the throne of the governor on this side the river.
गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेकडील भागाच्या अधिकाऱ्याच्या सत्तेखाली होता.
8 And next to him Oziel the son of Arachias of the smiths, carried on the repairs: and next to them Ananias the son of one of the apothecaries repaired, and they finished Jerusalem to the broad wall.
हरह याचा पुत्र उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली, उज्जियेल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरूशलेमेची मजबुती केली.
9 And next to them repaired Raphaea the son of Sur, the ruler of half the district round about Jerusalem.
हूरचा पुत्र रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरूशलेमेच्या अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता.
10 And next to them repaired Jedaia the son of Eromaph, and [that] in front of his house: and next to him repaired Attuth son of Asabania.
१०हरूमफाचा पुत्र यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वत: च्या घरालगतच्या भिंतीची डागडुजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा पुत्र हत्तूश याने डागडुजी केली.
11 And next [to him] repaired Melchias son of Heram, and Asub son of Phaat Moab, even to the tower of the furnaces.
११हारीमचा पुत्र मल्कीया आणि पहथ-मवाबचा पुत्र हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
12 And next to him repaired Sallum the son of Alloes, the ruler of half the district round about Jerusalem, he and his daughters.
१२हल्लोहेशचा पुत्र शल्लूम याने त्यापुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या कन्यांनी त्यास मदत केली. शल्लूम यरूशलेमेच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
13 Anun and the inhabitants of Zano repaired the gate of the valley: they built it, and set up its doors, and its bolts, and its bars, and a thousand cubits of the wall as far as the dung-gate.
१३हानून नावाचा एकजण आणि जानोहा येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडा वेशीपर्यंत एक हजार हात लांबीची दुरुस्ती केली.
14 And Melchia the son of Rechab, the ruler of the district round about Beth-accharim, repaired the dung-gate, he and his sons; and they covered it, and set up its doors, and its bolts, and its bars.
१४रेखाबाचा पुत्र मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली, मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली आणि दरवाजे बिजागऱ्यांसह लावले, या दरवाजांना कड्या, अडसर घातले.
15 But Solomon the son of Choleze repaired the gate of the fountain, the ruler of part of Maspha; he built it, and covered it, and set up its doors and its bars, and the wall of the pool of the skins by the meadow of the king, and as far as the steps that lead down from the city of David.
१५मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली.
16 After him repaired Neemias son of Azabuch, ruler of half the district round about Bethsur, as far as the garden of David's sepulchre, and as far as the artificial pool, and as far as the house of the mighty men.
१६अजबूकचा पुत्र नहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नहेम्या बेथ-सूरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दावीदाच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले.
17 After him repaired the Levites, [even] Raum the son of Bani: next to him repaired Asabia, ruler of half the district round about Keila, in his district.
१७लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा पुत्र रहूम याच्या हाताखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कईला जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या.
18 And after him repaired his brethren, Benei son of Enadad, ruler of half the district round about Keila.
१८त्याच्या भावांनी हेनादादचा पुत्र बवाई, कईलाच्या अर्ध्या भागाचा अधिकारी व भाऊबंधानी डागडुजी केली.
19 And next to him repaired Azur the son of Joshua, ruler of Masphai, another portion of the tower of ascent, where it meets the corner.
१९नंतर येशूवाचा पुत्र एजेर याने पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले.
20 After him repaired Baruch the son of Zabu, a second portion, from the corner as far as the door of the house of Eliasub the high priest.
२०जब्बईचा पुत्र बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबाच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता.
21 After him repaired Meramoth the son of Uria the son of Accos, a second part from the door of the house of Eliasub, to the end of the house of Eliasub.
२१हक्कोसचा पुत्र उरीया. उरीयाचा पुत्र मरेमोथ याने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून सरळ घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले.
22 And after him repaired the priests, the men of Ecchechar.
२२भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती यरूशलेमभोवती राहणाऱ्या याजकांनी केली.
23 And after him repaired Benjamin and Asub over against their house: and after him repaired Azarias son of Maasias the son of Ananias, [the parts] near to his house.
२३बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा पुत्र मासेया. मासेयाचा पुत्र अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम केले.
24 After him repaired Bani the son of Adad, another portion from the house of Azaria as far as the corner and to the turning,
२४हेनादादचा पुत्र बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.
25 of Phalach the son of Uzai, opposite the corner, and [where is] also the tower that projects from the king's house, even the upper one of the prison-house: and after him [repaired] Phadaea the son of Phoros.
२५उजई याचा पुत्र पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परोशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली.
26 And the Nathinim dwelt in Ophal, as far as the garden of the water-gate eastward, and [there is] the projecting tower.
२६ओफेल टेकडीवर राहणारे मंदिराचे सेवेकरी (नथीमीम) यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंतदुरुस्तीचे काम केले.
27 And after them the Thecoim repaired, another portion opposite the great projecting tower, even as far as the wall of Ophla.
२७पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते सरळ ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला.
28 The priests repaired above the horse-gate, [every] man over against his own house.
२८घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली.
29 And after him Sadduc the son of Emmer repaired opposite his own house: and after him repaired Samaea son of Sechenia, guard of the east-gate.
२९इम्मेराचा पुत्र सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा पुत्र शमाया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्ववेशीचा राखणदार होता.
30 After him repaired Anania son of Selemia, and Anom, the sixth son of Seleph, another portion: after him Mesulam the son of Barachia repaired over against his treasury.
३०शलेम्याचा पुत्र हनन्या याने आणि सालफचा सहावा पुत्र हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली.
31 After him repaired Melchia the son of Sarephi as far as the house of the Nathinim, and the chapmen over against the gate of Maphecad, and as far as the steps of the corner.
३१मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली.
32 And between [that and] the sheep-gate the smiths and chapmen repaired.
३२कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.

< Nehemiah 3 >