< Esias 16 >
1 I will send as it were reptiles on the land: is [not] the mount of the daughter of Sion a desolate rock?
१जो सेलापासून रानापर्यंत देशावर राज्य करतो त्यास तुम्ही सीयोनकन्येच्या पर्वतावर कोकरे पाठवा.
2 For thou shalt be as a young bird taken away from a bird that has flown: [even] thou shalt be [so], daughter of Moab: and then do thou, O Arnon,
२कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे, भटकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, मवाबाच्या स्त्रिया आर्णोन नदीच्या उताराजवळ भटकतील.
3 take farther counsel, and continually make thou a shelter from grief: they flee in darkness at mid-day; they are amazed; be not thou led captive.
३सूचना दे, न्याय अंमलात आण; दुपारी तू आपली सावली रात्रीसारखी कर; शरणार्थीस लपीव; शरणार्थींचा विश्वासघात करू नकोस.
4 The fugitives of Moab shall sojourn with thee; they shall be to you a shelter from the face of the pursuer: for thine alliance has been taken away, and the oppressing ruler has perished from off the earth.
४मवाबामधील निर्वासितास, तुझ्यात राहू दे; तू त्यांना नाश करणाऱ्यापासून लपण्याचे ठिकाण हो. कारण जुलूम करणारा थांबेल आणि नासधूस बंद होईल. ज्यांनी तुडवले ते देशातून नाहीसे होतील.
5 And a throne shall be established with mercy; and one shall sit upon it with truth in the tabernacle of David, judging, and earnestly seeking judgments, and hasting righteousness.
५विश्वासाच्या कराराने सिंहासन स्थापित होईल; आणि दावीदाच्या तंबूतून कोणीएक निष्ठावान तेथे बसेल. तो धार्मिकतेने न्याय शोधील आणि त्याप्रमाणे न्याय देईल.
6 We have heard of the pride of Moab; he is very proud. I have cut off his pride: thy prophecy shall not be thus, [no] not thus.
६आम्ही मवाबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी, त्याची फुशारकी व संतापाविषयी ऐकले आहे. पण त्यांची फुशारकी निरर्थक आहेत.
7 Moab shall howl; for all shall howl in the land of Moab: but thou shalt care for them that dwell in Seth, and thou shalt not be ashamed.
७यामुळे मवाब मवाबाकरता आकांत करील, प्रत्येकजण आकांत करील. कीर-हेरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांसाठी जे पूर्णपणे उध्वस्त झाले आहे तुम्ही त्यासाठी शोक कराल.
8 The plains of Esebon shall mourn, the vine of Sebama: swallowing up the nations, trample ye her vines, even to Jazer: ye shall not come together; wander ye in the desert: they that were sent are deserted, for they have gone over to the sea.
८हेशबोनाची शेते व त्याचप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या आहेत. राष्ट्रांच्या अधिपतींनी निवडलेल्या द्राक्षवेली पायदळी तुडवल्या आहेत त्या याजेरास पोहचल्या आणि रानामध्ये पसरून गेल्या होत्या. त्यांचा कोंब चोहोकडे पसरून समुद्राच्या पार गेला होता.
9 Therefore will I weep as with the weeping of Jazer for the vine of Sebama; Esebon and Eleale have cast down thy trees; for I will trample on thy harvest and on thy vintages, and all [thy plants] shall fall.
९यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल. मी आपल्या अश्रूंनी हेशबोन व एलाले तुम्हास पाणी घालीन. कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळांनी आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या आरोळीचा मी शेवट केला आहे.
10 And gladness and rejoicing shall be taken away from the vineyards; and they shall not at all tread wine into the vats; for [the vintage] has ceased.
१०उपवनातील फळ झाडांपासून आनंद व उल्लास नाहीसा झाला आहे; आणि तुमच्या द्राक्षमळ्यात तेथे गायनाचा व आनंदाचा गजर होत नाही. व्यापारी दाबून मद्य काढण्याचे व्यवसाय करणार नाही; द्राक्षांच्या हंगामातील आनंदाचा गजर मी बंद केला आहे.
11 Therefore my belly shall sound as a harp for Moab, and thou hast repaired my inward parts as a wall.
११यामुळे मवाबाकरता माझे अंतःकरण आणि कीर हेरेसासाठी माझे अंतर्याम तंतुवाद्यासारखे उसासे टाकतात.
12 And it shall be to thy shame, (for Moab is wearied at the altars, ) that he shall go in to the idols thereof to pray, but they shall not be at all able to deliver him.
१२जेव्हा मवाब स्वतः उंचस्थानावर जाताना थकेल आणि प्रार्थना करायला त्याच्या मंदिरात प्रवेश करील, तरी त्याची प्रार्थना काहीच सिद्धीस नेणार नाही.
13 This is the word which the Lord spoke against Moab, when he spoke.
१३पूर्वीच्या काळी मवाबाविषयी जे वचन परमेश्वर बोलला आहे ते हेच आहे.
14 And now I say, in three years, of the years of an hireling, the glory of Moab shall be dishonoured [with] all his great wealth; and he shall be left few in number, and not honoured.
१४पुन्हा परमेश्वर बोलला, “तीन वर्षांच्या आतच, मवाबाचे गौरव नाहीसे होईल; त्यांचे लोक पुष्कळ असूनही, अवशेष फार थोडे आणि क्षुल्लक राहील.