< Zechariah 3 >
1 And he let me see Joshua, the high priest, in his place before the angel of the Lord, and the Satan at his right hand ready to take up a cause against him.
१देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.
2 And the Lord said to the Satan, May the Lord's word be sharp against you, O Satan, the word of the Lord who has taken Jerusalem for himself: is this not a burning branch pulled out of the fire?
२मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरूशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?”
3 Now Joshua was clothed in unclean robes, and he was in his place before the angel.
३यहोशवा देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता.
4 And he made answer and said to those who were there before him, Take the unclean robes off him, and let him be clothed in clean robes;
४म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.”
5 And let them put a clean head-dress on his head. So they put a clean head-dress on his head, clothing him with clean robes: and to him he said, See, I have taken your sin away from you.
५तो म्हणाला, “त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली.
6 And the angel of the Lord made a statement to Joshua, and said,
६पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशवाला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला,
7 These are the words of the Lord of armies: If you will go in my ways and keep what I have put in your care, then you will be judge over my Temple and have the care of my house, and I will give you the right to come in among those who are there.
७सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील, तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील. माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन.
8 Give ear now, O Joshua, the high priest, you and your friends who are seated before you; for these are men who are a sign: for see, I will let my servant the Branch be seen.
८तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका! ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.
9 For see, the stone which I have put before Joshua; on one stone are seven eyes: see, the design cut on it will be my work, says the Lord of armies, and I will take away the sin of that land in one day.
९आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत, आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’ आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
10 In that day, says the Lord of armies, you will be one another's guests under the vine and under the fig-tree.
१०सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.”