< Deuteronomy 20 >
1 When you go out to war against other nations, and come face to face with horses and war-carriages and armies greater in number than yourselves, have no fear of them: for the Lord your God is with you, who took you up out of the land of Egypt.
१तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.
2 And when you are on the point of attacking, let the priest come forward and say to the people,
२तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याकडे येऊन त्यांच्याशी बोलणे करावे.
3 Give ear, O Israel: today you are going forward to the fight; let your heart be strong; do not let uncontrolled fear overcome you because of those who are against you;
३ते अशी, “इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका.
4 For the Lord your God goes with you, fighting for you to give you salvation from those who are against you.
४कारण तुम्हास देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरूद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हास मदत करणारा आहे.”
5 And let the overseers say to the people, If there is any man who has made for himself a new house and has not gone into it, let him go back to his house, so that in the event of his death in the fight, another may not take his house for himself.
५मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला असे सांगावे, “नवीन घर बांधून अजून त्याचे अर्पण केले नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
6 Or if any man has made a vine-garden without taking the first-fruits of it, let him go back to his house, so that in the event of his death in the fight, another may not be the first to make use of the fruit.
६द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल.
7 Or if any man is newly married and has had no sex relations with his wife, let him go back to his house, so that in the event of his death in the fight, another man may not take her.
७तसेच, पत्नीला मागणी घालून अजून लग्न केलेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.”
8 And let the overseers go on to say to the people, If there is any man whose heart is feeble with fear, let him go back to his house before he makes the hearts of his countrymen feeble.
८त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की “भीत्रा व घाबरलेल्या मनाचा कोणी असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही हृदयाचे अवसान गळेल.”
9 Then, after saying these words to the people, let the overseers put captains over the army.
९अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी.
10 When you come to a town, before attacking it, make an offer of peace.
१०तुम्ही एखाद्या नगरावर चाल करून जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करून पाहा.
11 And if it gives you back an answer of peace, opening its doors to you, then all the people in it may be put to forced work as your servants.
११त्यांनी तुमच्या बोलण्याला शांतीने उत्तर देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील.
12 If however it will not make peace with you, but war, then let it be shut in on all sides:
१२पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला.
13 And when the Lord your God has given it into your hands, let every male in it be put to death without mercy.
१३आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना तलवारीने ठार करा.
14 But the women and the children and the cattle and everything in the town and all its wealth, you may take for yourselves: the wealth of your haters, which the Lord your God has given you, will be your food.
१४पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत: साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.
15 So you are to do to all the towns far away, which are not the towns of these nations.
१५तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे.
16 But in the towns of these peoples whose land the Lord your God is giving you for your heritage, let no living thing be kept from death:
१६पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका.
17 Give them up to the curse; the Hittite, the Amorite, the Canaanite, the Perizzite, the Hivite, and the Jebusite, as the Lord your God has given you orders:
१७हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा.
18 So that you may not take them as your example and do all the disgusting things which they do in the worship of their gods, so sinning against the Lord your God.
१८नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हास शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.
19 If in war a town is shut in by your armies for a long time, do not let its trees be cut down and made waste; for their fruit will be your food; are the trees of the countryside men for you to take up arms against them?
१९युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत.
20 Only those trees which you are certain are not used for food may be cut down and put to destruction: and you are to make walls of attack against the town till it is taken.
२०पण ज्यांना फळ येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेल ते नगर पडेपर्यंत युद्धासाठी लागणारी तटबंदी बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.