< 1 Kings 6 >
1 In the four hundred and eightieth year after the children of Israel came out of the land of Egypt, in the fourth year that Solomon was king of Israel, in the month Ziv, which is the second month, the building of the Lord's house was started.
१अशा तऱ्हेने शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देशातून बाहेर निघाल्यापासून चारशे ऐंशी वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथ्या वर्षी. जीव महिना जो दुसरा महिना होता त्यामध्ये तो परमेश्वराचे मंदिर बांधू लगला.
2 The house which Solomon made for the Lord was sixty cubits long, twenty cubits wide and thirty cubits high.
२शलमोन राजाने परमेश्वरासाठी जे मंदिर बाधंले त्याची लांबी साठ हात, रूंदी वीस हात व उंची तीस हात होती.
3 The covered way before the Temple of the house was twenty cubits long, as wide as the house, and ten cubits wide in front of the house.
३मंदिराची देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रूंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर त्याची रूंदी दहा हात होती.
4 And for the house he made windows, with network across.
४मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या.
5 And against the walls all round, and against the walls of the Temple and of the inmost room, he put up wings, with side rooms all round:
५मंदिराच्या मुख्य खोलीच्या लागून अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. तसेच मंदिराचे पवित्रस्थान व परमपवित्रस्थान यांच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले.
6 The lowest line of them being five cubits wide, the middle six cubits wide and the third seven cubits; for there was a space all round the outside walls of the house so that the boards supporting the rooms did not have to be fixed in the walls of the house.
६सर्वात खालच्या मजल्याची रूंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या बाहेरच्या भिंतीस तोडे ठेवले होते, ते अशासाठी की, मंदीराच्या भिंतीत तुळ्या शिरू नयेत.
7 (And the stones used in the building of the house were squared at the place where they were cut out; there was no sound of hammer or axe or any iron instrument while they were building the house.)
७भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले खाणीतूनच ते योग्य मापाने कापून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना हातोड्या, कुऱ्हाडी किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
8 The door to the lowest side rooms was in the right side of the house; and they went up by twisting steps into the middle rooms, and from the middle into the third.
८तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.
9 So he put up the house and made it complete, roofing it with boards of cedar-wood.
९शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.
10 And he put up the line of side rooms against the walls of the house, fifteen cubits high, resting against the house on boards of cedar-wood.
१०मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची पाच पाच हात उंच होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
11 (And the word of the Lord came to Solomon, saying,
११परमेश्वराचे वचन शलमोनाकडे आले तो म्हणाला,
12 About this house which you are building: if you will keep my laws and give effect to my decisions and be guided by my rules, I will give effect to my word which I gave to David your father.
१२“माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडिल दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन.
13 And I will be ever among the children of Israel, and will not go away from my people.
१३मी इस्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.”
14 So Solomon made the building of the house complete.)
१४शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
15 The walls of the house were covered inside with cedar-wood boards; from the floor to the roof of the house they were covered inside with wood; and the floor was covered with boards of cypress-wood.
१५मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
16 And at the back of the house a further space of twenty cubits was shut in with boards of cedar-wood, for the inmost room.
१६मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
17 And the house, that is, the Temple, in front of the holy place was forty cubits long.
१७मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती.
18 (All the inside of the house was cedar-wood, ornamented with designs of buds and flowers; no stonework was to be seen inside.)
१८हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते.
19 And he made ready an inmost room in the middle of the house, in which to put the ark of the agreement of the Lord.
१९आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी गाभारा करवून घेतला होता.
20 And the inmost room was twenty cubits square and twenty cubits high, plated over with clear gold, and he made an altar of cedar-wood, plating it with gold.
२०याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती.
21 Solomon had all the inside of the house covered with gold, and he put chains of gold across in front of the inmost room, which itself was covered with gold.
२१शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या.
22 Plates of gold were put all through the house till it was covered completely (and the altar in the inmost room was all covered with gold).
२२परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले.
23 In the inmost room he made two winged beings of olive-wood, ten cubits high;
२३कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले.
24 With outstretched wings five cubits wide; the distance from the edge of one wing to the edge of the other was ten cubits.
२४करुबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
25 The two winged ones were ten cubits high, of the same size and form.
२५दुसरा करुबही दहा हात उंच होतो; दोन्ही करुब एका मापाचे व एका आकाराचे होते.
26 The two of them were ten cubits high.
२६आणि एका करुबाची उंची दहा हात होती, दुसऱ्या करुबाचीही तेवढीच होती.
27 These were placed inside the inner house, their outstretched wings touching the walls of the house, one touching one wall and one the other, while their other wings were touching in the middle.
२७हे करुब देवदूत आतल्या परमपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते.
28 These winged ones were plated over with gold.
२८हे करुब सोन्याने मढवले होते.
29 And all the walls of the house inside and out were ornamented with forms of winged ones and palm-trees and open flowers.
२९दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेली होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.
30 And the floor of the house was covered with gold, inside and out.
३०दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती.
31 For the way into the inmost room he made doors of olive-wood, the arch and the door supports forming a five-sided opening.
३१शलमोनाने जैतूनाच्या लाकडाचे दरवाजे करून ते परमपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या बाह्या व कपाळपट्टी यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
32 On the olive-wood doors were cut designs of winged ones and palm-trees and open flowers, all of them, with the doors, plated with gold.
३२जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.
33 Then he made pillars of olive-wood for the way into the Temple; the pillars were square:
३३त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाच्या चौकटी बसवल्या होत्या; त्याने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता;
34 And two folding doors of cypress-wood, with two leaves.
३४त्याचे दोन दरवाजे देवदारू लाकडाचे होते प्रत्येक दरवाज्याला दोन दोन दुमटण्या होत्या.
35 These were ornamented with designs of winged ones and palm-trees and open flowers, plated over with gold.
३५त्यावरही पुन्हा करुब, खजुरीची झाडे, उमलेली फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने मढवली होती.
36 And the inner space was walled with three lines of squared stones and a line of cedar-wood boards.
३६मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या.
37 In the fourth year the base of the house was put in its place, in the month Ziv.
३७वर्षाचा चौथा महिना जीव मध्ये त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला.
38 And in the eleventh year, in the month Bul, which is the eighth month, the building of the house was complete in every detail, as it had been designed. So he was seven years building it.
३८अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. शलमोनाला मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.