< Song of Solomon 2 >
1 I am a rose of Sharon, a lily of the valley.
१(ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे) मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे. दरीतले कमलपुष्प आहे.
2 Like a lily among the thorns is my darling among the maidens.
२(पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प, तसे माझे प्रिये इतर मुलींमध्ये तू आहेस.
3 Like an apple tree among the trees of the forest is my beloved among the young men. I delight to sit in his shade, and his fruit is sweet to my taste.
३(स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला. आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली.
4 He has brought me to the house of wine, and his banner over me is love.
४त्याने मला मेजवानीच्या घरात आणले, आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला.
5 Sustain me with raisins; refresh me with apples, for I am faint with love.
५(ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.
6 His left hand is under my head, and his right arm embraces me.
६(ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत आहे.
7 O daughters of Jerusalem, I adjure you by the gazelles and does of the field: Do not arouse or awaken love until the time is right.
७(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, तुम्हास वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते की, आमचे प्रेम करणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका.
8 Listen! My beloved approaches. Look! Here he comes, leaping across the mountains, bounding over the hills.
८(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे, डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9 My beloved is like a gazelle or a young stag. Look, he stands behind our wall, gazing through the windows, peering through the lattice.
९माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 My beloved calls to me, “Arise, my darling. Come away with me, my beautiful one.
१०माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला, माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, ये आपण दूर जाऊ या!
11 For now the winter is past; the rain is over and gone.
११बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला.
12 The flowers have appeared in the countryside; the season of singing has come, and the cooing of turtledoves is heard in our land.
१२भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे.
13 The fig tree ripens its figs; the blossoming vines spread their fragrance. Arise, come away, my darling; come away with me, my beautiful one.”
१३अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे. आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.
14 O my dove in the clefts of the rock, in the crevices of the cliff, let me see your face, let me hear your voice; for your voice is sweet, and your countenance is lovely.
१४माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे. मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.
15 Catch for us the foxes— the little foxes that ruin the vineyards— for our vineyards are in bloom.
१५(ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे. कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.
16 My beloved is mine and I am his; he pastures his flock among the lilies.
१६(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे. तो आपला कळप कमळांच्यामध्ये चारीत आहे.
17 Before the day breaks and shadows flee, turn, my beloved, and be like a gazelle or a young stag on the mountains of Bether.
१७(ती स्त्री तिच्या प्रियकरांबरोबर बोलत आहे) शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा. माझ्या प्राणप्रिया, वियोगाच्या पर्वतावर हरीणासारखा किंवा हरिणीच्या पाडसासारखा परत फीर.