< Psalms 6 >

1 For the choirmaster. With stringed instruments, according to Sheminith. A Psalm of David. O LORD, do not rebuke me in Your anger or discipline me in Your wrath.
मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
2 Be merciful to me, O LORD, for I am frail; heal me, O LORD, for my bones are in agony.
हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
3 My soul is deeply distressed. How long, O LORD, how long?
माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
4 Turn, O LORD, and deliver my soul; save me because of Your loving devotion.
हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
5 For there is no mention of You in death; who can praise You from Sheol? (Sheol h7585)
कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? (Sheol h7585)
6 I am weary from groaning; all night I flood my bed with weeping and drench my couch with tears.
मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
7 My eyes fail from grief; they grow dim because of all my foes.
शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
8 Depart from me, all you workers of iniquity, for the LORD has heard my weeping.
अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9 The LORD has heard my cry for mercy; the LORD accepts my prayer.
परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
10 All my enemies will be ashamed and dismayed; they will turn back in sudden disgrace.
१०माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.

< Psalms 6 >