< John 10 >

1 Verily, verily I say to you, he that goes not through the door into the sheepfold, but climbs up some other way, he is a thief, and a robber.
“मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे.
2 But he that enters through the door, is the shepherd of the sheep.
जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे.
3 To him the door-keeper opens; and the sheep hear his voice, and he calls his own sheep by name, and leads them out.
त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो;
4 And when he puts his own sheep out, he goes before them; and the sheep follow him; for they know his voice.
आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.
5 And a stranger they will not follow, but will flee from him; for they know not the voice of strangers.
ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.”
6 This parable spoke Jesus to them; but they knew not the meaning of the things which he spoke to them.
येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.
7 Therefore Jesus spoke again to them: Verily, verily I say to you, I am the door of the sheep.
म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी मेंढरांचे द्वार आहे.
8 All that came before me were thieves and robbers; but the sheep did not hear them.
जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही.
9 I am the door: if any one enters through me, he shall be saved; and he shall go in and out, and find pasture.
मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल.
10 The thief comes only to steal and kill and destroy. I have come that they may have life, and have it in abundance.
१०चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
11 I am the good shepherd: the good shepherd lays down his life for the sheep.
११मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
12 But he that is a hireling, and not the shepherd, to whom the sheep do not belong, sees the wolf coming, and leaves the sheep, and flees; and the wolf catches the sheep, and scatters them.
१२जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.
13 The hireling flees because he is a hireling, and cares not for the sheep.
१३मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही.
14 I am the good shepherd, and I know my sheep, and am known by mine.
१४मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात;
15 As the Father knows me, I also know the Father, and I lay down my life for the sheep.
१५आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.
16 And other sheep I have, which are not of this fold; those, also, must I bring, and they will hear my voice: and there shall be one flock, one shepherd.
१६या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
17 For this reason, my Father loves me, because I lay down my life that I may take it again.
१७मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.
18 No one takes it from me, but I lay it down of myself. I have authority to lay it down, and I have authority to take it again. This commandment I have received from my Father.
१८कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”
19 Again, therefore, there was a division among the Jews, on account of these words.
१९म्हणून या शब्दांवरून यहूदी लोकात पुन्हा फूट पडली.
20 And many of them said: He has a demon, and is mad; why do you hear him?
२०त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?”
21 Others said: These are not the words of one that has a demon. Can a demon open the eyes of the blind?
२१दुसरे म्हणाले, “ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”
22 And the feast of the dedication was celebrated in Jerusalem, and it was winter:
२२तेव्हा यरूशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता.
23 and Jesus was walking in the temple, in Solomon’s porch.
२३आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवडीत फिरत होता.
24 Then the Jews came round him, and said to him: How long do you keep us in suspense? If you are the Christ, tell us plainly.
२४म्हणून यहूदी लोक त्याच्याभोवती जमले आणि त्यास म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.”
25 Jesus answered them: I have told you, and you do not believe. The works which I do in my Father’s name, these testify of me.
२५येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात.
26 But you believe not, because you are not of my sheep. As I said to you,
२६तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
27 my sheep hear my voice, and I know them, and they follow me:
२७माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
28 and I give them eternal life; and they shall never perish, and no one shall take them out of my hand. (aiōn g165, aiōnios g166)
२८मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. (aiōn g165, aiōnios g166)
29 My Father, who gave them to me, is greater than all; and no one is able to take them out of my Father’s hand.
२९पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.
30 I and my Father are one.
३०मी आणि पिता एक आहोत.”
31 Then the Jews took up stones again, to stone him.
३१तेव्हा यहूदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.
32 Jesus answered them: Many good works have I showed you from my Father: for which of these works do you stone me?
३२येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?”
33 The Jews answered and said to him: We do not stone you for a good work, but for your impious words; and because you, being man, make yourself God.
३३यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.”
34 Jesus answered them: Is it not written in your law, I said, you are gods?
३४येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही देव आहा, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?
35 If he called them gods, to whom the word of God was committed, (and the scripture can not be made void, )
३५ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,
36 do you say of him, whom the Father has sanctified, and sent into the world, You speak impiously, because I said, I am the Son of God?
३६तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले, त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही मला म्हणता काय?
37 If I do not the works of my Father, believe me not;
३७मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.
38 but if I do, though you believe not me, believe the works, that you may know and believe that the Father is in me, and I in him.
३८पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे. हे तुम्ही ओळखून घ्यावे.”
39 Then they sought again to take him, but he escaped from their hands.
३९ते त्यास पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.
40 And he went away again beyond the Jordan, to the place where John first immersed, and there he abode.
४०मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्याठिकाणी जाऊन राहिला.
41 And many came to him, and said: John did no sign; but all things that John said of this man were true.
४१तेव्हा पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे आहे, तरी योहानाने याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”
42 And many who were there believed on him.
४२तेथे पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

< John 10 >