< Luke 3 >
1 Now in the fifteenth year of the reign of Tiberius Caesar, Pontius Pilate being governor of Judea, and Herod being tetrarch of Galilee, and his brother Philip tetrarch of the region of Ituraea and Trachonitis, and Lysanias tetrarch of Abilene,
१आता तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीया प्रांताचा शासक होता आणि हेरोद चौथाई गालील प्रांताचा शासक असताना आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा चौथाई इतुरीया व त्राखोनीती या देशांचा शासक व लूसनिय हा चौथाई अबिलेनेचा शासक होता.
2 during the high priesthood of Annas and Caiaphas, the word of God came to John, the son of Zacharias, in the wilderness.
२आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक लोक होते, तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.
3 He came into all the region around the Jordan, preaching the baptism of repentance for remission of sins.
३तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.
4 As it is written in the book of the words of Isaiah the prophet, “The voice of one crying in the wilderness, ‘Make ready the way of the Lord. Make his paths straight.
४यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः “रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.
5 Every valley will be filled. Every mountain and hill will be brought low. The crooked will become straight, and the rough ways smooth.
५प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील
6 All flesh will see God’s salvation.’”
६आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील.’”
7 He said therefore to the multitudes who went out to be baptized by him, “You offspring of vipers, who warned you to flee from the wrath to come?
७त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले?
8 Therefore produce fruits worthy of repentance, and do not begin to say among yourselves, ‘We have Abraham for our father;’ for I tell you that God is able to raise up children to Abraham from these stones!
८पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.
9 Even now the ax also lies at the root of the trees. Every tree therefore that does not produce good fruit is cut down and thrown into the fire.”
९आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”
10 The multitudes asked him, “What then must we do?”
१०नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?”
11 He answered them, “He who has two coats, let him give to him who has none. He who has food, let him do likewise.”
११त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12 Tax collectors also came to be baptized, and they said to him, “Teacher, what must we do?”
१२काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13 He said to them, “Collect no more than that which is appointed to you.”
१३तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका.
14 Soldiers also asked him, saying, “What about us? What must we do?” He said to them, “Extort from no one by violence, neither accuse anyone wrongfully. Be content with your wages.”
१४काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
15 As the people were in expectation, and all men reasoned in their hearts concerning John, whether perhaps he was the Christ,
१५तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत.
16 John answered them all, “I indeed baptize you with water, but he comes who is mightier than I, the strap of whose sandals I am not worthy to loosen. He will baptize you in the Holy Spirit and fire.
१६त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
17 His winnowing fan is in his hand, and he will thoroughly cleanse his threshing floor, and will gather the wheat into his barn; but he will burn up the chaff with unquenchable fire.”
१७त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”
18 Then with many other exhortations he preached good news to the people,
१८योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली.
19 but Herod the tetrarch, being reproved by him for Herodias, his brother’s wife, and for all the evil things which Herod had done,
१९योहानाने चौथाईचा शासक हेरोद याची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नी हेरोदीया हिच्याशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.
20 added this also to them all, that he shut up John in prison.
२०हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
21 Now when all the people were baptized, Jesus also had been baptized and was praying. The sky was opened,
२१तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
22 and the Holy Spirit descended in a bodily form like a dove on him; and a voice came out of the sky, saying “You are my beloved Son. In you I am well pleased.”
२२आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”
23 Jesus himself, when he began to teach, was about thirty years old, being the son (as was supposed) of Joseph, the son of Heli,
२३जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत. योसेफ एलीचा मुलगा होता
24 the son of Matthat, the son of Levi, the son of Melchi, the son of Jannai, the son of Joseph,
२४एली मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा, लेवी मल्खीचा, मल्खी यन्रयाचा, यन्रया योसेफाचा मुलगा होता.
25 the son of Mattathias, the son of Amos, the son of Nahum, the son of Esli, the son of Naggai,
२५योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा, अमोस नहूमाचा, नहूम हेस्लीचा, हेस्ली नग्गयाचा,
26 the son of Maath, the son of Mattathias, the son of Semein, the son of Joseph, the son of Judah,
२६नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता.
27 the son of Joanan, the son of Rhesa, the son of Zerubbabel, the son of Shealtiel, the son of Neri,
२७योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा, रेशा जरूब्बाबेलाचा, जरूब्बाबेल शल्तीएलाचा, शल्तीएल नेरीचा,
28 the son of Melchi, the son of Addi, the son of Cosam, the son of Elmodam, the son of Er,
२८नेरी मल्खीचा, मल्खी अद्दीचा, अद्दी कोसोमाचा, कोसोम एल्मदामाचा, एल्मदाम एराचा,
29 the son of Jose, the son of Eliezer, the son of Jorim, the son of Matthat, the son of Levi,
२९एर येशूचा, येशू अलिएजराचा, अलिएजर योरीमाचा, योरीम मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
30 the son of Simeon, the son of Judah, the son of Joseph, the son of Jonan, the son of Eliakim,
३०लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा, यहूदा योसेफाचा, योसेफ योनामाचा, योनाम एल्याकीमाचा,
31 the son of Melea, the son of Menan, the son of Mattatha, the son of Nathan, the son of David,
३१एल्याकीम मल्लयाचा, मल्लया मिन्नाचा, मिन्ना मत्ताथाचा, मत्ताथ नाथानाचा, नाथान दाविदाचा,
32 the son of Jesse, the son of Obed, the son of Boaz, the son of Salmon, the son of Nahshon,
३२दावीद इशायाचा, इशाय ओबेदाचा, ओबेद बवाजाचा, बवाज सल्मोनाचा, सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
33 the son of Amminadab, the son of Aram, the son of Hezron, the son of Perez, the son of Judah,
३३नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अदामीनचा, अदामीन अर्णयाचा, अर्णय हेस्रोनाचा, हेस्रोन पेरेसाचा, पेरेस यहूदाचा,
34 the son of Jacob, the son of Isaac, the son of Abraham, the son of Terah, the son of Nahor,
३४यहूदा याकोबाचा, याकोब इसहाकाचा, इसहाक अब्राहामाचा, अब्राहाम तेरहाचा, तेरह नाहोराचा,
35 the son of Serug, the son of Reu, the son of Peleg, the son of Eber, the son of Shelah,
३५नाहोर सरुगाचा, सरुग रऊचा, रऊ पेलेगाचा, पेलेग एबराचा, एबर शेलहाचा मुलगा होता.
36 the son of Cainan, the son of Arphaxad, the son of Shem, the son of Noah, the son of Lamech,
३६शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्षद शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेखाचा,
37 the son of Methuselah, the son of Enoch, the son of Jared, the son of Mahalaleel, the son of Cainan,
३७लामेख मथुशलहाचा, मथुशलह हनोखाचा, हनोख यारेदाचा, यारेद महललेलाचा, महललेल केनानाचा,
38 the son of Enos, the son of Seth, the son of Adam, the son of God.
३८केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता.