< 2 Thessalonians 3 >

1 Finally, brothers, pray about us, so that the word of the Lord may run and be glorified, just as also with you,
शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
2 and that we may be delivered from aberrant and wicked men, for the faith is not of all men.
आणि हेकेखोर व दुष्ट मनुष्यांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वाच्या ठायी विश्वास आहे असे नाही.
3 But the Lord is faithful, who will establish you and will keep you from evil.
परंतू प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हास स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील.
4 And we are persuaded in the Lord toward you, that what we command you, ye both are doing and will do.
तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.
5 And may the Lord direct your hearts for the love of God, and for the steadfastness of the Christ.
प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
6 Now we command you, brothers, in the name of our Lord Jesus Christ, for you to withdraw from every brother who walks disorderly and not according to the tradition, which they received from us.
बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
7 For ye yourselves know how it is necessary to imitate us. Because we did not act disorderly among you,
आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही;
8 nor did we eat bread gratis from any man, but in labor and toil, working night and day in order not to burden any of you.
आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.
9 Not because we have no right, but that we might give ourselves an example to you, in order to imitate us.
तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले.
10 For even when we were with you we commanded you this, that if any man will not work, neither let him eat.
१०कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.
11 For we hear of some who walk among you disorderly, not working at all, but being busybodies.
११तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो.
12 Now to such men we command and exhort by our Lord Jesus Christ, that, working with quietness, they should eat their own bread.
१२अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.
13 But ye, brothers, do not become weary doing good.
१३तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका.
14 And if any man does not obey our word by this letter, note that man, and do not associate with him, so that he may be ashamed.
१४या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका;
15 And yet do not regard him as an enemy, but admonish him as a brother.
१५तरी त्यास शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कानउघडणी करा.
16 Now may the Lord of peace himself give you peace through everything in every way. The Lord is with all of you.
१६शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हास शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
17 The salutation of Paul by my hand, which is a mark in every letter I write this way.
१७मी, पौलाने, स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
18 The grace of our Lord Jesus Christ is with all of you. Truly.
१८आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

< 2 Thessalonians 3 >