< Openbaring 11 >
1 En mij werd een rietstok gegeven, een meetroede gelijk; en de engel stond en zeide: Sta op, en meet den tempel Gods en het altaar, en degenen, die daarin aanbidden.
१मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे.
2 En laat het voorhof uit, dat van buiten den tempel is, en meet dat niet, want het is den heidenen gegeven; en zij zullen de heilige stad vertreden twee en veertig maanden.
२पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील.
3 En Ik zal Mijn twee getuigen macht geven, en zij zullen profeteren duizend tweehonderd zestig dagen, met zakken bekleed.
३आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”
4 Dezen zijn de twee olijfbomen, en de twee kandelaren, die voor den God der aarde staan.
४हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत.
5 En zo iemand die wil beschadigen, een vuur zal uit hun mond uitgaan, en zal hun vijanden verslinden; en zo iemand hen wil beschadigen, die moet alzo gedood worden.
५जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे.
6 Dezen hebben macht den hemel te sluiten, opdat geen regen regene in de dagen hunner profetering; en zij hebben macht over de wateren, om die in bloed te verkeren, en de aarde te slaan met allerlei plage, zo menigmaal als zij zullen willen.
६या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडांनी पिडण्याचा अधिकार दिलेला आहे.
7 En als zij hun getuigenis zullen geeindigd hebben, zal het beest, dat uit den afgrond opkomt, hun krijg aandoen, en het zal hen overwinnen, en zal hen doden. (Abyssos )
७त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. (Abyssos )
8 En hun dode lichamen zullen liggen op de straat der grote stad, die geestelijk genoemd wordt Sodoma en Egypte, alwaar ook onze Heere gekruist is.
८तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.
9 En de mensen uit de volken, en geslachten, en talen, en natien, zullen hun dode lichamen zien drie dagen en een halven, en zullen niet toelaten, dat hun dode lichamen in graven gelegd worden.
९आणि प्रत्येक समाजातले, वंशांतले, भाषेचे व राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत.
10 En die op de aarde wonen, die zullen verblijd zijn over hen, en zullen vreugde bedrijven, en zullen elkander geschenken zenden; omdat deze twee profeten degenen, die op de aarde wonen, gepijnigd hadden.
१०त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते.
11 En na die drie dagen en een halven, is een geest des levens uit God in hen gegaan; en zij stonden op hun voeten; en er is grote vrees gevallen op degenen, die hen aanschouwden.
११आणि साडेतीन दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले.
12 En zij hoorden een grote stem uit den hemel, die tot hen zeide: Komt herwaarts op. En zij voeren op naar den hemel in de wolk; en hun vijanden aanschouwden hen.
१२आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, “इकडे वर या” मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैऱ्यांनी त्यांना पाहिले.
13 En in diezelfde ure geschiedde een grote aardbeving, en het tiende deel der stad is gevallen, en er zijn in de aardbeving gedood zeven duizend namen van mensen, en de overigen zijn zeer bevreesd geworden, en hebben den God des hemels heerlijkheid gegeven.
१३आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला; तेव्हा नगराचा दहावा भाग पडला आणि भूकंपात सात हजार लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले.
14 Het tweede wee is weggegaan; ziet, het derde wee komt haast.
१४दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे.
15 En de zevende engel heeft gebazuind, en er geschiedden grote stemmen in den hemel, zeggende: De koninkrijken der wereld zijn geworden onzes Heeren en van Zijn Christus, en Hij zal als Koning heersen in alle eeuwigheid. (aiōn )
१५मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील. (aiōn )
16 En de vier en twintig ouderlingen, die voor God zitten op hun tronen, vielen neder op hun aangezichten, en aanbaden God,
१६तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले
17 Zeggende: Wij danken U, Heere God almachtig, Die is, en Die was, en Die komen zal! dat Gij Uw grote kracht hebt aangenomen, en als Koning hebt geheerst;
१७हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.
18 En de volken waren toornig geworden, en Uw toorn is gekomen, en de tijd der doden, om geoordeeld te worden, en om het loon te geven Uw dienstknechten, den profeten, en den heiligen, en dengenen, die Uw Naam vrezen, den kleinen en den groten; en om te verderven degenen, die de aarde verdierven.
१८राष्ट्रे रागावली आहेत परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.
19 En de tempel Gods in de hemel is geopend geworden, en de ark Zijns verbonds is gezien in Zijn tempel; en er werden bliksemen, en stemmen, en donderslagen, en aardbeving, en grote hagel.
१९तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.