< Jeremia 19 >
1 Jahweh sprak: Ge moet met enige oudsten van het volk en der priesters een aarden kruik kopen,
१परमेश्वर असे म्हणतो, “जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे, आणि तुझ्यासोबत लोकांतले वडील आणि याजकांतले वडील बोलावून घे.
2 naar het Ben-Hinnom-dal gaan tegenover de Schervenpoort, en daar de woorden verkondigen, die Ik tot u ga spreken.
२नंतर बेन हिन्नोमाच्या मुलाचे खोरे जे कुंभाराच्या वाड्याच्या वेशीजवळ आहे तेथे जा, आणि मी तुला सांगतो ती वचने तिथे घोषीत कर.
3 Ge moet hun zeggen: Hoort het woord van Jahweh, koningen van Juda en bewoners van Jerusalem! Zo spreekt Jahweh der heirscharen, Israëls God! Zie, Ik ga rampen brengen over deze plaats, waarvan de oren tuiten van iedereen die het hoort.
३तू असे म्हण, तुझ्याबरोबर असलेल्या लोकांस सांग, यहूदाच्या राजांनो आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, पाहा! मी या ठिकाणी अरिष्ट आणणार, आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान झिणझिणतील.
4 Want ze hebben Mij verlaten, deze plaats van Mij vervreemd, en daar wierook gebrand voor vreemde goden, die zijzelf, noch hun vaderen, noch Juda’s koningen hebben gekend. Zij hebben deze plaats met het bloed van onschuldigen gedrenkt,
४मी असे करणार कारण त्यांनी मला सोडले आणि हे ठिकाण विटाळवीले आहे. माहित नसलेल्या अशा परक्या दैवतांना त्यांनी या ठिकाणी जागा दिली. त्यांनी व त्यांच्या पुर्वजांनी आणि यहूदाच्या राजांनी हे ठिकाण निष्पाप रक्ताने भरले आहे.
5 en offerhoogten voor Báal gebouwd, om hun zonen en dochters als offer voor Báal te verbranden; wat Ik toch zeker niet heb geboden, en wat Mij nooit in de gedachte is gekomen.
५यहूदाच्या राजाने बाल दैवतासाठी उच्चासने बांधली त्यामध्ये ते आपल्या मुलांना अग्नीत होमार्पण जाळत असत. असे काही मी त्यांना करायला आज्ञा दिली नसून पण. आणि असे कधीही माझ्या मनातही आले नाही.
6 Daarom zullen de dagen komen, spreekt Jahweh, dat men deze plaats niet meer Tófet zal noemen en Ben-Hinnom-dal, maar "Moord-dal".
६यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हल्ली हिन्नोमच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.
7 Want Ik zal Juda en Jerusalem radeloos maken op deze plaats, ze voor hun vijanden doen vallen door het zwaard en door de hand van hen, die hun naar het leven staan, en hun lijken tot aas werpen voor de vogels uit de lucht en voor de beesten op aarde.
७येथेच मी यहूदातील व यरूशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांच्या हाती लागण्याआधी मी त्यांना तलवारीवर पाडून मारुन टाकीन. मग त्यांची प्रेते आकाशातील पक्षी व जंगली पशू ह्यांचे भक्ष्य होईल.
8 Ik zal van deze stad een wildernis maken en een bespotting; wie er voorbijgaat, verstart, en zal met haar plagen gaan spotten.
८या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरूशलेम जवळून जाताना लोक तिच्या पीडा पाहून माना हलवतील व फुत्कार सोडतील, मी त्या नगरीला नाश आणि फुत्काराची गोष्ट अशी करीन.
9 Ik zal ze het vlees van hun zonen en dochters doen eten; ze zullen elkanders vlees verslinden in de nood en benauwdheid, waarin hun vijanden, en die hun naar het leven staan, hen zullen brengen.
९त्यांच्या शत्रूंनी आणि त्यांच्या जिवावर टपणारे, जो वेढा आणि यातना त्यांच्यावर आणतील, त्यामध्ये ते स्वत: च्याच मुलांचे आणि मुलींचे मांस खातील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्यास खाईल, असे मी त्यांना करीन.
10 Daarna moet ge de kruik verbrijzelen voor de ogen der mannen, die met u mee zijn gegaan,
१०मग जे लोक तुझ्या सोबत होते, त्यांच्या देखत तू मडके फोड.
11 en tot hen zeggen: Zo spreekt Jahweh der heirscharen! Ik zal het volk en deze stad verbrijzelen, zoals men een aarden pot verbrijzelt, die men niet meer kan maken. In de Tófet zal men begraven bij gebrek aan plaats.
११आणि पुढील गोष्टी सांग: सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जसे त्याने मडके फोडले आणि ते पुन्हा जोडने अशक्य आहे, तसेच मी शहरा सोबत करेन, म्हणजे ते तोफेतमध्ये मृतांना पुरता न येणार, इतक्या प्रेतांना ते तेथे पुरतील.
12 Zo zal Ik ook deze plaats en haar bewoners behandelen, is de godsspraak van Jahweh, en van deze stad een Tófet maken.
१२परमेश्वर असे म्हणतो, हे ठिकाण आणि त्यातील राहणारे, ज्यांच्या बाबतीत मी असेच करीन. मी या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.
13 En Jerusalems huizen en de paleizen van Juda’s koningen zullen even onrein zijn als de plaats van de Tófet: al die huizen, waar men op het dak wierook gebrand heeft voor heel het heir aan de hemel, en plengoffers voor vreemde goden heeft gebracht.
१३‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”
14 Daarna ging Jeremias weg van de Tófet, waar Jahweh hem had heengezonden om te profeteren. Hij ging in de voorhof staan van het huis van Jahweh, en zeide nu tot heel het volk:
१४मग परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी भविष्य देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडले. मग तो परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहिला आणि सर्व लोकांशी बोलला.
15 Zo spreekt Jahweh der heirscharen, Israëls God! Zie, Ik ga over deze stad en alle omliggende steden al de rampen brengen, waarmee Ik ze heb bedreigd; want ze blijven hardnekkig, en luisteren niet naar mijn woorden!
१५“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो: पाहा! मी यरूशलेमेवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर सर्व अरिष्ट जे मी बोललो ते आणीन. कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”