< 2 Kronieken 8 >
1 Toen Salomon na verloop van twintig jaar de tempel van Jahweh en zijn eigen paleis had voltooid,
१परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
2 begon hij de steden, die Chirom aan hem had afgestaan, te versterken, en er Israëlieten in te vestigen.
२मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली.
3 Daarna trok Salomon tegen Chamat-Soba op, en veroverde deze stad.
३पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले.
4 Ook versterkte hij Tadmor, dat in de woestijn ligt, en alle andere voorraadsteden, die hij in Chamat gebouwd had.
४वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली.
5 Hij versterkte Hoog- en Laag-Bet-Choron tot vestingen met muren, poorten en grendels;
५वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून,
6 verder bouwde hij Baälat en alle voorraadsteden, wagensteden en ruitersteden, en alle ontworpen gebouwen in Jerusalem, op de Libanon en in heel zijn rijksgebied.
६बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरूशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
7 Heel de overgebleven bevolking der Chittieten, Amorieten, Perizzieten, Chiwwieten en Jeboesieten, die niet tot de Israëlieten behoorden, liet Salomon voor de arbeidsdienst opkomen.
७इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.
8 Het waren de nakomelingen van hen, die in het land waren overgebleven, en die de Israëlieten niet hadden kunnen uitroeien. Zo is het gebleven tot op deze dag.
८हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
9 Maar van de Israëlieten maakte Salomon niemand tot arbeider; zij waren zijn soldaten, hovelingen, legeroversten, bevelvoerders, wagenmenners en ruiters.
९इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.
10 Tot hen behoorden ook de tweehonderd vijftig hoofdopzichters, die Salomon aangesteld had, en toezicht hielden op het volk.
१०काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते.
11 De dochter van Farao liet Salomon uit de David. stad verhuizen naar het paleis, dat hij voor haar had laten bouwen. Want hij dacht: Het past niet, dat een van mijn vrouwen in het huis van David, den koning van Israël, woont; want de plaatsen, waar de ark van Jahweh geweest is, zijn heilig!
११शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत, तेव्हा माझ्या पत्नीने इस्राएलचा दावीद याच्या नगरात राहू नेये.”
12 Toen begon Salomon de brandoffers ter ere van Jahweh te offeren op het altaar van Jahweh, dat hij opgericht had aan de voorkant van de voorhal.
१२मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
13 Het aantal, dat dagelijks geofferd werd, stemde overeen met de voorschriften van Moses; zo ook de sabbatten, de nieuwe manen en de drie jaarlijkse feesten: het feest der ongedesemde broden, het feest der weken en het loofhuttenfeest.
१३मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी शब्बाथाच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपाचा सण हे तीन वार्षिक सण होत.
14 Daarenboven regelde hij overeenkomstig de voorschriften van zijn vader David de dienst van de priesterafdelingen en de taak der levieten, namelijk de gewijde muziek en het bijstaan van de priesters in hun dagelijkse dienst. Ook verdeelde hij de afdelingen poortwachters over de verschillende poorten; want zo had David, de man Gods, het verordend.
१४आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
15 En in geen enkel opzicht, ook niet in het beheer der schatten, werd er afgeweken van de voorschriften des konings aangaande de priesters en levieten.
१५याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
16 Zo kwam al het werk van Salomon tot stand, van de dag af, dat Salomon de grondslag legde voor de tempel van Jahweh, totdat hij de tempel van Jahweh voltooid had.
१६शलमोनाची सगळी कामे सिध्दीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले, व ते उपयोगात आणले जाऊ लागले.
17 In die tijd trok Salomon naar Es-jon-Géber en naar Elat, aan de kust van de zee in het land Edom.
१७यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसयोन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला.
18 Chirom zond hem namelijk met medewerking van zijn onderdanen schepen en ervaren zeelui, die met de mensen van Salomon naar Ofir voeren, waar ze vierhonderd vijftig talenten goud haalden, dat ze bij koning Salomon brachten.
१८हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले.