< 1 Samuël 24 >
1 Maar nauwelijks was Saul van zijn krijgstocht tegen de Filistijnen teruggekeerd en had hij de tijding ontvangen, dat David zich in de woestijn van En-Gédi ophield,
१असे झाले, शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्यास कोणी सांगितले की, दावीद एन-गेदीच्या रानात आहे.
2 of hij koos drieduizend van de beste krijgers uit heel Israël, en ging oostelijk van de Steenbokrotsen David met zijn mannen zoeken.
२तेव्हा शौल सर्व इस्राएलातून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.
3 Zo kwam Saul bij de schaapskooien langs de weg. Daar was een spelonk, waar hij binnenging, om zijn behoefte te doen; David met zijn mannen echter zaten achter in de spelonk!
३आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.
4 En de mannen van David zeiden tot hem: Dit is de dag, waarop Jahweh u zegt: Zie, Ik geef u den vijand in uw macht, om met hem naar believen te handelen. David stond op, en sneed ongemerkt de slip van Sauls mantel af.
४तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा.” मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.
5 Maar het hart begon hem te bonsen, alleen reeds door het afsnijden van Sauls slip.
५त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्यास टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते.
6 En daarom zeide hij tot zijn mannen: Jahweh beware mij ervoor, zo iets mijn heer, den gezalfde van Jahweh, aan te doen, of zelfs mijn hand tegen hem op te heffen; want hij is de gezalfde van Jahweh.
६आणि त्याने आपल्या मनुष्यांस म्हटले, “मी आपल्या धन्यावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.”
7 Zo bedaarde David zijn mannen, en liet niet toe, dat ze Saul aanrandden. Toen Saul de spelonk had verlaten, en zijn weg vervolgde,
७असे बोलून दावीदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.
8 stond David aanstonds op, verliet de spelonk en riep Saul achterna: Heer koning! En toen Saul omkeek, wierp David zich uit eerbied op zijn knieën, met het gezicht naar de grond.
८नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, “हे माझ्या प्रभू, राजा.” तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला
9 En David sprak tot Saul: Waarom luistert gij naar de praatjes der mensen, als zou David uw ongeluk willen?
९मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता?
10 Ge kunt nu met eigen ogen zien, dat Jahweh u in de spelonk aan mij had overgeleverd. Maar ik wilde u niet doden; ik heb u gespaard en gezegd: Ik zal mijn hand niet opheffen tegen mijn heer; want hij is de gezalfde van Jahweh.
१०पाहा आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की, परमेश्वराने गुहेत आज तुम्हास माझ्या हाती दिले होते. तुम्हास जिवे मारावे असे कोणी मला सांगितले. पण मी तुम्हास सोडून दिले; मी बोललो की, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.
11 Mijn vader, zie, zie de slip van uw mantel, die ik in mijn hand heb! Ja, de slip van uw mantel heb ik afgesneden, maar u niet gedood. Erken dus, dat ik geen boze of misdadige bedoelingen heb. Ik heb u niets willen doen, terwijl gij het op mijn leven gemunt hebt.
११आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जिवे मारले नाही. यावरुन माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुध्द पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.
12 Jahweh zal oordelen tussen mij en u, Jahweh zal mij op u wreken; maar mijn hand wordt niet tegen u opgeheven!
१२माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
13 Want zoals het oude spreekwoord zegt: Van bozen komt boosheid voort! Daarom wordt mijn hand niet tegen u opgeheven.
१३दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
14 Tegen wien is eigenlijk de koning van Israël opgerukt? Wien achtervolgt gij? Een dode hond, een vlo!
१४इस्राएलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मरण पावलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या!
15 Jahweh zal rechter zijn, en oordelen tussen mij en u; Hij zal toezien, mijn zaak verdedigen, en mij recht verschaffen tegen u.
१५यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करो. हे पाहून तो माझा वाद करो आणि तुमच्या हातून मला सोडवो.”
16 Toen David deze toespraak tot Saul had beëindigd, vroeg Saul: Is dat niet uw stem, mijn zoon David? En nu begon Saul luidkeels te wenen.
१६असे झाले की, दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे संपवल्यावर, शौल म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” मग शौल गळा काढून रडला
17 En hij sprak tot David: Gij zijt beter dan ik; want gij hebt het kwaad, dat ik u deed, met goed vergolden.
१७आणि तो दावीदाला म्हणाला, “माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस. परंतु मी तुझे वाईट केले आहे.
18 Vandaag hebt gij getoond, dat ge mij goed gezind zijt. Jahweh heeft mij in uw macht gegeven, en ge hebt mij niet gedood.
१८तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही.
19 Want als iemand zijn vijand ontmoet, laat hij hem dan rustig gaan? Daarom zal Jahweh u belonen voor wat gij vandaag aan mij hebt gedaan.
१९कोणा मनुष्यास त्याचा वैरी सापडला तर तो त्यास चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो.
20 Ja, ik weet, dat gij koning wordt, en dat het koningschap van Israël in uw handen bestendig zal zijn.
२०आता पाहा मी जाणतो की, तू खचित राजा होशील आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल.
21 Welnu, zweer mij dan bij Jahweh, dat ge mijn nageslacht niet zult verdelgen en mijn naam niet zult uitwissen uit het huis van mijn vader.
२१म्हणून आता तू माझ्याशी परमेश्वराची शपथ वाहा की, तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या वडिलाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.”
22 En David bezwoer het hem. Toen ging Saul huiswaarts, en David keerde met zijn mannen naar de bergvesting terug.
२२तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडावर चढून गेली.