< Zaburi 31 >

1 Kuom jatend wer. Zaburi mar Daudi. Kuomi ema aseponde, yaye Jehova Nyasaye, kik iwe ayud wichkuot; gola e chandruok nikech timni makare.
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव.
2 Winj ywakna, kendo bi piyo mondo iresa; bed lwandana mar pondo, kendo ohinga motegno manyalo resa.
माझे ऐक, त्वरीत मला वाचव, माझ्या आश्रयाचा खडक हो. माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.
3 Kaka in lwandana kendo ohingana, telna kendo itaya nikech nyingi.
कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
4 Gola oko e obadho mopondo mochikna nikech in e kar pondona.
त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. कारण तू माझा आश्रय आहे.
5 Aketo chunya e lweti; resa, yaye Jehova Nyasaye, ma Nyasaye mar adiera.
मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
6 Asin gi joma lamo nyiseche manono ma dhano oloso; an to aketo genona kuom Jehova Nyasaye.
जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
7 Abiro bedo mamor kendo moil kuom herani, nikech ne ineno chandruokna, kendo ne ingʼeyo lit mar chunya.
तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु: ख पाहिले आहेस.
8 Ok iseketa e lwet jawasigu to iseguro tiendena kama lach.
तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.
9 Kecha, yaye Jehova Nyasaye, nikech an e chandruok; wengena ojony nikech ywak, kendo chunya gi ringra bende nigi lit.
परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु: खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे.
10 Ngimana rem chamo kendo higni maga opongʼ gi chur; tekona rumo nikech lit ma an-go kendo chokena doko mayom yom.
१०कारण माझे आयुष्य दु: खात आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, आणि माझी हाडे झिजली आहेत.
11 Nikech wasigu olwora mangʼeny, joma odak koda koro ochaya gi chunygi; alich kata mana ni osiepena kendo joma onena e wangʼ yo ringa.
११माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे.
12 Wigi owil koda mana ka gima ne asetho chon bende koro achalo mana gi agulu motore.
१२मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे.
13 Nikech awinjo ayany mangʼeny ma ji yanyago, kihondko olwora koni gi koni; gikuodho kaka digitimna marach kendo gichano mar kawo ngimana.
१३कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत.
14 To an aketo mana genona kuomi, yaye Jehova Nyasaye; kendo awacho niya, “In e Nyasacha.”
१४परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो.
15 Ndalona ni e lweti; resa e lwet wasika, kendo kuom joma lawa.
१५माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव.
16 Mad ibed mamor gi jatichni; resa gi herani ma ok rum.
१६तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार.
17 Kik iwe wiya kuodi, yaye Jehova Nyasaye, nikech aseywakni ka alemo; to we joma timbegi richo oyud wichkuot kendo ginindi ka gilingʼ thi ei liel. (Sheol h7585)
१७परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. (Sheol h7585)
18 Mi dhogi mawacho miriambo mondo olingʼ; nikech sungagi kod chuny marach ma gin-go, omiyo giwuoyo gi wich teko kuom joma kare.
१८खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात.
19 Mano kaka berni duongʼ, ber mikano ne joma oluori, mimiyo joma opondo kuomi ka ji duto neno.
१९जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस.
20 Ipandogi e bwombi iwuon mondo joma richo kik hinygi; iritogi maber e kar dak mari kuom lew joma hangonigi wach.
२०त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील.
21 Pak obed ni Jehova Nyasaye, nikech ne onyisa herane maduongʼ, kane an e dala ma wasigu ogoyona agengʼa.
२१परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे.
22 Kane chandruok omaka to ne awacho ni, “Opoga kodi!” Kata kamano ne iwinja ka aywakni mondo ikecha kane aluongi mondo ikonya.
२२मी घाईत म्हणालो, मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली.
23 Heruru Jehova Nyasaye un joge maler duto! Jehova Nyasaye rito ngima joma jo-adiera, to josunga to ochulo moromo chuth.
२३अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो.
24 Beduru motegno kendo jiwuru chunyu, un duto mugeno kuom Jehova Nyasaye.
२४जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, बलवान व धैर्यवान व्हा.

< Zaburi 31 >